Wednesday, November 8, 2023

 पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार

मेळाव्याचे 16 व 17 नोव्हेंबर रोजी आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 16 व 17 नोव्हेंबर 2023 रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दु.क्र.02462251674 यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

 या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपण्याकडून मुलाखत घेण्यात येणार आहेत. बेरोजगार उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर नोंदणी करावी. उमेदवारांना आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करुन घेता येईल. या संधीचा लाभ जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी घ्यावाअसेही  जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविले आहे.

या रोजगार मेळाव्यात 10 वी पास/ नापास उमेदवारांसाठी आर्यन असेथिंटीक प्रा.ली. नांदेड या कंपनीत टेलर या 10 रिक्त पदासाठी भरती करण्यात येणार आहे. तसेच नवकिसान बायो प्लानेटीक लि. कंपनीत सेल्स रिप्रझेंटिव्ह 30 रिक्त पदासाठी 10 वी, 12 व पदवीधर उमेदवारांसाठी व फक्त पदवीधर मुलींसाठी फ्रंन्ट ऑफिस एक्सक्युटीव्ह या एका पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी नांदेड, लातूर , परभणी, सोलापूर या ठिकाणासाठी भरती करण्यात येणार आहे. लाईफ इन्शुरन्स कॉ. ऑफ इंडिया मध्ये लाईफ इन्सुरन्स ॲडव्हायझर 25 रिक्त पदासाठी इ. 10,12 व पदवीधर उमेदवारांना धर्माबाद, उमरी, नायगाव या ठिकाणासाठी भरती करण्यात येणार आहेत. तरी बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावाअसे जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000  

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...