Wednesday, February 12, 2020


दहावी, बारावी परिक्षेसाठी
राज्य मंडळ स्तरावरुन समुपदेशक नियुक्त
नांदेड, दि. 12 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी लेखी परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी लेखी परीक्षा 3 ते 23 मार्च 2020 या कालावधीत लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आली आहे.  
परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढून मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याकरीता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. 8421741931, 7249005260, 9619248229, 9356056300,9766698537, 9987318490, 9673121535, 9930638165, 7387501892, 9356089569 या भ्रमणध्वनी क्रमांक दिलेला समुपदेशक परीक्षा कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. मात्र विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकासंबंधीत प्रश्न इत्यादीबाबत समुपदेशकांना विचारणा करु नये, असे आवाहन राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...