Thursday, January 12, 2017

मतदान जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धा संपन्न
नांदेड दि. 17 :- निवडणूक आयोगाच्‍या निर्देशानुसार मतदारामध्‍ये जनजागृती व्‍हावी या उद्देशाने युवा मतदारामध्‍ये जनजागृती निमित्‍त हुतात्‍मा पानसरे हायस्‍कुल धर्माबाद येथे चित्रकला स्‍पर्धा घेण्‍यात आली.
तहसिलदार धर्माबाद श्रीमती ज्‍योती चौहान, नायब तहसिलदार निवडणूक सुनिल माचेवाड , लिपिक मिलिंद टोणपे,  मतदार मदत केंद्र ऑपरेटर साहेबराव कदम यांनी स्‍पर्धेचे नियोजन केले होते.
या स्‍पर्धेत एकूण 42 विद्यार्थ्‍यांनी सहभाग नोंदविला होता. त्‍या स्‍पर्धेत गुणानुक्रमे प्रथम क्रमांक फुलारी मंगेश दिलीप लालबहादुर शास्‍त्री महाविद्याल धर्माबाद , द्वितीय क्रमांक जाधव देवश्री दिगांबर हुतात्मा पानसरे हायस्‍कुल धर्माबाद, यांची निवड करण्‍यात आली स्‍पर्धेत कुलकर्णी प्राची बद्रीनाथ हु.पानसरे हायस्‍कुल धर्माबाद व जाधव शुभमकुमार मधुकर लाल बहादुर शास्‍त्री महाविद्यालय धर्माबाद  यांनी उत्‍कृष्‍ट चित्र काढली.स्‍पर्धेसाठी केंद्र प्रमुख एन.पी.पांचाळ, आसवार चंद्रशेख, व्‍ही.जी.दुगाडे सौ.अ.द.गव्‍हाणे यांचे सहकार्य लाभले.

000000
मतदार यादीबाबत हरकती सूचना
17 जानेवारी पर्यंत नोंदवाव्यात
          नांदेड, दि. 12 :- नांदेड जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचयात समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी 5 जानेवारी 2017 रोजी अस्तिवात असलेल्या विधानसभा मतदार यादीमधून प्रारुप मतदार यादी तयार केली असून ती गुरुवार 12 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध केली आहे. या यादी संदर्भात काही हरकती व सूचना असल्यास त्या दिनांक 17 जानेवारी 2017 पर्यंत लेखी सादर कराव्यात , असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
जिल्हा परिषद , पंचयात समिती सार्वत्रिक निवडणुकीकरीता राज्य निवडणूक आयुक्त यांनी मतदार यादीचा कार्यक्रम  जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशान्वये नांदेड जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीकरीता 5 जानेवारी 2017 रोजी अस्तिवात असलेल्या विधानसभा मतदार यादीमधून प्रारुप मतदार यादी तयार केली असून ती गुरुवार 12 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध केली आहे. या प्रारुप यादीची प्रत जिल्हाधिकारी , तहसिलदार यांच्या कार्यालयामध्ये पाहण्यासाठी व निरिक्षणासाठी उपलब्ध आहे. या यादी संदर्भात काही हरकती व सूचना असल्यास त्या दिनांक 17 जानेवारी 2017 पर्यंत तहसिलदार यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत लेखी सादर कराव्यात. या दिनांकानंतर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करण्यात येणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...