Friday, March 12, 2021

 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली कोरोना लस

नांदेड, दि. 12, (जिमाका) :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक बांधकाम उपक्रम वगळून) मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज मुंबई येथे जे. जे. शासकिय रुग्णालयात कोविड प्रतिबंधक लस घेतली. यावेळी वैद्यकिय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने व इतर प्रमुख वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडी शासनाने लसीकरणाचे विविध टप्पे आखून दिले आहेत. शासनाने आवाहन केल्याप्रमाणे जनतेने निर्भयतेने लसीकरणासाठी पुढे सरसावे असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

0000



 

समस्याग्रस्त व पिडीत महिलासांठी

15 मार्च रोजी महिला लोकशाही दिन

जिल्हाधिकारी कार्यालयात स्विकारले जातील अर्ज 

नांदेड, (जिमाका) दि. 12:-  समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी 15 मार्च 2021 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 15 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 

कोरोना बाधितांची संख्या पोहचली 360 वर

दोघांचा मृत्यू 

जनतेने त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- गत आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या प्रत्येक दिवशी वाढत असून आज तब्बल 360 व्यक्ती कोरोना बाधित आले आहेत. सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 360 बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे 151 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 209 बाधित आले. याचबरोबर दिनांक 9 मार्च रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 35 वर्षीय महिलेचा व दिनांक 11 मार्च रोजी खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुखेड येथील 62 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 610 एवढी झाली आहे. 

आजच्या 993 अहवालापैकी 619 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 25 हजार 800 एवढी झाली असून यातील 23 हजार 360 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 614 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 44 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 100, किनवट कोविड रुग्णालय 7, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 29, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 15 असे एकूण 156 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 90.54 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 127, अर्धापूर तालुक्यात 1, हदगाव 2, मुखेड 4, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 8, धर्माबाद 4, लोहा 2, नायागव 1, परभणी 1 असे एकूण 151 बाधित आढळले. 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 173, अर्धापूर तालुक्यात 1, हदगाव 12, लोहा 1, मुदखेड 1, हिंगोली 1, पुणे 1, नांदेड ग्रामीण 1, बिलोली 3, किनवट 10, माहूर 2, नायागव 2, यवतमाळ 1 असे एकूण 209 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 1 हजार 614 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 76, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 76, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 65, किनवट कोविड रुग्णालयात 27, मुखेड कोविड रुग्णालय 31, हदगाव कोविड रुग्णालय 12, महसूल कोविड केअर सेंटर 114, देगलूर कोविड रुग्णालय 7, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 815, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 260, खाजगी रुग्णालय 131 आहेत. 

शुक्रवार 12 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 115, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 16 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 45 हजार 960

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 15 हजार 608

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 25 हजार 800

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 23 हजार 360

एकुण मृत्यू संख्या-610

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 90.54 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-11

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-256

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-1 हजार 614

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-44.

0000

 

विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी

स्पर्धा परिक्षा अभ्यासिका सुरु ठेवण्यास मुभा

नांदेड (जिमाका), 12 :- जिल्ह्यातील व महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग यासह इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी चालू असलेल्या अभ्यासिका यांना 10 मार्च रोजी निर्गमीत केलेल्या आदेशातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे 12 ते 21 मार्च 2021 या कालावधीत या सर्व अभ्यासिका कोरोना प्रतिबंध सर्व उपाययोजनांचे पालन करुन पूर्णवेळ चालू राहतील याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.  

0000

 

21 मार्चला होणाऱ्या राज्यसेवा लोकसेवा आयोगाच्या

राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन

नांदेड (जिमाका), 12 :- राज्य लोकसेवा आयोगाचे सहसचिव यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा-2020 चे रविवार 21 मार्च 2021 रोजी आयोजन करण्यात आले आहे. यानुसार परीक्षेसाठी आवश्यक ते सर्व नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत केले गेले आहे. 

या परीक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेशान्वये रविवार 14 मार्च रोजीच्या परीक्षेकामी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी-कर्मचारी हे 21 मार्च 2021 रोजीच्या परीक्षेचे नियुक्ती मिळालेल्या व परीक्षा उपकेंद्रावर सोपविलेले काम करतील. या आदेशात कोणताही बदल होणार नाही. सदर आदेश दि. 21 मार्च 2021 रोजीच्या परीक्षेसाठी कायम राहतील. तसेच विषयांकीत परीक्षेच्या अनुषंगाने 20 मार्च 2021 रोजी नियुक्ती मिळालेल्या परीक्षा उपकेंद्रावर सकाळी 11 वा. उपस्थित रहावे. जे अधिकारी / कर्मचारी परीक्षा कामी परीक्षा उपकेंद्रावर गैरहजर राहतील त्यांची गंभीर दखल घेण्यात येईल याची परीक्षाकामी नियुक्ती अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

000000

 पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड दौरा

नांदेड (जिमाका), 12 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक बांधकाम उपक्रम वगळून) मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. 

शनिवार 13 मार्च 2021 रोजी सकाळी 8.50 वा. मुंबई येथून विमानाने औरंगाबादकडे प्रयाण. सकाळी 9.50 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन. सकाळी 10 वा. औरंगाबाद विमानतळ येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2 वा. नांदेड येथे आगमन व राखीव.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...