Thursday, January 12, 2017

मतदार यादीबाबत हरकती सूचना
17 जानेवारी पर्यंत नोंदवाव्यात
          नांदेड, दि. 12 :- नांदेड जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचयात समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी 5 जानेवारी 2017 रोजी अस्तिवात असलेल्या विधानसभा मतदार यादीमधून प्रारुप मतदार यादी तयार केली असून ती गुरुवार 12 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध केली आहे. या यादी संदर्भात काही हरकती व सूचना असल्यास त्या दिनांक 17 जानेवारी 2017 पर्यंत लेखी सादर कराव्यात , असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
जिल्हा परिषद , पंचयात समिती सार्वत्रिक निवडणुकीकरीता राज्य निवडणूक आयुक्त यांनी मतदार यादीचा कार्यक्रम  जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशान्वये नांदेड जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीकरीता 5 जानेवारी 2017 रोजी अस्तिवात असलेल्या विधानसभा मतदार यादीमधून प्रारुप मतदार यादी तयार केली असून ती गुरुवार 12 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध केली आहे. या प्रारुप यादीची प्रत जिल्हाधिकारी , तहसिलदार यांच्या कार्यालयामध्ये पाहण्यासाठी व निरिक्षणासाठी उपलब्ध आहे. या यादी संदर्भात काही हरकती व सूचना असल्यास त्या दिनांक 17 जानेवारी 2017 पर्यंत तहसिलदार यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत लेखी सादर कराव्यात. या दिनांकानंतर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करण्यात येणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...