Friday, October 20, 2023

 सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणी समवेत

सामाजिक बांधिलकी व जबाबदारीचे भान महत्त्वाचे
- राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ. किरण जाधव
नांदेड (जिमाका), दि. 20 :- लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात येता यावे, त्यांची उन्नती व्हावी यासाठी घटनादत्त तरतुदीतून योजना साकारतात. याचबरोबर प्रशासनात अधिक पारदर्शकता यावी यासाठी माहितीच्या अधिकारासह दप्तर दिरंगाई कायदा, राज्य सेवा हक्क, नागरिकांची सनद आदीद्वारे शासन प्रयत्नशील असते. तथापि जोपर्यंत प्रत्येक अधिकारी या कायदाच्यापलीकडे जाऊन सेवक म्हणून आपले सामाजिक उत्तरदायीत्व व कर्तव्य आहे या भूमिकेतून जबाबदारी पार पाडणार नाही तोपर्यंत अपेक्षीत बदल साध्य होणार नाहीत, असे प्रतिपादन राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी केले. नांदेड जिल्ह्यात विविध विभागांनी सेवा हक्क जपणुकीच्यादृष्टिने लक्षवेधी काम केल्याबद्दल त्यांनी कौतुकही केले.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कायदाच्या अंमलबजावणी व सेवा महिना कालावधीत केलेल्या कामांची आढावा बैठक आज नियोजन भवन येथे आयुक्त डॉ. किरण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सेवाहमी कायदाअंतर्गत जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा मांडला.
कोणतीही नस्ती दहा दिवसापेक्षा जास्त काळ एकाच कक्षाकडे राहणार नाही यासाठी दप्तर दिरंगाई कायदा 2006 मध्ये आणला. याचा अतिशय चांगला परिणाम झाला. यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईही झाली. यात अधिक पारदर्शकता आणण्याबरोबर गतवर्षी सर्व सेवा ऑनलाईन करण्याचा शासनाने निर्णय घेतला. यानुसार महाराष्ट्रातील सेवा अधोरेखीत होऊन त्या ऑनलाईन करण्याच्या प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत आहेत. यात ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करून लोकाभिमूख प्रशासनाला मूर्तरूप येत असल्याचे आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी सांगितले.
लोकांच्या सेवाविषयक कार्यालयीन दस्तऐवजांना कायद्याच्यादृष्टिनेही महत्त्व आहे. अनेक दस्तऐवज हे न्यायालयीन प्रक्रियेचाही भाग ठरतात. यात शालेय टिसीच्या उताऱ्यांपासून जन्मनोंदी सारख्या रजिस्टरपर्यंत बाबींचा समावेश होतो. जी दस्तऐवज 50 वर्षांपूर्वीपेक्षा जुनी आहेत, अथवा जी नष्ट व्हायला आली आहेत अशा शासकीय दस्तऐवजांचे डिजीटलायजेशन झाले पाहिजे. विशेषत: शिक्षण विभागाने यात लक्ष घालण्याची गरज आहे. कृषि विभागातही जी सेवाकेंद्र आहेत ती सेवाकेंद्र अधिसुचीत करून सेवाहक्क कायद्यात अंतरर्भूत करण्यास कोणतीच अडचण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
00000
छाया :- पुरुषोत्तम जोशी







 उर्ध्व पेनगंगा प्रकल्प (इसापूर धरण)

रब्बी हंगामाच्या सिंचनासाठी पाण्याचे नियोजन

 

नांदेड (जिमाका), दि. 20 :- प्रतीवर्षी उर्ध्व पेनगंगा प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये प्रकल्पावरील सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येते. यावर्षी प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप झाली नसल्याने, आगामी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहुन 15 ऑक्टोबर 2023 रोजीच्या इसापूर धरणातील (809.38 दलघमी) 83.95 टक्के इतक्या जिवंत पाणीसाठ्यावर आधारीत उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्यासाठीचे पाणी राखीव ठेऊन, रब्बी हंगामात चार (4) पाणीपाळ्या देण्याचे नियोजित आहे. प्रकल्प क्षेत्रातील सर्व जनतेस / लाभधारकांनी पाणी मागणी अर्ज विहीत कालावधीत सादर करून, जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी केले.

 

प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांना व इसापूर धरण जलाशय, अधिसुचित नदी-नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही व मंजूर उपसा सिंचन योजना धारकांना कळविण्यात येते की, रब्बी हंगामातील हंगामी, दुहंगामी तसेच दुहंगामातील इतर उभी पिके या पिकांसाठी कालव्याचे प्रवाही/कालव्यावरील उपसा, नदी-नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यायचे असल्यास मागणी अर्ज नमुना 7, 7-अ मध्ये भरून 31 ऑक्टोंबर 2023 पुर्वी संबंधित शाखा कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील. हंगामी व दुहंगामी पिकांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत.

 

सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच विहीत नमुन्यात प्राप्त मागणी अर्ज संख्या विचारात घेऊनच प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाणीपाळी दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू करण्याचे अपेक्षित नियोजन आहे.

उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावीत कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल.

 

रब्बी हंगाम सन 2023-24 मधील पाणीपाळीचा प्रस्तावित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. आवर्तन क्र. 1 दिनांक 5 नोव्हेंबर 2023 पासून 25 नोव्ह्रेंबर 2023 पर्यंत कालावधी 20 दिवस असेल. आवर्तन क्र. 2 दिनांक 5 डिसेंबर 2023 ते 25 डिसेंबर 2023 पर्यंत कालावधी 20 दिवस. आवर्तन क्र. 3 दिनांक 5 जानेवारी 2024 ते 25 जानेवारी 2024 पर्यंत कालावधी 20 दिवस. आवर्तन क्र. 4 दि. 5 फेब्रुवारी 2024 ते 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत कालाधी 20 दिवस राहील. पाऊस व आकस्मिक कारणांमुळे पाणीपाळी संख्या, कालावधी व तारखांमध्ये बदल होऊ शकतो, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी सांगितले.  

00000

 रानभाजी व मराठवाडा खाद्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 ·     रानभाज्यांनी  वेधले सर्वांचे लक्ष

 

नांदेड (जिमाका) दि. 20 : -मराठावाडा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रानभाजी व मराठवाडा खाद्य महोत्सवाचे आयोजन 19 व 20 ऑक्टोबर रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय परीसरात करण्यात आले होते. या महोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले. या महोत्सवात शेतकऱ्यांनी दुर्मीळ असलेल्या सर्व रानभाज्या व उत्पादने विक्री व प्रदर्शनासाठी ठेवले होते. या रानभाजी व मराठवाडा खाद्य महोत्सवास शेतकऱ्यांचा व शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

या रानभाजी महोत्सवात श्रावणात उपलब्ध असणाऱ्या बहुतांश रानभाज्या येथे विक्रीसाठी उपलब्ध होत्या. यात प्रामुख्याने कर्टुलीशेवगाघोळचवळीबांबूचे कोंबदिंडाटाळकापिंपळमायाळपाथरीअळूकपाळफोडीकुरडूउंबरचिवळभुई आवळी इ. कंदभाज्‍या व सेंद्रीय हिरव्‍या भाज्‍याफळभाज्‍या व फूलभाज्‍या व सीताफळड्रँगन फ्रुटरानफळांची व शेतकऱ्यांनी विविध उत्‍पादीत केलेली उत्पादनेसेंद्रीय उत्‍पादनेगुळहळदलाकडी घाण्‍याचे तेलगहूसर्व प्रकारच्या डाळी व भुईमुगाच्‍या शेंगामुगाच्‍या शेंगा व केळीचे वेफर्स प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते. या महोत्सवात  70 स्टॉल धारकांनी सहभाग नोंदविला असून 15 लाख रुपयांची उलाढाल  झाली आहे.

 

या महोत्सवात रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या पाककलेत स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये मिक्स लाडूडोरले टोमॅटो चटणीकुंदरु भाजी भाकरीखारे शंकरपाळेपांढरी वसु मानचुरियनगोड खाजाछोटी घोळ भाजी भाकरीप्रोटीन ढोकळाउपवासाचा पराठाशेंगदाणा लाडूमोड आलेले धान्यपासून पराठे हे पदार्थ बनविण्यात आले होते. या पाककलेसाठी परिक्षक म्हणून प्रज्ञा दुधामल यांची उपस्थिती होती.

 

सहभागी स्पर्धकांमधून प्रथमव्दितीय व तृतीय क्रमांक निवड करण्यात आले. प्रथम क्रमांक पांढरी वसु मानचुरियन हा पदार्थ बनविणाऱ्या श्रीमती मिना व्यंकटी जाधवईजळी ता. मुदखेड यांना तर दुसरा क्रमांक श्रीमती वनिता दिगांबर कदमता. मुदखेड यांनी कुंदरु भाजी भाकरीसाठी देण्यात आला,  तिसरा क्रमांक श्रीमती अर्चना प्रदिप कसबेमुदखेड यांना डोरले टोमॅटोची चटणी पदार्थ बनवली याबाबत देण्यात आला.  या विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक स्वरूपात प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. उर्वरित सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन पर प्रमाणपत्र देण्यात आले.

 0000





 मतदार यादीत नाव नोंदणीसाठी

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

·         नाव नोंदविण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 20 :- मतदार यादी विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम 2024 अंतर्गत दिनांक 4 व 5 नोव्हेंबर, 25 व 26 नोव्हेंबर 2023 या कालावधीत विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या विशेष शिबिराचा लाभ घेवून आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

अधिकाधिक मतदारांना त्यांची नाव नोंदणी करुन घेण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये नागरिकांकडून दावे व हरकती म्हणजेच नागरिकांकडून मतदार नोंदणीचे, मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्तीचे वा वगळणीचे अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

या विशेष शिबिरात मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून नागरिकांचे मतदार नोंदणी, दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी हे काही विशेष शिबिरांना भेटी देवून तेथील कामकाजाचे पर्यवेक्षण व मार्गदर्शन करतील. तरी नागरिकांनी या शिबिरात आपल्या नावाची मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे निवडणूक विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

 रब्बी हंगामासाठी 31 ऑक्टोबरपूर्वी पाणी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 20 :-  निम्न मानार मोठा प्रकल्प, करडखेड मध्यम प्रकल्प, कुंद्राळा मध्यम प्रकल्प, पेठवडज मध्यम प्रकल्प, कुदळा मध्यम प्रकल्प व 50 लघु प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. या पाणीसाठ्याच्या अनुषंगाने रब्बी हंगाम सन 2023-24 पूर्ण क्षमतेने राबविण्याचे नियोजित आहे. या नियोजनास आवश्यकतेनुरुप कालवा सल्लागार समितीची मंजूरी मिळाल्यानंतर पाणीपाळी सोडण्याची कार्यवाही करण्यात येईल. लाभधारकांनी 31 ऑक्टोबर 2023 पर्यत पाणी मागणी अर्ज विहित नमुन्यात नमुना नं. 7 भरुन शाखा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग () चे उप कार्यकारी अभियंता एम.एम.शेख यांनी केले आहे.

 

सर्व लाभधारकांनी हंगाम सुरू होण्यापूर्वी पुढील अटी व शर्तीची पूर्तता होणे आवश्यक आहे. रब्बी हंगामी, दुहंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही / मंजूर उपसा / मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी / नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात नमूना नं. 7 मध्ये  दिनांक 31 ऑक्टोबर 2023 पूर्वी  संबंधित शाखा कार्यालयात दाखल करावेत. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आर च्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणा-या व पाणी अर्ज नामंजुर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रीक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.

 

लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जावून ठाराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास या कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. दि. 29 मार्च 2022 च्या शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकारण्यात येतील. थकित व चालु पाणीपट्टी वेळेत भरावी. शेतचारी स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकांची राहील. उडाप्याच्या / अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणी पाळी सुरू असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टर द्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले आहे त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी मागणी, वसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही. नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) कार्यकारी अभियंता नांदेड कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...