विद्यार्थ्यांनी निरोगी आरोग्य ,
संतुलीत आहार याकडे लक्ष द्यावे - डॉ. सुर्यवंशी
नांदेड, दि. 6 :- निरोगी मन, शांत झोप, स्वत:शी
संवाद, ताजा आहार हा निरोगी
आरोग्याचा मुलमंत्र आहे, असे
प्रतिपादन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ.
शर्मिली सुर्यवंशी केले.
शासकीय तंत्रनिकेतन
येथे महिला तक्रार निवारण
समितीद्वारे आयोजित कार्यक्रमांतर्गत विद्यार्थीनी व महिला
अधिकारी आणि कर्मचारी
यांना मार्गदर्शन करताना डॉ. शर्मिली
सुर्यवंशी या बोलत होत्या.
डॉ. सुर्यवंशी
यांनी अभ्यासासोबतच निरोगी
स्वास्थ असणे अत्यंत आवश्यक
असून यासाठी आवश्यक ती काळजी
घेतल्यास मोठया आजारापासून आपण
स्वत:ला वाचवू शकतो असे
सांगितले.
मुग्धा फिटनेस
सेंटरच्या संचालिका डॉ. रोहिणी
सिरसीकर यांनी संतुलित आहार याबाबत टिप्स
दिल्या. धकाधकीच्या जीवनात जेवणाचे
संतुलन बिघडलेले असून सकस
आहार पध्दती अलीकडच्या काळात
कालबाहय होत असतांना दिसत
आहे. तेलकट व बाहेरच्या
तात्काळ उपलब्ध होणाऱ्या पदार्थामुळे
पोटाच्या विकाराचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे पौष्टीक आहारावर भर द्यावा
असेही त्या म्हणाल्या.
संस्थेचे
प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे
यांनी दर दोन तासानी
जेवावं की फक्त दोनदाच
जेवावं. याबाबत नेमका नियम
सांगण्याबाबत आवाहन केले. कार्यक्रमानंतर संस्थेचे माजी प्राचार्य प्रकाश
पोपळे यांनी मार्गदर्शन केले.
महिला
तक्रार निवारण समिती अध्यक्षा
डॉ. बेट्टेगिरी व रंजना
देवशी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन
केले तर डॉ. अनघा
जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीमखाना उपाध्यक्ष ए. बी.
दमकोंडवार, डॉ. जी. एम.
डक,
संध्या म्हेत्रे, सारिका दुटाळ, श्यामराज
यांनी प्रयत्न केले. शासकीय
तंत्रनिकेतनच्या मुलींनी या कार्यक्रमास
मोठया प्रमाणात सहभाग नोंदवला.
000000
No comments:
Post a Comment