Friday, July 12, 2019


मराठवाड्यात 122 मि.मी. पाऊस
नांदेड, परभणी, जिल्ह्यात पावसाचे आगमन
औरंगाबाद,दि. 12 (विमाका) :- मराठवाडा विभागात सकाळपर्यंतच्या 24 तासात नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात 15.57 मि.मी., लातूर जिल्ह्यात 14.43 मि.मी. तर परभणी जिल्ह्यात 12.77 मि.मी. पावसाची नोंद झाली. इतर जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. विभागात आजपर्यंतची पावसाची सरासरी 122.13 मि.मी. आहे.
विभागात आज नोंदला गेलेला जिल्हानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी दि.1 जून पासून आजवर पडलेल्या पावसाची सरासरी आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहेत.
औरंगाबाद जिल्हा- औरंगाबाद 0.10 (144.30), फुलंब्री 0.00 (205.75), पैठण 0.40 (68.37), सिल्लोड 0.00 (212.19), सोयगाव 0.00 (182.67), वैजापूर 0.60 (142.00), गंगापूर 0.00 (120.56), कन्नड 0.50 (130.25), खुलताबाद 0.00 (102.00). जिल्ह्यात एकूण 145.34 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जालना जिल्हा- जालना 1.88 (102.31), बदनापूर 0.00 (140.80), भोकरदन 0.00 (235.88), जाफ्राबाद 0.00 (152.80), परतूर 10.40 (118.10), मंठा 11.25 (132.50), अंबड 0.00 (90.14), घनसावंगी 2.86 (98.86),. जिल्ह्यात एकूण 133.92 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
परभणी जिल्हा- परभणी 14.50 (105.73), पालम 2.00 (90.33), पूर्णा 21.80 (124.20), गंगाखेड 2.75 (128.50), सोनपेठ 20.00 (138.00), सेलू 9.20 (74.00), पाथरी 12.67 (103.67), जिंतूर 20.33 (128.33), मानवत 11.67 (144.00), जिल्ह्यात एकूण पावसाची नोंद 115.20 मि.मी. झाली आहे.
हिंगोली जिल्हा- हिंगोली 3.71 (127.00), कळमनुरी 2.17 (162.92), सेनगाव 5.17 (112.17), वसमत 9.86 (76.71), औंढा नागनाथ 27.75 (179.25). जिल्ह्यात एकूण 131.61 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्हा- नांदेड 27.95 (116.25), मुदखेड 10.67 (126.67), अर्धापूर 11.33 (110.32), भोकर 2.25 (104.25), उमरी 9.33 (111.12), कंधार 8.50 (97.00), लोहा 3.20 (81.98), किनवट 12.29 (145.90), माहूर 7.25 (208.94), हदगाव 2.00 (119.71), हिमायत नगर 0.00 (100.33), देगलूर 34.67 (89.33), बिलोली 38.40 (135.80), धर्माबाद 12.33 (96.67), नायगाव 19.60 (115.60), मुखेड 49.29 (146.86), जिल्ह्यात एकूण 119.17 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
बीड जिल्हा- बीड 2.00 (101.18), पाटोदा 0.00 (128.75), आष्टी 0.00 (102.43), गेवराई 7.40 (73.60), शिरुर कासार 1.33 (70.00), वडवणी 10.50 (89.00), अंबाजोगाई 1.80 (68.40), माजलगाव 13.27 (127.93), केज 0.00 (95.71), धारुर 0.00 (95.00), परळी 3.20 (70.60), जिल्ह्यात एकूण 92.96 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.


लातूर जिल्हा- लातूर 0.00 (99.50), औसा 11.00 (67.14), रेणापूर 2.00 (103.75), उदगीर 28.57 (121.86), अहमदपूर 12.00 (164.33), चाकुर 14.60 (100.20), जळकोट 50.50 (175.50), निलंगा 16.75 (117.75), देवणी 8.83 (143.17), शिरुर अनंतपाळ 0.00 (103.67), जिल्ह्यात एकूण 119.69 मि.मी. पाऊस झाला आहे.
उस्मानाबाद जिल्हा- उस्मानाबाद 11.13 (111.38), तुळजापूर 11.29 (126.71), उमरगा 10.60 (153.20), लोहारा 23.67 (124.67), कळंब 0.33 (109.00), भूम 6.40 (118.60), वाशी 1.00 (137.00), परंडा 1.60 (72.40), जिल्ह्यात एकूण 119.12 मि.मी. पाऊस झाला आहे.
******

संभाजी हंबर्डे यांचा सेवानिवृत्ती निरोप



नांदेड, दि. 12 :- येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील संभाजी हंबर्डे हे नियत वयोमानानुसार जून 2019 मध्ये 23 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा नुकताच निरोप समारंभ महाविद्यालयात संपन्न झाला.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुनंदा रोडगे यांनी श्री. हंबर्डे यांच्या सेवेचा लाभ महाविद्यालयाला झाला असे स्पष्ट करुन त्यांचा स्वभाव, काम करण्याची सचोटी याबाबत माहिती दिली. तसेच महाविद्यालयातील डॉ. हारुन शेख, प्रा. सोळूंके, प्रा. नायगावकर, श्री. गच्चे, प्रा. डॉ. घोनशेटवाड यांनी हंबर्डे यांचे सहकार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. शाकेर, डॉ. मुरुमकर, हंबर्डे यांच्या पत्नी सौ. विमल हंबर्डे, मुलगा प्रा. संदीप व श्रीकृष्ण हंबर्डे, डॉ. कुलदीप पवार, डॉ. सजिवनी राठोड, श्रीमती राठोड, जाधव, ए. आर. जाधव, होळकर, सोनाळे आदी महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. घोनशेटवाड यांनी केले.
00000

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 15.57 मि.मी. पाऊस



नांदेड, दि. 12 :- जिल्ह्यात शुक्रवार 12 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 15.57 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 249.06 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 119.15 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 12.42 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 12 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 27.95 (116.26), मुदखेड- 10.67 (126.67), अर्धापूर- 11.33 (110.32), भोकर- 2.25 (103.95), उमरी- 9.33 (111.12), कंधार- 8.50 (100.49), लोहा- 3.20 (84.17), किनवट- 12.29 (154.24), माहूर- 7.25 (199.34), हदगाव- 2.00 (122.27), हिमायतनगर- निरंक (93.35), देगलूर- 34.67 (89.32), बिलोली- 38.40 (135.80), धर्माबाद- 12.33 (96.65), नायगाव- 19.60 (115.60), मुखेड- 49.29 (146.85). आज अखेर पावसाची सरासरी 119.15 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 1906.40) मिलीमीटर आहे.
00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...