Monday, August 24, 2020

 

 113 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

118 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू   

 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- सोमवार 24 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 113 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 118 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 67 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 51 बाधित आले. 

आजच्या एकुण 545 अहवालापैकी  359 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 5 हजार 150 एवढी झाली असून यातील 3 हजार 328 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 598 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 143 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.  

रविवार 23 ऑगस्ट 2020 रोजी जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील आंतरगाव येथील 65 वर्षाचा पुरुष, शक्तीनगर नांदेड येथील 25 वर्षाची एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णपुरी नांदेड येथे तर सहयोगनगर नांदेड येथील 65 वर्षाच्या पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर सोमवार 24 ऑगस्ट 2020 रोजी प्रगतीनगर नांदेड येथील 68 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड येथे तर शिवाजीनगर नांदेड येथील 78 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड यांचा मृत्तांमध्ये समावेश आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 2 , हदगाव कोविड केअर सेंटर येथील 4, लोहा कोविड केअर सेंटर येथे 5, मुदखेड कोविड केअर सेंटर 7, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 71, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर 19, खाजगी रुग्णालय 4, गोंकुदा कोविड केंअर सेटर 1,

113 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.   

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 18, नायगाव 2, देगलूर तालुक्यात 4, कंधार तालुक्यात 2, धर्माबाद तालुक्यात 1, परभणी 2, लोहा तालुक्यात 5, हदगाव तालुक्यात 6, किनवट तालुक्यात 1, मुखेड तालुक्यात 24, हिंगोली 2 असे एकुण 67 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपाक्षेत्र 13, नांदेड ग्रामीण 1, अर्धापूर तालुक्यात 13, देगलूर तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 1, हदगाव तालुक्यात 2, किनवट तालुक्यात 5, मुखेड तालुक्यात 1, मुदखेड तालुक्यात 8, बिलोली तालुक्यात 4, धर्माबाद तालुक्यात 2  असे एकुण 51 बाधित आढळले.  

जिल्ह्यात 1 हजार 598 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 174, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 667, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 53, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 37, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 39, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 126,  देगलूर कोविड केअर सेंटर येथे 36, लोहा कोविड केअर सेंटर येथे 45, हदगाव कोविड केअर सेंटर 39, भोकर कोविड केअर सेंटर 12,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 22,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 24, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 24, मुदखेड कोविड केअर सेटर 27,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 9, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 20, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 72,उमरी कोविड केअर सेंटर 36, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 2, बारड कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालयात 128 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 4, निजामाबाद येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 51 हजार 164,

घेतलेले स्वॅब- 35 हजार 248,

निगेटिव्ह स्वॅब- 28 हजार 78,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 118,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 5 हजार 150,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-21,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 17,

एकूण मृत्यू संख्या- 188,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 3 हजार 328,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 598,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 268, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 143.  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

 

 

 

 सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री

संजय बनसोडे यांचा दौरा

नांदेड (जिमाका) दि. 24 :- राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) रोजगार हमी, भूकंप व पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

मंगळवार 25 ऑगस्ट 2020 रोजी लातूर येथून मोटारीने चाकूर-शिरुर ताजबंद-मुखेड-नायगाव मार्गे सकाळी 9 वा. नांदेड येथे आगमन. सकाळी 10.35 वा. नांदेड येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

 

केवळ योजना म्हणून नव्हे तर

भावनात्मक नाळ जुळल्याने लेंडी प्रकल्पासाठी मी कटिबद्ध

-         पालकमंत्री अशोक चव्हाण 


नांदेड (जिमाका) दि. 24 :- महाराष्ट्रातल्या सिंचनाच्यादृष्टिने स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी आयुष्यभर एक दूरदृष्टी बाळगली. या दूरदृष्टीतूनच  जायकवाडीचा प्रकल्प आकारास आला. इथल्या भुमिपूत्रांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी सदैव कर्तव्य दक्षता बाळगली. त्याच दूरदृष्टीतून आपल्या नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूरच्या काठावर असलेल्या हजारो शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने लेंडी प्रकल्पाचे त्यांनी नियोजन केले. याच्या भूमिपुजनाला त्यांच्या समवेत मीही उपस्थित होतो. यामुळे मी या प्रकल्पाकडे केवळ योजना म्हणून नाही तर त्यांनी जी बांधिलकी इथल्या शेतकऱ्यांप्रती जपली तीच बांधिलकी आणि कर्तव्य दक्षता स्विकारुन या प्रकल्पासाठी नेहमी हळवा होतो या शब्दात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक  चव्हाण यांनी लेंडी प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सर्वांच्या भावनेला साद घालत कटिबद्धता व्यक्त केली. 

लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी समजून घेऊन त्या शासन स्तरावर कायद्याच्या चौकटीत सोडवून त्यांना अधिकाधिक न्याय कसा देता येईल या उद्देशाने आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनात व्यापक बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार डॉ. तुषार राठोड, माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, संघर्ष समितीचे अध्यक्ष हणमंतराव खंडागळे, राजू पाटील, प्रकल्पग्रस्त गावांचे सरपंच, नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, विष्णुपुरी प्रकल्पाचे उपअभियंता आर. एम. देशमुख यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

तात्विक पातळीवर धरणांबाबत कदाचित कोणाच्या वेगवेगळ्या भुमिका असू शकतात. या भूमिकांच्या पलिकडे जेंव्हा आपण शेतकरी म्हणून विचार करतो तेंव्हा ज्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळाले नाही त्या शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात जर आणायचे असेल तर त्यांना सिंचनाच्या सुविधा या जिथेजिथे शक्य होतील त्या-त्या ठिकाणी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत याला आम्ही आजवर प्राधान्य दिले आहे. जायकवाडीमुळे आज जो मराठवाड्यातला बहुतांश भाग ओलिता खाली आला आहे, ज्यामुळे औरंगाबाद सारख्या महानगरासह कित्येक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे त्या प्रकल्पासाठी कधी काळी स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी लोकांचे वाट्टेल ते बोलही ऐकुण घेतले. पाण्याचे महत्व पटल्यानंतर याच लोकांनी त्यांना उचलून घेत माळा घातल्या या शब्दात त्यांनी आठवणींना उजाळा दिला. 

लेंडी प्रकल्पाचे काम हे पुर्णत्वाच्या टप्प्यावर आले आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला या प्रकल्पातून थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 15 हजार 710 हेक्टर जमिन ओलिता खाली येणार आहे. यातील 62 टक्के पाणीसाठा म्हणजेच 100.13 दशलक्ष घन मीटर पाणी हे देगलूर, मुखेड या भागातील पाण्या पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. या प्रकल्पावर लिफ्ट इरिगेशन सारख्या योजना साकारल्यास हा परिघ भविष्यात आणखी विस्तारता येणार आहे. 70 टक्के काम आजच्या घडिला पूर्ण झाले असून दगडी सांडव्याचे कामही 75 टक्के पुर्ण झाले आहे. हे काम जितक्या लवकर पूर्ण होईल तितक्या लवकर अनेक दशकांपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल,  त्यांच्या शेताला पाणी मिळेल. जवळपास 20 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून उच्च कृषि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुखेड सारख्या पाणीटंचाईच्या भागातील शेती सुजलाम सुफलाम होईल. या भागातील आर्थिक विकासाचे मार्ग यातच दडलेले असल्याने सर्वांनी मिळून हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आता एक सकारात्मक भुमिका घेऊन पुढे आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. 

सन 1984-85 मध्ये या प्रकल्पाची किंमत साधारणत: 55 कोटीच्या घरात होती. ती आता विविध कारणांमुळे प्रकल्प रेंगाळल्यामुळे 2200 कोटीच्या घरात पोहचली आहे. या प्रकल्पास जी दिरंगाई होत आहे त्याबद्दल मी दु:खी असून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भुमिका व्यक्तीगत पातळीवर मला मान्य आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या आहेत त्या सर्व पूर्ण करण्यास प्रशासन तयार आहे. शेतकऱ्यांनी शासनाचे नियम व न्यायालयीन निवाडे लक्षात घेऊन कुठेतरी विश्वासाने प्रकल्पाला साथ दिली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रकल्पग्रस्तांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या मंत्रालयीन पातळीवर सोडविण्यासाठी लवकरच जलसंपदा मंत्री यांच्या समवेत बैठक घेऊ असेही त्यांनी सांगितले. 

हा प्रकल्प आता कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केल्याशिवाय गत्यंतर नाही. प्रकल्पग्रस्तांनीही कायद्याच्या चौकटी लक्षात घेता शासनाला पूर्ण सहकार्य करणे आवश्यक असल्याचे मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी सांगितले. विश्वासर्हतेच्या पातळीवर यातील अनेक मागण्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील अशी भुमिका विशद करत त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी निवेदन दिले. शासन पातळीवर ज्या प्रक्रिया सुरु आहेत त्याबद्दल त्यांनी विश्वासही व्यक्त केला.

पुनर्वसनासाठी देगलूर उपजिल्हादंडाधिकारी

यांच्या अध्यक्षतेखाली एका गटाची निर्मिती

लेंडी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी मी अधिक दक्ष आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पूनर्वसनासंदर्भातील भुमिकेशी मी पूर्णत: सहमत आहे. जी गावे पुनर्वसन केली जात आहेत त्या गावातील प्रत्येक काम हे गुणवत्ता पूर्ण व्हावे व त्यात नाविन्य असावे यासाठी देगलूरच्या उपजिल्हादंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक गटाची निर्मिती केली जाईल असेही त्यांनी सुचित केले. या गटातील सर्व सदस्य हे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या, गावकऱ्यांच्या लोकसहभागातून, त्यांना विश्वासात घेऊन विकास कामे पूर्ण करतील असेही त्यांनी स्पष्ट केले. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यापासून रस्ते व इतर नागरी सुविधा या सर्व कामांचा अंतर्भाव झाला पाहिजे, असे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. प्रकल्पाच्या पुर्णत्वाबाबत दरमहिन्यांला आढावा बैठक घेऊन आता हे काम रेंगाळत ठेवणे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही असा इशाराही त्यांनी दिला.  

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...