Wednesday, February 12, 2020


बोर्डाच्या परीक्षेत गैर प्रकार केल्यास
गय केली जाणार नाही – जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  
नांदेड, दि. 12 :- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक परीक्षा अर्थात इयत्ता दहावी व बारावीच्या सन 2020 च्या परीक्षा 18 फेब्रुवारी ते 23 मार्च 2020 या कालावधीत सुरु होणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यावर्षीची दहावी व बारावीच्या परीक्षा पूर्णत: कॉपीमुक्त वातावरणात पार पाडावी तसेच परीक्षेमध्ये गैर प्रकारला आळा घालण्यात यावा अशा सुचना दिल्या. एखाद्या परीक्षा केंद्रावर गैर प्रकार झाल्याचे आढळल्यास संबंधीत केंद्र संचालक व पर्यवेक्षक यांच्याविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल. तसेच गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही देखील करण्यात येईल. एखादा परीक्षा केंद्रावर सतत गैर प्रकार होत असल्यास संबंधीत परीक्षा केंद्र तात्काळ बंद करण्यात येईल. परीक्षेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, केंद्रसंचालक, गटशिक्षणाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी, अशीही सुचना शिक्षण विभागाला यावेळी दिली.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...