Sunday, December 2, 2018


नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाचे तीन सदस्‍य  निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र छाननीची व वैध नामनिर्देशन पत्रांची सुची आज प्रसिध्‍द करण्‍यात येणार.  

नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍यांना निवडून देण्‍यासाठी घ्‍यावयाच्‍या निवडणूकीसाठी महाराष्‍ट्र शासन महसुल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांची अधिसूचना दिनांक 27 जून 2018 अन्‍वये मतदार यादी तयार करणे व निवडणूक घेण्‍यासाठी आवश्‍यक ती व्‍यवस्‍था करण्‍यास जिल्‍हाधिकारी, नांदेड यांना निदेश आहेत. नांदेड शिख गुरुव्दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब बोर्ड निवडणूक नियम 1963 मधील नियम 12 नुसार जिल्‍हाधिकारी, नांदेड यांची अधिसूचना दिनांक-26 नोव्‍हेंबर 2018 रोजीचे निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्‍यानुसार नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍य निवडणूकीसाठी  दिनांक-26 नोव्‍हेंबर 2018 ते दिनांक:-01 डिसेंबर 2018 पर्यंत नामनिर्देशनपत्रे प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य), यांचे दालन, दुसरा मजला, जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे स्‍वीकारण्‍यात आली आहेत.
दिनांक-03 डिसेंबर 2018 (सोमवार) रोजी सकाळी 11.00 वाजता बचत भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड ये‍थे नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. तसेच छाननीनंतर लगेचच वैध नामनिर्देशन पत्राची सूची दुपारी 3.00 नंतर प्रसिध्‍द करण्‍यात येणार आहे .
उमेदवारी मागे घेण्‍याचा शेवटचा दिनांक 06 डिसेंबर 2018 (गुरुवार) वेळ दुपारी 3.00 वाजेपर्यंत असून, उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य), यांचे दालन, दुसरा मजला, जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे उमेदवारी मागे घेण्‍याचा अर्ज दाखल करता येतील. याची उमेदवार, प्रस्‍तावक / सुचक व सर्व संबंधितांनी नोंद घ्‍यावी. असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांच्‍या वतीने कळविले आहे.
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...