Thursday, September 19, 2024

 विशेष वृत्त क्र. 852 

नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना

25 टक्के अग्रीम देण्याच्या विमा कंपनीला सूचना 

नांदेड दि. 19 सप्टेंबर :- नांदेड जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील पिकांच्या उत्पादनामध्ये 50 टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचे जिल्हास्तरीय समितीने आपले निरीक्षण नोंदविले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मोबदला देण्यासाठी असलेल्या नियमानुसार पिक विमा कंपन्यांनी 25 टक्के अग्रीम तातडीने द्यावा, अशी सूचना विमा कंपनीला करण्यात आली आहे.     

जिल्हास्तरीय समितीने नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024-25 अंतर्गत हंगामातील प्रतिकुल परिस्थिती अर्थात मिड सेशन ॲडव्हरसिटी अशी अधिसूचना लागू केली आहे. त्यामुळे समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित आहे. त्यामुळे समितीने जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना लागू केली आहे. त्यामुळे सर्व महसूल मंडळातील पात्र विमाधारक शेतकऱ्यांना विहित मुदतीत नुकसान भरपाई अग्रीम रक्कम अदा करण्याचे निर्देश जिल्हास्तरीय समितीने विमा कंपनीस दिले आहेत. 

सद्यस्थितीत हंगामतील प्रतिकूल परिस्थिती या घटकांअंतर्गत 25 टक्के अग्रीम रक्कम मिळणार असून उर्वरीत रक्कम स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत पंचनामे व पिक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीनुसार मिळेल याची सर्व शेतकरी बंधूनी नोंद घ्यावी. मोबदला कसा मिळेल हे समजून घ्यावे. कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने केले आहे.

000000 

 वृत्त क्र. 851

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

 नांदेड दि. 19 सप्टेंबर :- नांदेड जिल्ह्यात 19 सप्टेंबर चे सकाळी 6 वाजेपासून ते 3 ऑक्टोंबर 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.  

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 19 सप्टेंबर चे सकाळी 6 वाजेपासून ते 3 ऑक्टोंबर 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

  वृत्त क्र. 850

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या  पात्र परिसरात कलम 163

नांदेड दि. 19 सप्टेंबर:- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 ऑक्टोंबर 2024 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.   

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला/दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 सप्टेंबर 2024  रोजी सकाळी  6  वाजेपासून ते 19 ऑक्टोबर 2024 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.   

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. 

00000

  वृत्त क्र. 849

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

सन 2022-23 अंतर्गत 30 सप्टेंबरपर्यत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन  

 नांदेड दि. 19 सप्टेंबर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2022-23 अंतर्गत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांना अनुदान जलद संवितरण व सहनियंत्रणासाठी 14 जानेवारी 2024 परिपत्रक निर्गमित झाले आहे.  सहाय्यक आहरण व संवितरण अधिकारी आणि अन्य अशासकीय कार्यान्वयन प्राधिकाऱ्यासाठी आभासी वैयक्तीक ठेव लेखा ही व्यवस्था व कार्यपध्दती लागु करण्यात आली आहे. या प्रणाली अंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी बँक खात्याचा कॅन्सल चेक, विहित नमुन्यातील अर्जासोबत दिलेल्या कागदपत्रासह अर्ज 30 सप्टेंबर 2024 पर्यत कार्यालयास कार्यालयीन वेळेत सादर करावा. विहित मुदतीनंतर आलेले अर्ज ग्राहय धरल्या जाणार नाहीत यांची सर्वानी नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त  शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडुन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. यात भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये 13 जून 2018 रोजी  शासन निर्णयानुसार थेट वितरीत करण्यात येते.

या योजनेअंतर्गत दाखल करावयाची कागदपत्रे

लाभार्थी हा सन 2022-23 या वर्षात पात्र असावा, विहित नमुन्यातील अर्ज, ऑनलाईन प्रणालीचे दाखल केलेल्या अर्जाची पोच, चालू बँक पासबुक खात्याचे छायांकित प्रत, बँक खाते बदल असल्यास खाते बदलाबाबतचे शपथपत्र, बँक खात्याचे रद्द केलेला मूळ धनादेश, पॅनकार्ड छायाकिंत प्रत, आधार कार्ड छायाकिंत प्रत, विवाहीत असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र, लग्न पत्रिका आवश्यक, विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती 75 टक्के जास्त असणे बंधनकारक असेल. यानुसार 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत कार्यालयीन वेळेतपर्यत अर्जाची एक प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयीन वेळेत संबंधित शाखेस जमा करणे बंधनकारक राहील.

विद्यार्थ्यांने खोटी माहिती अथवा कागदपत्रे देवून लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेवून गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रकमेची 12 टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल. तसेच अपूर्ण भरलेले/आवश्यक कागदपत्र सादर न केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील व अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही असेही समाज कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...