Tuesday, October 5, 2021

माहूर येथील देवीच्या दर्शनासाठी संस्थान व प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना

 जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा

नांदेड (जिमाका) दि. 5 :- कोविड- 19 चा प्रादुर्भाव वाढू नये या उद्देशाने साथरोग कायदा व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्ह्यातील बंद असलेली धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक प्रार्थना स्थळे येत्या 7 ऑक्टोंबरपासून अटी व शर्तीच्या अधीन राहून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. या बाबत नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील नवरात्र उत्सव बाबत असलेली महती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी आज माहूर येथे प्रत्यक्ष भेट देवून आढावा घेतला. विश्वस्तासमवेत झालेल्या आढावा बैठकीत दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्रिका घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. ही प्रवेशिका https://shrirenukadevi.in/ या संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्या भाविकांना ऑनलाईन प्रक्रीयेत सहभाग घेता येत नाही त्याच्यासाठी टी-पाईट माहूर येथे ऑफलाईन पासेसची सोय उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. 

नवरात्र काळामध्ये भाविकांच्या सोयीसाठी पहाटे 5 ते रात्री 10 पर्यत रेणूका देवी मंदिर खुले राहील. दर्शनासाठी पास असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. याचबरोबर कोविड प्रतिबंधक लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. परराज्यातील भाविकांनी लसीकरणाचे दोन डोस घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र अथवा 72 तासामधील आरटीपीसीआर अथवा 24 तासामधील रॅपीड ॲटीजेन टेस्ट असणे आवश्यक आहे. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती , गर्भवती महिला व 10  वर्षाखालील मुले यांनी नवरात्र काळामध्ये दर्शनासाठी गडावर येऊ नये. त्याऐवजी रेणूका देवी संस्थानच्या वेबसाइटवरुन ऑनलाईन दर्शन घ्यावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. भाविकांना माहूर येथून रेणूका माता मंदिराकडे घेवून जाणे आणि आणण्यासाठी एसटी बसेसची सोय केली आहे.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...