Thursday, November 9, 2023

 तेलंगणा राज्याच्या सिमेलगत गावातील

मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश

 

नांदेड, (जिमाका) दि. 9 :- तेलंगणा राज्य सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-2023 ची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने तेलंगणा राज्याच्या सीमेपासून 5 कि.मी. परिसरातील नांदेड जिल्ह्याच्या हद्दीतील सर्व किरकोळ देशी, विदेशी व ताडी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत. हा आदेश दिनांक 28.11.2023 रोजी सायं 5 वाजेपासून ते दिनांक 30.11.2023 रोजी मतदान संपेपर्यंत लागू राहिल. याचबरोबर मतमोजणीच्या दिवशी 3 डिसेंबर 2023 रोजी संपूर्ण दिवस मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश लागू राहिल. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) मधील तरतुदीनुसार हा आदेश निर्गमित केला आहे.  

 

या निवडणुकीचे मतदान 30 नोव्हेंबर 2023 रोजी तर मतमोजणी 3 डिसेंबर 2023 रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निश्चित केलेल्या स्थळी होणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करून अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.  

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...