Saturday, October 6, 2018


महात्‍मा गांधी जयंतीदिनी विशेष मोहिमेत
मतदार नोंदणीसाठी 4 हजार 171 अर्ज प्राप्‍त
नांदेड, दि. 6 :- नागरीकांन मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्‍ती, वगळणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर महात्‍मा गांधी जयंतीदिनी 2 ऑक्‍टोबर रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्‍यात आले होते. या मोहिमेत नागरीकाकडन नाव नोंदणीचे 4 हजार 171 अर्ज व नाव वगळणीचे  478 अर्ज प्राप्‍त झाले आहेत. मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी 31 ऑक्‍टोबर पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन निवडणूक विभाग जिल्‍हाधिकारी कार्यालय निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्‍याअंतर्गत दिनांक 1 सप्‍टेंबर 2018 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. नांदेड जिल्‍हयात दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादी विशेष संक्षिप्‍त पुनरीक्षण कार्यक्रम दि. 1 सप्‍टेबर ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत राबविण्‍यात येत आहे.
या मोहिमेत बीएलओ यांनी मतदारांच नाव नोंदणी, दुरुस्‍ती व वगळणीचे विविध नमुना अर्ज भरुन घेण्‍यात आले. महिला मतदार, दिव्‍यांग व्‍यक्‍ती, नवमतदारांचे नोंदणी प्रमाण वाढविण्‍याकरीता विशेष प्रयत्‍न करण्‍यात आले. नाव नोंदणी करीता प्राप्‍त झालेल्‍या अर्जापैकी दिव्‍यांग मतदारांचे - 49 अर्ज व नवमतदार (वय वर्ष १८-२१)  यांचे 2 हजार 891 अर्ज प्राप्त झाले आहेत. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्‍या अनुषंगाने मतदार यादीत नाव नोंदणी करण्‍याकरीता अंतीम मुदत 31 ऑक्‍टोबर 2018 आहे.
मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी / दुरुस्‍ती / वगळणी याबाबतचे अर्ज भरुन सादर करण्‍यासाठी संबंधत मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ), तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालया 31 ऑक्‍टोबर पर्यंत मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन नांदेड जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...