Tuesday, October 5, 2021

 देगलूर विधानसभा पोटनिवडणूक 2021

विविध बाबींवरील निर्बंध आदेश निर्गमीत      

नांदेड (जिमाका), दि. 5 :- भारत निवडणूक आयोगाकडून 90-देगलूर विधानसभा पोटनिवडणूक 2021 ची दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजी घोषणा केली असून घोषणेच्‍या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. नांदेड जिल्‍ह्यातील देगलूर विधानसभा पोट निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून नांदेडचे जिल्‍हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये अधिकाराचा वापर करुन विविध बाबींवर निर्बंध आदेश 29 सप्टेंबर 2021 रोजी निर्गमीत केले आहेत.   

ध्‍वनीक्षेपक, ध्‍वनिवर्धकाचा वापर  

कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते यांना ध्‍वनीक्षेपक व ध्‍वनिवर्धकाचा वापर सक्षम प्रधिकाऱ्याच्‍या पूर्व परवानगीशिवाय करता येणार नाही. फिरत्‍या वाहनांवर ध्‍वनिक्षेपक व ध्‍वनिवर्धकाचा वापर करता येणार नाही. महाराष्‍ट्र शासन पर्यावरण विभाग, शासन निर्णय क्रमांक ध्‍वनीप्र 2009/प्र.क्र.12/08/ता.क.1, दिनांक 31 जुलै, 2013 नुसार ध्‍वनिक्षेपक व ध्‍वनिवर्धकाचा वापर ध्‍वनि प्रदुषणाची पातळी विहित मर्यादेत राखून करावी. ध्‍वनिक्षेपक व ध्‍वनिवर्धकाचा वापर सकाळी 6 वाजेपुर्वी आणि रात्री. 10 वाजेनंतर करता येणार नाही. हे आदेश देगलूर विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्राच्या हद्दीत 29 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबर रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहील. 

कार्यालये, विश्रामगृहे परिसरातील निर्बंध

सर्व शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, विश्रामगृह याठिकाणी कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक, मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणने, कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यावर प्रतिबंध करण्यात आले. हे आदेश देगलूर विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्राच्या हद्दीत 29 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबर रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहील. 

शासकीय वाहनाच्‍या गैरवापरास प्रतिबंध

90-देगलूर विधानसभा मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यात निवडणूकीचे कालावधीत कोणत्‍याही वाहनांच्‍या ताफ्यामध्‍ये तीन पेक्षा जास्‍त मोटारगाडया अथवा वाहने (Cars/Vehicles) वापरण्‍यास या आदेशाव्‍दारे प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे. हा आदेश देगलूर विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रासह नांदेड जिल्ह्यात 29 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पर्यंत अंमलात राहील. 

वाहनांवर पक्ष प्रचाराचे कापडी फलके,

झेंडे लावणे इत्‍यादी बाबीस काही प्रतिबंध

फिरत्‍या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्‍या डाव्‍या बाजुला विंड स्‍क्रीन ग्‍लासच्‍या पुढे राहणार नाही आणि तो त्‍या वाहनाच्‍या टपापासून 2 फुट उंची पेक्षा जास्‍त राहणार नाही. प्रचाराच्‍या फिरत्‍या वाहनावर कापडी फलक वाहन चालकाच्‍या आसनामागे वाहनाच्‍या डाव्‍या व उजव्‍या बाजुनेच लावण्‍यात यावा. इतर कोणत्‍याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्‍या वाहनावर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधीत पक्षाचे जिल्‍हाध्‍यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी यांच्‍या वाहना व्‍यति‍रीक्‍त इतर कोणत्‍याही वाहनावर लावता येणार नाही. हा आदेश देगलूर विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रासह नांदेड जिल्ह्यात 29 सप्टेंबर ते 11 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पर्यंत अंमलात राहील. 

निवडणूक कालावधीत विश्रामगृह वापरावरील निर्बंध

शासकीय व निवडणूकीच्‍या कामावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्‍या व्‍यतीरिक्‍त, इतर कोणत्‍याही व्‍यक्‍तीस विश्रामगृहात थांबण्‍यासाठी संबंधित खात्‍याने दिलेला अधिकृत परवाना असल्‍याशिवाय किंवा सक्षम अधिकाऱ्याच्‍या पूर्व परवानगीशिवाय जिल्‍ह्यातील शासकीय/निमशासकीय विश्रामगृहात अथवा त्‍या परिसरात प्रवेश करता येणार नाही. हा आदेश देगलूर विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रासह नांदेड जिल्ह्यात 29 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पर्यंत अंमलात राहील. 

सार्वजनिक ठिकाणी तात्पुरती पक्ष कार्यालय स्‍थापन करण्यास निर्बंध

निवडणूकीचे कालावधीत धार्मिक स्‍थळे, रुग्‍णालये किंवा शैक्षणिक संस्‍था व सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्‍पुरती पक्ष कार्यालये स्‍थापन करण्‍यास प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे. हा आदेश देगलूर विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्राच्या हद्दीत 29 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पर्यंत अंमलात राहील. 

सार्वजनिक ठिकाणी पक्षांचे चित्रे, चिन्‍हांचे कापडी फलके, भाषण देण्याबाबतचे निर्बंध

मतदार संघ कार्यक्षेत्रात निवडणूक कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पक्षांचे चित्रे, चिन्‍हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देण्यास प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे. हा आदेश देगलूर विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्राच्या हद्दीत 29 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पर्यंत अंमलात राहील. 

शासकीय, सार्वजनिक मालमत्‍तेची विरुपता करण्‍यास निर्बंध  

निवडणूक कालावधीत शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्‍तेची प्रत्‍यक्ष किंवा अप्रत्‍यक्ष स्‍वरुपात विरुपता करण्‍यास प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे. हा आदेश देगलूर विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्राच्या हद्दीत 29 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पर्यंत अंमलात राहील. 

शस्‍त्र परवानाधारकाकडील शस्‍त्रास्‍त्रे वाहून नेण्‍यावर बंदी  

निवडणूकीचे कालावधीत शासकीय कर्तव्‍य पार पाडणाऱ्या अधिकारी व कर्मचारी, बँक सुरक्षा गार्ड यांचे व्‍यतिरिक्‍त इतर सर्व परवाना धारकास परवान्‍यातील शस्‍त्रास्‍त्रे वाहून नेण्‍यास या आदेशान्‍वये बंदी घालण्‍यात आली आहे. हा आदेश देगलूर विधानसभा पोटनिवडणूक अनुषंगाने मतदारसंघ कार्यक्षेत्राहद्दी पर्यंत 29 सप्‍टेंबर ते 5 नोव्हेंबर 2021 रोजी मध्यरात्री पर्यंत अंमलात राहतील.  

नामनिर्देशनपत्र दाखल करताना अवलंब करावयाची कार्यपद्धत

निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळेस कार्यालयात वाहनांच्‍या ताफ्यामध्‍ये तीन पैक्षा जास्त मोटारगाड्या/वाहनाना तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात पाच पेक्षा जास्त व्‍यक्‍तीना, तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्‍या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे/ वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणने आणि कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक‍ प्रचार करणेस प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे. हा आदेश 90-देगलूर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकरी यांचे कार्यालयाच्या हद्दीपर्यंत 1 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6 ते 8 आक्‍टोंबर 2021 रोजी मध्यरात्री पर्यंत अंमलात राहील. 

मतदान केंद्र परिसरात 144 कलम

मतदानाच्‍या दिवशी शनिवार 30 आक्‍टोंबर 2021 रोजी 90-देगलूर विधानसभा पोट निवडणूकीसाठी सर्व मतदान केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागु राहील. ज्‍या ठिकाणी मतदान होणार आहे त्‍या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरिक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त व्‍यक्तीस प्रवेश करण्‍याकरीता शनिवार 30 ऑक्टोंबर 2021 रोजी प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे. हा आदेश मतदानाच्‍या दिवशी  शनिवार 30 ऑक्टोंबर रोजी मतदान सुरु झाल्‍यापासून मतदान संपेपर्यन्‍त अंमलात राहील. 

मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलम

नांदेड जिल्‍ह्यातील 90- देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतदार संघाच्‍या मुख्‍यालयी मतमोजणी केंद्र परिसरात मंगळवार 2 नोव्हेंबर 2021 रोजी मतमोजणी शांततेत पार पडावी आणि कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत रहावी या दृष्‍टीकोणातून मतमोजणीच्‍या दिवशी मतमोजणी केंद्रापासून 200 मिटर परिसरात सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरिक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेशास प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे. हा आदेश मंगळवार 2 नोव्हेंबर,2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यन्‍त अंमलात राहील. 

कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या ज्या प्रभावी उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून अवलंबिल्या जात आहेत. त्याअनुषंगाने ब्रेक द चेन सुधारित मार्गदशक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. त्या सूचनांचे काटेकोरपणे पालन आचारसंहिता कालावधीत आदेशाचे पालन होणे क्रमप्राप्त आहे, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

0000

 

 सार्वत्रिक नवरात्रौत्सव 2021 बाबत मार्गदर्शक सूचना जारी  

नांदेड (जिमाका), दि. 5 :- सार्वत्रिक नवरात्रौत्सव 2021 बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवरात्रोत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दि. 7 ते 15 ऑक्टोबर 2021 दरम्यान नवरात्र / दुर्गापुजा /दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी, अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करून उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. त्याअनुषंगाने मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.  

कोवीड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने "ब्रेक द चेन" अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे. सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका / स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.  

यावर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरीता 4 फूट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची 2 फूटांच्या मर्यादेत असावी. मागील वर्षी प्रमाणे शक्यतो देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.  

नवरात्रौत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा, जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्यविषयक उपक्रमे / शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. 

देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी तसेच देवीच्या मंडपांमध्ये प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या बाबतीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे. मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपांमध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई असेल. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरीकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये. 

महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी. तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्वीकृती केंद्रांची व्यवस्था करावी व याबाबत जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यात यावी.विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्रात असेल तर, मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.  

दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा. रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत. त्यांना फेसबुक इत्यादी समाजमाध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे सोहळा बघण्याची व्यवस्था करावी.  

कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत स्थानिक प्रशासनाकडून अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक आहे. यावर्षी नवरात्रौत्सव निमित्त शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

00000

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाट

ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 6 ते 9 ऑक्टोंबर दरम्यान नांदेड जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 6 ते 9 ऑक्टोंबर ह्या दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी.  

वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना : काय करावे आणि काय करु नये विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.  

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. 

 

पूर परिस्थितीत : काय करावे आणि काय करू नये 

पूर येण्यापूर्वी : अफवांकडे दुर्लक्ष करा, शांत रहा, घाबरू नका. आपत्कालीन परिस्थितीसाठी एस.एम.एस. चा उपयोग करा. आपले मोबाईल फोन चार्ज करून ठेवा. हवामानातील बदलांची अद्ययावत माहितीसाठी रेडीओ ऐका, टी.व्ही. पहात रहा, वर्तमानपत्र वाचत रहा. गुरेढोरे /पशूच्या सुरक्षिततेची सोय सुनिश्चित करून घ्या. सुरक्षित जगण्यासाठी आवश्यक वस्तूंसह आपत्कालीन कीट तयार ठेवा. आपली कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू जलरोधक (वाटर-प्रूफ) बॅग मध्ये ठेवा. जवळपास असलेली निवारा/पक्के घराकडे जावयाचे सुरक्षित मार्ग जाणून घ्या. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशनाचे पालन करा. कमीत कमी एका आठवड्यासाठी पुरेसे खाण्याजोगे अन्न आणि पिण्यासाठी पाणी साठवा. पूर असलेल्या क्षेत्रातील कालवे, नाले, ड्रेनेज वाहिन्या यापासून नागरिकांनी सतर्क/जागरूक रहावे. 

 

पूर दरम्यान : पूर प्रवाहात प्रवेश करू नका. सिवरेज लाईन, गटारे, नाले, पूल,नदी, ओढे इत्यादी पासून दूर रहा. विद्युत खांब आणि पडलेल्या वीज लाईन पासून दूर रहा. ओपन ड्रेन किंवा धोक्याच्या ठिकाणी चिन्हे (लाल झेंडे किंवा बॅरीकेड्स) सह चिन्हांकित करा. पुराच्या पाण्यामध्ये चालू नका किंवा गाडी चालवू नका. लक्षात ठेवा, दोन फुट वाहणारे पुराचे पाणी मोठ्या मोटारींना सुद्धा वाहून नेऊ शकते. ताजे शिजलेले किंवा कोरडे अन्न खा. आपले अन्न झाकून ठेवा. उकळलेले/क्लोरीन युक्त पाणी प्या. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जंतुनाशकाचा वापर करा.  

पूर येऊन गेल्यानंतर : मुलांना पुराच्या पाण्यामध्ये किंवा जवळपास खेळू देऊ नका. कोणतीही खराब झालेली विद्युत वस्तू वापरू नका, त्यापूर्वी तपासणी करा. सूचना दिल्या असल्यास, मुख्य स्विचेस आणि विद्युत उपकरण बंद करा तसेच ओले असल्यास विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका. तुटलेली विद्युत खांब आणि तारे, तीक्ष्ण वस्तू आणि मोडतोड अथवा पडझड झालेल्या वस्तूंपासून सावध रहा. पुरातील पाण्यात वाहून आलेले अन्न खाऊ नका. मलेरिया पासून बचाव करण्यासाठी डासांच्या जाळीचा वापर करा. सापांबद्दल सावधगिरी बाळगा कारण पुरामध्ये सर्पदंश होण्याची शक्यता असते. जर गटार लाईन फुटली असेल तर शौच्यालयाच्या किंवा पिण्याच्या पाण्याचा नळ वापरू नका. आरोग्य विभागाने सांगितल्याशिवाय नळाचे पाणी पिऊ नका. 

पूर आल्यावर सुरक्षित ठिकाणी जाण्याची वेळ आल्यास : घरातील वस्तू  पलंगावर आणि टेबल्सवर ठेवा. शौच्यालयाच्या वाडग्यात वाळूच्या बॅग्स ठेवा आणि सांडपाणी परत येऊ शकते (बॅक फ्लो). ते टाळण्यासाठी सर्व ड्रेन होल झाकून ठेवा. वीज आणि गॅस कनेक्शन बंद करा. उंच मैदान/सुरक्षित निवारा येथे जा. आपत्कालीन कीट, प्रथमोपचार बॉक्स, मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे आपल्या बरोबर घ्या. खोल, अज्ञात पाण्यात प्रवेश करू नका; पाण्याची खोली तपासण्यासाठी काठी वापरा. जेंव्हा सक्षम अधिकारी आपल्या घराची तपासणी करून ते राहण्यास योग्य असल्याबाबत सांगतील व घरी परत जाण्याची परवानगी देतील तेंव्हाच घरात प्रवेश करा. कौटुंबिक संप्रेषण योजना बनवा. ओली झालेली प्रत्येक गोष्ट स्वच्छ आणि निर्जंतुक करा, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0000

 नांदेड जिल्ह्यात 2  व्यक्ती कोरोना बाधित तर 2 कोरोना बाधित झाला बरा 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 847 अहवालापैकी 2 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2  तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 329 एवढी झाली असून यातील 87 हजार 662 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 15 रुग्ण उपचार घेत असून 1 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर  तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, मुदखेड 1 असे एकूण 2  बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1 व मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 15 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 9, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 36 हजार 709

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 33 हजार 256

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 329

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 662

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-15

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...