Thursday, November 9, 2023

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी

जिल्हाधिकारी व उपविभागीय कार्यालयात स्वतंत्र कक्ष

नांदेड, (जिमाका) दि. 9 :- मराठा समाजातील व्‍यक्‍तींना, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्‍यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय कार्यालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत. कुणबी नोंदी असलेल्या कागदपत्रांची पडताळणी नागरिकांनाही करता यावी यासाठी  www.nannded.gov.in हे विशेष संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. जिल्‍ह्यातील विविध विभागाकडील सन 1967 पुर्वीच्‍या अभिलेखांची तपासणी करून, ज्‍या अभिलेखात कुणबी नोंदी आढळून आल्‍या आहेत ते अभिलेख या संकेतस्थळावर पाहता येतील. मराठा समाजातील नागरिकांनी या संकेतस्थळावरील नोंदी तपासून आपल्या वंशावळीची पाहणी करावी. तसेच त्या अभिलेखाचा संदर्भ देवून आपल्या तालुक्याचे उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे कुणबी दाखला प्रमाणपत्रासाठी रितसर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.  

मराठा समाजातील व्‍यक्‍तींना, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्‍यासंदर्भात शासनाच्‍या सामान्‍य प्रशासन विभागाने 31 ऑक्टोंबर 2023 रोजी जारी केलेल्‍या शासन निर्णयातील तरतूदीं विचारात घेवून कार्यवाही करण्‍याबाबतचे निर्देश सक्षम प्राधिकारी / संबंधीत तालुक्‍याचे उपविभागीय अधिकारी यांना देण्‍यात आले आहेत. त्‍याअनुषंगाने मराठा समाजातील नागरिकांना कुणबी दाखले देण्‍याची प्रक्रिया सुलभ होण्‍यासाठी जिल्‍ह्यात जिल्‍हाधिकारी कार्यालयात स्‍वतंत्र विभाग सुरू केला आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...