पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली कोरोना लस
नांदेड,
दि. 12, (जिमाका) :- राज्याचे सार्वजनिक
बांधकाम (सार्वजनिक
बांधकाम उपक्रम वगळून) मंत्री
तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज मुंबई येथे जे. जे. शासकिय
रुग्णालयात कोविड प्रतिबंधक लस घेतली. यावेळी वैद्यकिय शिक्षण संचालक डॉ.
तात्याराव लहाने व इतर प्रमुख वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडी
शासनाने लसीकरणाचे विविध टप्पे आखून दिले आहेत. शासनाने आवाहन केल्याप्रमाणे
जनतेने निर्भयतेने लसीकरणासाठी पुढे सरसावे असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण
यांनी केले.
0000

No comments:
Post a Comment