लाभार्थ्यांना आधार ओळखपत्रासाठी
विशेष शिबिराचे आयोजन
नांदेड, दि. 6 :- मुदखेड तालुक्यातील विशेष सहाय योजनेच्या लाभार्थ्यांचे
आधार ओळखपत्र काढण्यासाठी व आधार ओळखपत्र असलेल्या लाभार्थ्यांचे आधार ओळखपत्र
अपडेट करण्यासाठी सोमवार 8 ते शुक्रवार 12 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत महसूल मंडळ
निहाय विशेष आधार शिबिराचे आयोजन करण्यात
आले आहे. संबंधीत लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार
मुदखेड यांनी केले आहे.
या शिबिरास आधार
ओळखपत्र, मतदान ओळखपत्र, शिधापत्रिका, रहिवाशी प्रमाणपत्र या कागदपत्रांसह त्या-त्या गावातील लाभार्थ्यांनी
आपल्याशी संबंधीत महसूल मंडळातील मुख्यालय असलेल्या ठिकाणी जसे मुदखेड महसूल
मंडळ अंतर्गत- तहसिल कार्यालय मुदखेड, महसूल मंडळ बारड अंतर्गत- ग्रामपंचायत
कार्यालय बारड आणि महसूल मंडळ मुगट अंतर्गत- ग्राम पंचायत कार्यालय मुगट येथे दिनांक 8 ते 12 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत सकाळी
10 ते सायं 5 यावेळेत उपस्थित रहावे.
संजय गांधी निराधार
योजना, श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ
योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना या विशेष सहाय योजनेच्या लाभार्थ्यांचे
अनुदान वाटप करताना आधार विषयक तांत्रीक अडचणी येत आहेत. यात निराधार योजनेचे
लाभार्थी वयोवृध्द असल्याने त्यांचे Finger Print Iris आधार किटवर येत नसल्याने
काही लाभार्थ्यांचे आधार केवायसी होत नाही. तसेच काही लाभार्थी डोळयांनी हातांनी दिव्यांग
आहेत अशा लाभार्थ्यांचे व काही कुष्ठरोगी लाभार्थी असल्यामुळे त्यांचे आधार केवायसी
होत नाही. काही लाभार्थ्यांनी आधार काढण्यासाठी अनेक वेळा नोंदी केलेल्या आहेत व
त्यांचेकडे आधार नोंदणी पावती नाही. ज्या लाभार्थ्यांचे आधार प्राप्त करुन घेण्यास
तांत्रिक अडचणी येत आहेत व आधार कार्यान्वीत नाहीत. अशा लाभार्थ्यांसाठी सोमवार 8
ते शुक्रवार 12 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत महसूल मंडळ निहाय विशेष आधार शिबिराचे आयोजन
करण्यात आले आहे, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000
No comments:
Post a Comment