Wednesday, November 8, 2023

 पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार

मेळाव्याचे 16 व 17 नोव्हेंबर रोजी आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 16 व 17 नोव्हेंबर 2023 रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दु.क्र.02462251674 यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

 या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपण्याकडून मुलाखत घेण्यात येणार आहेत. बेरोजगार उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर नोंदणी करावी. उमेदवारांना आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करुन घेता येईल. या संधीचा लाभ जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी घ्यावाअसेही  जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविले आहे.

या रोजगार मेळाव्यात 10 वी पास/ नापास उमेदवारांसाठी आर्यन असेथिंटीक प्रा.ली. नांदेड या कंपनीत टेलर या 10 रिक्त पदासाठी भरती करण्यात येणार आहे. तसेच नवकिसान बायो प्लानेटीक लि. कंपनीत सेल्स रिप्रझेंटिव्ह 30 रिक्त पदासाठी 10 वी, 12 व पदवीधर उमेदवारांसाठी व फक्त पदवीधर मुलींसाठी फ्रंन्ट ऑफिस एक्सक्युटीव्ह या एका पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी नांदेड, लातूर , परभणी, सोलापूर या ठिकाणासाठी भरती करण्यात येणार आहे. लाईफ इन्शुरन्स कॉ. ऑफ इंडिया मध्ये लाईफ इन्सुरन्स ॲडव्हायझर 25 रिक्त पदासाठी इ. 10,12 व पदवीधर उमेदवारांना धर्माबाद, उमरी, नायगाव या ठिकाणासाठी भरती करण्यात येणार आहेत. तरी बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावाअसे जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000  

 मातंग व तत्सम पोट जातीतील व्यक्तींनी 20 नोव्हेंबरपर्यत

महामंडळाच्या कार्यालयास संपर्क करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील मांग, मिनी, मादीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादीगा या जातीतील ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, अशा व्यक्तीनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या नांदेड कार्यालयाशी 20 नोव्हेंबर 2023 पर्यत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक टि. आर. शिंदे यांनी केले आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील जमीनधारकांनी महामंडळाच्या कार्यालयात  येवून अर्जासोबत शेतीचा सातबारा, जातीचा दाखला, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो या माहितीसह 20 नोव्हेंबरपर्यत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेच्या समोर, नांदेड येथे कार्यालयीन वेळेत अर्जासह कागदपत्रे सादर करावीत, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

0000

 पै. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त

राष्ट्रीय शिक्षा दिवस साजरा करावा

नांदेड (जिमाका) दि. 8 :- पै. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती दिनानिमित्ते 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षा दिवस म्हणून साजरा करण्याच्या सूचना शासन स्तरावरुन आहेत.

शासनाने निर्गमित केलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन सर्व कार्यालयानी राष्ट्रीय शिक्षा दिवस साजरा करावा तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

 जिल्हा युवा महोत्सवात अधिकाधिक युवकांच्या

सहभागासाठी सूक्ष्म नियोजन आवश्यक

-  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत  

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- युवकांच्या सर्वागिण विकासासाठी व त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने युवा महोत्सवाचे 21 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत नांदेड येथे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या आयोजनात सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवून सुक्ष्म नियोजन करण्यावर भर द्यावाअसे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात युवा महोत्सवाचे आयोजनाबाबत बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटेजिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडेजिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकरडॉ. सान्वी जेठवाणी आदींची उपस्थिती होती.

 

संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापरसामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान या संकल्पना दिलेल्या आहेत. त्यानुसार यावर्षीच्या जिल्हा युवा महोत्सवात कृषी विभागाने दिलेल्या संकल्पनेनुसार युवा वर्गाला सहभागी करुन घेवून विविध उपक्रमाचे आयोजन करण्यावर भर द्यावाअसे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सूचित केले. तसेच तृणधान्याचे आहारातील महत्व प्रत्येकाला कळावे यासाठी तृणधान्यांच्या पदार्थाचे प्रदर्शनही या महोत्सवात भरविण्यात यावे अशा सूचना त्यांनी दिल्या.

 

सांस्कृतिककौशल्य विकाससंकल्पनावर आधारित स्पर्धायुवा कृती याबाबीचा समावेश असणार आहे. या बाबीमध्ये लोकनृत्यलोकगीतकथा लेखनफोटोग्राफीपोस्टर स्पर्धावक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी)अस्पर्धात्मक बाबींचे आयोजन इ. उपक्रमाचा समावेश असणार आहे. युवा महोत्सवात 15 ते 29 वयोगटातील युवा सहभागी होवू शकतील.  

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...