Saturday, October 6, 2018


महात्‍मा गांधी जयंतीदिनी विशेष मोहिमेत
मतदार नोंदणीसाठी 4 हजार 171 अर्ज प्राप्‍त
नांदेड, दि. 6 :- नागरीकांन मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्‍ती, वगळणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर महात्‍मा गांधी जयंतीदिनी 2 ऑक्‍टोबर रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्‍यात आले होते. या मोहिमेत नागरीकाकडन नाव नोंदणीचे 4 हजार 171 अर्ज व नाव वगळणीचे  478 अर्ज प्राप्‍त झाले आहेत. मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी 31 ऑक्‍टोबर पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन निवडणूक विभाग जिल्‍हाधिकारी कार्यालय निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्‍याअंतर्गत दिनांक 1 सप्‍टेंबर 2018 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. नांदेड जिल्‍हयात दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादी विशेष संक्षिप्‍त पुनरीक्षण कार्यक्रम दि. 1 सप्‍टेबर ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत राबविण्‍यात येत आहे.
या मोहिमेत बीएलओ यांनी मतदारांच नाव नोंदणी, दुरुस्‍ती व वगळणीचे विविध नमुना अर्ज भरुन घेण्‍यात आले. महिला मतदार, दिव्‍यांग व्‍यक्‍ती, नवमतदारांचे नोंदणी प्रमाण वाढविण्‍याकरीता विशेष प्रयत्‍न करण्‍यात आले. नाव नोंदणी करीता प्राप्‍त झालेल्‍या अर्जापैकी दिव्‍यांग मतदारांचे - 49 अर्ज व नवमतदार (वय वर्ष १८-२१)  यांचे 2 हजार 891 अर्ज प्राप्त झाले आहेत. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्‍या अनुषंगाने मतदार यादीत नाव नोंदणी करण्‍याकरीता अंतीम मुदत 31 ऑक्‍टोबर 2018 आहे.
मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी / दुरुस्‍ती / वगळणी याबाबतचे अर्ज भरुन सादर करण्‍यासाठी संबंधत मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ), तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालया 31 ऑक्‍टोबर पर्यंत मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन नांदेड जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
000000


ज्येष्ठ नागरिकांनी मोफत आरोग्य
 सुविधांचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड, दि. 6 :- ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हा रुग्णालयांतर्गत उपलब्ध असलेल्या मोफत आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा. उत्तम आरोग्यासाठी प्रत्येकांनी दररोज किमान एक तास तरी व्यायामासाठी द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय व तेलंग हॉस्पिटल नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक दिन व सप्ताहच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आज घेण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते.
यावेळी 275 ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच ज्येष्ठ नागरिक तथा नांदेडचे जेष्ठ फिजीसियन डॉ. रामरतन सिंह, एमपीएस स्कूलचे प्राचार्य वेंकटेस्वलू, उत्तर मराठवाडा ज्येष्ठ नागरीक महासंघाचे अध्यक्ष अशोक तेरकर, डॉ. दीपक हजारी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव बंग, नामदेवराव पदमने यांचा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्याम पाटील तेलंग, डॉ. शारदा तेलंग, वैद्यकीय अधिकारी अनुप्रिया गहेरवार, प्रमोद गटटानी, अमृत तेलंग, अशोक कुबडे, समुपदेशक सुवर्णकार सदाशिव, संतोष बेटकर यांची उपस्थिती होती.
000000



लाभार्थ्यांना आधार ओळखपत्रासाठी
विशेष शिबिराचे आयोजन
नांदेड, दि. 6 :- मुदखेड तालुक्‍यातील विशेष सहाय योजनेच्‍या लाभार्थ्‍यांचे आधार ओळखपत्र काढण्‍यासाठी व आधार ओळखपत्र असलेल्‍या लाभार्थ्‍यांचे आधार ओळखपत्र अपडेट करण्‍यासाठी सोमवार 8 ते शुक्रवार 12 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत महसूल मंडळ निहाय विशेष आधार  शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे. संबंधीत लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार मुदखेड यांनी केले आहे.
या शिबिरास आधार ओळखपत्र, मतदान ओळखपत्र, शिधापत्रिका, रहिवाशी प्रमाणपत्र  या कागदपत्रांसह त्‍या-त्‍या गावातील लाभार्थ्‍यांनी आपल्‍याशी संबंधीत महसूल मंडळातील मुख्‍यालय असलेल्या ठिकाणी जसे मुदखेड महसूल मंडळ अंतर्गत- तहसिल कार्यालय मुदखेड, महसूल मंडळ बारड अंतर्गत- ग्रामपंचायत कार्यालय बारड आणि महसूल मंडळ मुगट अंतर्गत- ग्राम पंचायत कार्यालय मुगट  येथे दिनांक 8 ते 12 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत सकाळी 10 ते सायं 5 यावेळेत उपस्थित रहावे.
संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ राज्‍य निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय विधवा योजना या विशेष सहाय योजनेच्‍या लाभार्थ्यांचे अनुदान वाटप करताना आधार विषयक तांत्रीक अडचणी येत आहेत. यात निराधार योजनेचे लाभार्थी वयोवृध्‍द असल्‍याने त्‍यांचे Finger Print Iris आधार किटवर येत नसल्‍याने काही लाभार्थ्यांचे आधार केवायसी होत नाही. तसेच काही लाभार्थी डोळयांनी हातांनी दिव्यांग आहेत अशा लाभार्थ्यांचे व काही कुष्‍ठरोगी लाभार्थी असल्‍यामुळे त्‍यांचे आधार केवायसी होत नाही. काही लाभार्थ्यांनी आधार काढण्‍यासाठी अनेक वेळा नोंदी केलेल्‍या आहेत व त्यांचेकडे आधार नोंदणी पावती नाही. ज्या लाभार्थ्यांचे आधार प्राप्‍त करुन घेण्‍यास तांत्रिक अडचणी येत आहेत व आधार कार्यान्‍वीत नाहीत. अशा लाभार्थ्‍यांसाठी सोमवार 8 ते शुक्रवार 12 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत महसूल मंडळ निहाय विशेष आधार शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000


विद्यार्थ्यांनी निरोगी आरोग्य ,
संतुली आहार याकडे लक्ष द्यावे - डॉ. सुर्यवंशी
नांदेड, दि. 6 :-  निरोगी मन, शांत झोप, स्वत:शी संवाद, ताजा आहार हा निरोगी आरोग्याचा मुलमंत्र आहे, असे प्रतिपादन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. शर्मिली सुर्यवंशी केले.  
शासकीय तंत्रनिकेतन येथे महिला तक्रार निवारण समितीद्वारे आयोजित कार्यक्रमांतर्गत विद्यार्थीनी महिला अधिकारी णि कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना डॉ. शर्मिली सुर्यवंशी या बोलत होत्या.  
डॉ. सुर्यवंशी यांनी अभ्यासासोबतच निरोगी स्वास्थ असणे अत्यंत आवश्यक असून यासाठी आवश्यक ती काळजी घेतल्यास मोठया आजारापासून आपण स्वत:ला वाचवू शकतो असे सांगितले. 
मुग्धा फिटनेस सेंटरच्या संचालिका डॉ. रोहिणी सिरसीकर यांनी संतुलित आहार याबाबत टिप्स दिल्या. धकाधकीच्या जीवनात जेवणाचे संतुलन बिघडलेले असून सकस आहार पध्दती अलीकडच्या काळात कालबाहय होत असतांना दिसत आहे. तेलकट बाहेरच्या तात्काळ उपलब्ध होणाऱ्या पदार्थामुळे पोटाच्या विकाराचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे पौष्टी आहारावर भर द्यावा असेही त्या म्हणल्या.
            संस्थेचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी दर दोन तासानी जेवावं की फक्त दोनदाच जेवावं. याबाबत नेमका नियम सांगण्याबाबत आवाहन केले. कार्यक्रमानंतर संस्थेचे माजी प्राचार्य प्रकाश पोपळे यांनी मार्गदर्शन केले.
महिला तक्रार निवारण समिती अध्यक्षा डॉ. बेट्टेगिरी रंजना देवशी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर डॉ. अनघा जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीमखाना उपाध्यक्ष ए. बी. दमकोंडवार, डॉ. जी. एम. डक, संध्या म्हेत्रे, सारिका दुटाळ, श्यामराज यांनी प्रयत्न केले. शासकीय तंत्रनिकेतनच्या मुलींनी या कार्यक्रमास मोठया प्रमाणात सहभाग नोंदवला.
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...