अशोक चव्हाण यांचे शांततेचे आवाहन
Friday, November 12, 2021
अफवांवर विश्वास ठेवू नये नांदेडची परिस्थिती
पूर्ण नियंत्रणात
- जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे
नांदेड (जिमाका) दि. 12 :- त्रीपुरा येथील घटनेचे पडसाद नांदेडमध्ये उमटले. यात ज्या समाजकंटकांनी जाणीवपूर्णक कायदा हातात घेऊन विध्वंस करण्याचा प्रयत्न केला, अशा आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत असून परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असल्याचे माहिती नांदेडचे जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिली.
नांदेड येथील भाईचारा कोरोना काळातही अतिशय संयमाने लोकांनी जपला आहे. तो भाईचारा आणि संहिष्णूता सर्व नांदेडकर मानवी एकतेला जपतील अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अशा घटनांमध्ये गोरगरीब व ज्यांचे हातावर पोट आहे अशा लोकांना मोठे नुकसान सहन करावे लागते. परस्पर सहकार्याची भावना प्राधान्याने विचारात घेऊन सर्व नागरीक पुन्हा विश्वासाने जनजीवन सुरळीत सुरू करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
नांदेड येथे अतिरिक्त पोलीस दलाची टिम व सुरक्षिततेच्या सर्व यंत्रणा तत्पर दाखल झाले असून दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी सांगितले
000
प्रवासी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी
खाजगी वाहनांची उपलब्धता
·
नागरिकांची
गैरसोय टाळण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना
· प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विविध उपाययोजना
नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्ह्यातील सर्व आगारांना संपाच्या कालावधीत प्रादेशिक परिवहन विभागातर्फे पुढीलप्रमाणे खाजगी बस, स्कूलबस व जीप टाईप वाहने उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये दि. 9 नोव्हेंबर रोजी खाजगी बस 120, स्कूल बस 7, जीप टाईप वाहने 43, दि. 10 नोव्हेंबर रोजी खाजगी बस 126, स्कूल बस 7, जीप टाईप वाहने 52, दि. 11 नोव्हेंबर रोजी खाजगी बस 116, स्कूल बस 9, जीप टाईप वाहने 45, दि. 12 नोव्हेंबर रोजी खाजगी बस 122, स्कूल बस 17, जीप टाईप वाहने 63 याप्रमाणे एकुण खासगी बस 484, स्कूल बस 40 तर जीप टाइप वाहने 203 उपलब्ध करुन दिली आहेत.
संप कालावधीमध्ये जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक सुरळीत होण्यासाठी नांदेड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यानुषंगाने याबाबत प्रवाशांच्या काही तक्रारी असल्यास किंवा जादा भाडे दर आकारले असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 02462-259900 / mh26@mahatranscom.in यावर संपुर्ण तपशीलासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपाच्या कालावधीमध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी परिवहन विभागातील अधिकारी, पोलीस वाहतूक शाखेचे निरीक्षक, एस.टी. खात्यातील वरिष्ठ अधिकारी व खाजगी प्रवासी वाहतुक करणाऱ्या बस, स्कुल बस व इतर वाहन संघटना यांच्या प्रतिनीधीची बैठक आज आयोजित केली होती. प्रवाशांची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी परिवहन विभाग, पोलीस विभाग व एसटी महामंडळाचे आगार प्रमूख यांचे संयुक्त पथक स्थापन करण्यात आले आहे. तसेच नियंत्रक अधिकारी म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांची नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संघटनेने त्यांच्या विविध मागण्यांसदर्भात बेमुदत संप पुकारला असल्यामुळे राज्य शासनाच्या गृह विभाग (परिवहन) यांच्या 8 नोव्हेंबर 2011 रोजीच्या अधिसूचनेनुसार सर्व खाजगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपनीच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतुक करण्यास मान्यता दिली आहे. नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे 9 आगार असून 540 बसेसच्या माध्यमातून दररोज 80 हजार प्रवासी वाहतुक करतात. त्यामुळे 80 हजार प्रवाशांसाठी नियोजन करणे आवश्यक आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक यांनी नांदेड जिल्ह्यातील नांदेड, भोकर, देगलूर, बिलोली, किनवट, माहूर, हदगाव, मुखेड, कंधार येथील एस.टी. आगारामध्ये प्रत्यक्ष भेटी दिल्या. आगार प्रमुखांची भेट घेऊन प्रवाशांच्या वाहतुकीसाठी खाजगी बसेसची आवश्यकता असल्यास कळविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या, अशी माहिती नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
000000
नांदेड जिल्ह्यात 6 व्यक्ती कोरोना बाधित तर 3 कोरोना बाधित झाले बरे
नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 690 अहवालापैकी 6 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 6 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 437 एवढी झाली असून यातील 87 हजार 758 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 26 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 653 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 6 असे एकुण 6 बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
आज 26 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 16, खाजगी रुग्णालय 3 असे एकुण 26 व्यक्ती उपचार घेत आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची
संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 62 हजार 433
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 58 हजार 610
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 437
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 758
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 653
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-6
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-26
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.
कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि
प्रभावी उपाय आहे. “मिशन
कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड
लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या
नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर
दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000
वृत्त क्र. 1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...