Friday, November 12, 2021

प्रवासी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी

खाजगी वाहनांची उपलब्धता 


·         नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

·         प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विविध उपाययोजना 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्ह्यातील सर्व आगारांना संपाच्या कालावधीत प्रादेशिक परिवहन विभागातर्फे पुढीलप्रमाणे खाजगी बस, स्कूलबस जीप टाईप वाहने उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये दि. 9 नोव्हेंबर रोजी खाजगी  बस 120, स्कूल बस 7, जीप टाईप वाहने 43, दि. 10 नोव्हेंबर रोजी खाजगी  बस 126, स्कूल बस 7, जीप टाईप वाहने 52, दि. 11 नोव्हेंबर रोजी खाजगी  बस 116, स्कूल बस 9, जीप टाईप वाहने 45, दि. 12 नोव्हेंबर रोजी खाजगी  बस 122, स्कूल बस 17, जीप टाईप वाहने 63 याप्रमाणे एकुण खासगी बस 484, स्कूल बस 40 तर जीप टाइप वाहने 203 उपलब्ध करुन दिली आहेत. 

संप कालावधीमध्ये जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक सुरळीत होण्यासाठी नांदेड येथील प्रादेशिक परिव कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यानुषंगाने याबाबत प्रवाशांच्या काही तक्रारी असल्यास किंवा जादा भाडे दर आकारले असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाच दूरध्वनी क्र. 02462-259900 / mh26@mahatranscom.in यावर संपर्ण तपशीलासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

संपाच्या कालावधीमध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी परिवहन विभागातील अधिकारी, पोलीस वाहतूक शाखेचे निरीक्षक, एस.टी. खात्यातील वरिष्ठ अधिकारी खाजगी प्रवासी वाहतुक करणाऱ्या बस, स्कुल बस इतर वाहन संघटना यांच्या प्रतिनीधीची बैठक आज आयोजित केली होती. प्रवाशांची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी परिवहन विभाग, पोलीस विभाग एसटी महामंडळाचे आगार प्रमूख यांचे संयुक्त पथक स्थापन करण्यात आले आहे. तसेच नियंत्रक अधिकारी म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांची नियुक्ती केली आहे. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संघटनेने त्यांच्या विविध मागण्यांसदर्भात बेमुदत संप पुकारला असल्यामळे राज्य शासनाच्या गृह विभाग (परिवहन) यांच्या 8 नोव्हेंबर 2011 रोजीच्या अधिसूचनेनुसार सर्व खाजगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपनीच्या मालकीच्या बसेस मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतुक करण्यास मान्यता दिली आहे. नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे 9 आगार असून 540 बसेसच्या माध्यमातून दररोज 80 हजार प्रवासी वाहतुक करतात. त्यामुळे 80 हजार प्रवाशांसाठी नियोजन करणे आवश्यक आहे. 

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक यांनी नांदेड जिल्ह्यातील नांदेडभोकर, देगलूर, बिलोली, किनवटमाहूरहदगावमुखेडकंधार येथील एस.टी. आगारामध्ये प्रत्यक्ष भेटी दिल्या. आगार प्रमुखांची भेट घेऊन प्रवाशांच्या वाहतुकीसाठी खाजगी बसेसची आवश्यकता असल्यास कळविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या, अशी माहिती नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

000000







No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...