Friday, November 12, 2021

 जैव तंत्रज्ञान दिन साजरा करण्याच्या सूचना   

नांदेड (जिमाका) दि. 12 :- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनानिमित्त  जैव तंत्रज्ञान दिन 14 नोव्हेंबर रोजी विद्यापीठ, शाळा-महाविद्यालयामार्फत साजरा करण्याबाबत आवश्यक त्या सूचना विकास आयुक्त (उद्योग) यांनी दिल्या आहेत. त्याअनुषंगाने दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. 

जिल्ह्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव असल्यामुळे सुरक्षेच्या उपाय योजनेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन तसेच केंद्र व राज्य शासनाने निर्गमीत केलेल्या सूचनांचे पालन करावे. केलेल्या या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही निर्देश दिले आहेत.

00000

 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...