Wednesday, February 12, 2020


     जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 
नांदेड, दि. 12 :- जिल्ह्यात गुरुवार 27 फेब्रुवारी 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात गुरुवार 13 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते गुरुवार 27 फेब्रुवारी 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000


नायगाव खै. पंचायत समितीची शुक्रवारी आमसभा
नांदेड, दि. 12 :- शासनाने पंचायत राज समितीच्या दिलेल्या सुचनेप्रमाणे पंचायत समिती स्तरावर नायगाव खै. पंचायत समितीची आमसभा आमदार राजेश पवार यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवार 14 फेब्रुवारी 2020 रोजी सामाजिक न्याय विभाग मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह निवासी शाळा (हरणटेकडी) नायगाव खै. येथे तहसिल कार्यालयाच्या जवळ आयोजित करण्यात आली आहे. यावेळी पंचायत समिती सभापती सौ. प्रभावती विठ्ठलराव कत्ते यांची उपस्थित राहणार आहे. या सभेस उपस्थित रहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी पंचायत समिती नायगावं खै. यांनी केले आहे. 
या सभेत घ्यावयाच्या विषयाची विषयसुची पुढीलप्रमाणे राहील. पं. स. नायगाव खै. सन 2013-14 च्या आमसभा अहवालावरील अनुपालन वाचन. सन 2018-19 मध्ये केलेल्या योजना व कामाचा आढावा. सन 2019-2020 मधील कामाचा आढावा. मा. अध्यक्षाच्या परवानगीने आयत्यावेळेचे विषय राहतील, असे गटविकास अधिकारी पंचायत समिती नायगाव यांनी कळविले आहे.
00000


धर्माबाद पंचायत समितीची आज आमसभा
नांदेड, दि. 12 :-  धर्माबाद पंचायत समितीची सन 2019-2020 या वित्तीय वर्षाची आमसभा आमदार राजेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार 13 फेब्रुवारी 2020 रोजी महेश्वरी भवन धर्माबाद (नगरपालिका धर्माबाद कार्यालयाच्या बाजुस) दुपारी 2 वा. होणार आहे. यावेळी पंचायत समितीचे सभापती कागेरु मारोती यांची उपस्थित राहणार आहे. या सभेस उपस्थित रहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी पंचायत समिती धर्माबाद यांनी केले आहे.  
या सभेत घ्यावयाच्या विषयाची विषयी सुची पुढीलप्रमाणे आहे. पंचायत समिती धर्माबादचे सन 2014-2015 च्या आमसभा अहवालावरील अनुपालन वाचन व त्यास मान्यता देणे. सन 2015-2016 ते 2019-2020 मध्ये मंजूर केलेल्या योजना व कामाचा आढावा घेणे. सन 2015-2016 ते 2018-2019 च्या अंदाजपत्रकास कार्योत्तर मान्यता देणे व आगामी सन 2019-2020 च्या सुधारीत व 2020-2021 च्या मुळ अंदाज पत्रकाचे वाचन व त्यास मान्यता देणेबाबत. तसेच अध्यक्ष यांच्या अनुमतीने ऐनवेळीची विषय राहील, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000


जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली
माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक,
संस्थाचालकांची शुक्रवारी नांदेड येथे बैठक
नांदेड, दि. 12 :-  इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व शांततापूर्ण वातावरणात पार पाडणे आणि बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा 2012 याविषयी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील संस्थाचालक, सर्व माध्यमाच्या व्यवस्थापनाच्या शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि परीक्षा केंद्र संचालक (दहावी, बारावी परीक्षा) यांची बैठक शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियमजवळ नांदेड येथे शुक्रवार 14 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 12 वा. आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड तसेच पोलीस अधीक्षक नांदेड हे उपस्थित राहून दहावी व बारावी परीक्षा 2020 बाबत मार्गदर्शक सुचना देणार आहे. तसेच बैठकीत बाललैंगिक अत्याचार विरोधी कायदा 2012 याविषयीही चर्चा केली जाणार आहे.
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व संस्थांचालक अध्यक्ष, सचिव, सर्व माध्यमाच्या व्यवस्थापनाच्या शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि परीक्षा केंद्रसंचालक (एसएससी व एसएससी परीक्षा) यांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्रा/मा) जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.  
000000


"पंतप्रधान किसान" च्या लाभार्थ्यांना
पंधरा दिवसात पीक कर्ज – जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 12 :- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे (पी. एम. किसान) लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने नवीन पाऊल उचलले आहे. या लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत पीक कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना 15 दिवसांत पीक कर्ज मिळणार आहे. या मोहिमेत जिल्हयातील पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचे नियोजन असून यासाठी शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी घेतलेल्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
केंद्र सरकारच्या अर्थविषयक सेवा विभागाने याबाबतच्या सूचना बँकांना दिल्या असून बँकांकडून त्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
जिल्हयात पंतप्रधान किसान निधीचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीक कर्ज घेतलेले नाही त्या शेतकऱ्यांना सुलभरीत्या 15 दिवसांत पीक कर्ज देण्यासाठी मोहीम राबवण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेत शेतकऱ्यांना सुटसुटीत अर्ज करता यावा यासाठी आयबीए संस्थेने एक पानी अर्जाचा नमुना सर्व बँकांना उपलब्ध करून दिला आहे. या अर्जासोबत शेतकऱ्यांना सातबारा व शेतीचे उतारे तसेच पीक कर्ज नसल्याबाबतचे घोषणापत्र दिल्यानंतर 15 दिवसांत पीक कर्ज देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान निधी योजनेचा लाभ मिळत असलेल्या बँकेशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
00000


बोर्डाच्या परीक्षेत गैर प्रकार केल्यास
गय केली जाणार नाही – जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  
नांदेड, दि. 12 :- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक परीक्षा अर्थात इयत्ता दहावी व बारावीच्या सन 2020 च्या परीक्षा 18 फेब्रुवारी ते 23 मार्च 2020 या कालावधीत सुरु होणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यावर्षीची दहावी व बारावीच्या परीक्षा पूर्णत: कॉपीमुक्त वातावरणात पार पाडावी तसेच परीक्षेमध्ये गैर प्रकारला आळा घालण्यात यावा अशा सुचना दिल्या. एखाद्या परीक्षा केंद्रावर गैर प्रकार झाल्याचे आढळल्यास संबंधीत केंद्र संचालक व पर्यवेक्षक यांच्याविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल. तसेच गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही देखील करण्यात येईल. एखादा परीक्षा केंद्रावर सतत गैर प्रकार होत असल्यास संबंधीत परीक्षा केंद्र तात्काळ बंद करण्यात येईल. परीक्षेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, केंद्रसंचालक, गटशिक्षणाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी, अशीही सुचना शिक्षण विभागाला यावेळी दिली.
000000


दहावी, बारावी परिक्षेसाठी
राज्य मंडळ स्तरावरुन समुपदेशक नियुक्त
नांदेड, दि. 12 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी लेखी परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी लेखी परीक्षा 3 ते 23 मार्च 2020 या कालावधीत लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आली आहे.  
परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढून मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याकरीता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. 8421741931, 7249005260, 9619248229, 9356056300,9766698537, 9987318490, 9673121535, 9930638165, 7387501892, 9356089569 या भ्रमणध्वनी क्रमांक दिलेला समुपदेशक परीक्षा कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. मात्र विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकासंबंधीत प्रश्न इत्यादीबाबत समुपदेशकांना विचारणा करु नये, असे आवाहन राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
00000


दहावी, बारावी परीक्षेसाठी हेल्पलाईन
नांदेड, दि. 12 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता दहावीसाठी 02382- 251633 व इयत्ता बारावीसाठी 02382- 251733 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.
विद्यार्थी, पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनी क्रमांकावर किंवा समुपदेशकाचे नाव बी. एम. कच्छवे 9371261500 व बी. एम. कारखेडे 9860912898 हा सुधारीत क्रमांकावर किंवा 8669128735 या क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...