Thursday, July 3, 2025

 वृत्त क्र. 696   

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाची बैठक संपन्न

नांदेडदि. 3 जुलै :- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाची त्रैमासिक बैठकजिल्हा समुदाय संसाधन समूह बैठकजिल्हा एचआयव्ही-टीबी समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषदेत पार पडली.

बैठकीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे न्यायाधीश तथा सदस्य सचिव शरद देशपांडेजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरकेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुखशासकीय आयुर्वेद महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटीलजिल्हा आर.सी.एच.अधिकारी डॉ. शिवशक्ती पवारवरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जाधवमनपा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. बडीयोद्दीनशिक्षण अधिकारी सौ.फुटाणेजिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी प्रतिनिधिसमाज कल्याण कार्यालय प्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्था प्रतिनिधीजिल्हा समुदाय संसाधन समूह (D-CRG) प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

खाजगी रक्त तपासणी केंद्रातून एचआयव्ही पॉजिटिव्ह आलेले रूग्ण आयसीटीसी केंद्रांना संदर्भित करण्याबाबत सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरवर सर्व गरोदर मातांची एचआयव्ही व गुप्तरोग तपासणी होईल यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत त्यांनी सूचित केले.

जिल्ह्यातील 17 आयसीटीसी केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यात  एचआयव्ही व गुप्तरोग तपासणी केली जाते. सन 2024-25 मध्ये 18 ते 35 वयोगटात एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. तरुणाईला या रोगापासून दूर ठेवण्याकरिता आयसीटीसी समुपदेशकांमार्फत जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयात एचआयव्ही व गुप्तरोग जनजागृतीपर समुपदेशनाचा ड्राइव घेणार असल्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी सांगितले. जिल्ह्यातील एड्स रोगाबाबतची सांख्यिकीय वैशिष्ट्ये सन 2024-25 आणि मे 2025 पर्यंतचा सर्व डेटा पीपीटी माध्यमातून जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप अंकुशे यांनी समिती समोर सादर केला.

0000

वृत्त क्र. 695    

ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना मानधन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड, दि. 3 जुलै :- राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेंतर्गत कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असलेल्या मान्यवर साहित्यिक व कलावंतांनी सन 2025-26 साठी ऑनलाईन अर्ज येत्या 31 जुलैपर्यंत करावेत, असे जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यांना https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या लिंकवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरता येतील. 

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना ही सन 1954-55 या वर्षापासून संपूर्ण राज्यात सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत राबविण्यात येते. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असलेल्या मान्यवर साहित्यिक व कलावंत यांना प्रति महिना एप्रिल 2024 पासून सरसकट 5 हजार रुपये एवढे मानधन देण्यात येत आहे. तसेच दरवर्षी नांदेड जिल्हाअंतर्गत 100 कलावंताची निवड जिल्हा निवड समिती मार्फत करण्यात येते. 

योजनेसाठी पात्रता

ज्याचे वय 50 पेक्षा जास्त, दिव्यांगाना वयाची अट 10 वर्षानी शिथिल करण्यात येते (दिव्यांगाना वयोमर्यादा 40 वर्ष) आहे. ज्याचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी 15 वर्ष आहे. ज्यांनी साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातली आहे. वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा, परितक्त्या, दिव्यांग कलाकारांना प्राधान्य राहील. कलाकारांचे सर्व मार्गांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 60 हजार रुपयापेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजिविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार. केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे व इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेचे इतर वैयक्तिक शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. कलाकार, साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवाशी असणे बंधनकारक आहे. 

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे

वयाचा दाखला 50 पेक्षा जास्त (दिव्यांगांना वयामर्यादा 40 वर्षे), आधार कार्ड, उत्पनाचा दाखला 60 हजार रुपया पर्यंत (तहसिलदार), रहिवाशी दाखला तहसिलदार यांच्याकडून मिळालेले, प्रतिज्ञापत्र इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत नसले बाबत. पति-पत्नीचा एकत्रीत फोटो (लागु असल्यास), बॅक तपशिल बँक खाते क्रमांक व बँकेचा आयएफएससी कोड क्रमांकासह, अपंगत्वाचा दाखला (लागु असल्यास), राज्य केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र (लागु असल्यास), नामांकित संस्था,व्यक्ती यांचे शिफारस पत्र (लागु असल्यास), विविध पुरावे, मोबाईल क्रमांक (आधार क्रमांकास व बॅकेस मोबाईक क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे), शासन निर्णय तरतुदीनुसार सर्व अटी शर्ती लागु राहतील. 

या संबंधी अधिक माहिती नांदेड जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ zpnanded.in वर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  अपुर्ण अर्ज असल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज फेटाळला जाईल, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) यांनी कळविले आहे. 

00000

 वृत्त क्र. 694

शिकाऊ उमेदवारांसाठी आज रोजगार मेळाव्याचे आयोजन 

नांदेड दि. 3 जुलै :- मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रद्वारा श्री गुरुगोबिंदसिंघजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड यांच्यावतीने शुक्रवार 4 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वा. शिकाऊ उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. तरी आयटीआय, पदवी, पदव्युत्तर, दहावी, बारावी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस.व्ही. सुर्यवंशी यांनी केले आहे. 

या मेळाव्यात आयटीआय उत्तीर्ण व आयटीआय व्यवसाय अभ्यासक्रमातील अंतिम वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत भरती मेळावा घेण्यात येत आहे. तरी आयटीआय, पदवी, पदव्युत्तर, दहावी, बारावी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे उद्या 4 जुलै रोजी सकाळी ठिक 10 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गुरुगोबिंदसिंघजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस.व्ही. सुर्यवंशी यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र. 693

उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन 

नांदेड दि. 3 जुलै :- उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात व नांदेड जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत. भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस प्रजातीच्या बूरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन यासारखी विषद्रव्ये तयार होतात.  पावसाळयातील वातावरण बूरशीच्य वाढीसाठी अनूकुल असते, अशी बूरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी उपवासाला भगर खाताना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

भगर खाताना काय काळजी घ्यावी 

बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतोवर पाकीटबंद भगर घ्या. ब्रँड नाव नसलेली  किंवा लेबल नसलेली भगर पाकीटे व सूटी भगर घेऊ नका. भगर घेतांना पाकीटावरचा पॅकींग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासा. भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी, व्यवस्थित झाकण बंद डब्यात ठेवा, जेणेकरून वातावरणातील ओलाव्यामुळे बूरशीची वाढ होणार नाही. जास्त दिवस भगर साठवू नका. जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नका. शक्यतोवर भगरीचे पीठ विकत आणू नका. भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामूळे पिठाला बूरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते. भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी  खिचडी खावी. भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या. जास्त दिवस पीठ साठवू नका. बाहेरुन दळून आणण्यापेक्षा घरीच  दळा. भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. दोन ते तिन दिवस सलग उपवास असताना या पदार्थांचे सेवन ॲसिडीटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ व पोटाचे त्रास होतात. या पदार्थांचे सेवन पचनशक्ती नुसार मर्यादेतच करावे. भगरीचे सेवन करतांना या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे संभाव्य अपाय टाळता येईल. 

भगर विक्रेत्यांसाठी सूचना 

विक्रेत्यांनी पॅकबंद भगरचीच विक्री करावी. भगर खरेदी करतांना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी.भगरीचे पॅकेट, पोत्यावर उत्पादकांचा पत्ता,परवाना क्र., पॅकींग दिनांक, अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्या. मुदतबाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करु नये. सुटी भगर व खुले भगर पीठ शक्यतो विक्रीसाठी ठेऊ नये. 

अन्न व औषध प्रशासनाचेवतीने भगर विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई करण्यात येईल येईल असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

0000

 वृत्त क्र. 692

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन 

नांदेड दि. 3 जुलै :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जुलै महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 8 जुलै, 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

०००००

 वृत्त क्र. 691

देशासाठी मध्यस्थी अभियानास प्रारंभ

नांदेड दि. 3 जुलै :- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात एकाच वेळी देशासाठी मध्यस्थी हे अभियान राबविण्यात येत आहे. नांदेड येथे 1 जुलै रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गं. वेदपाठक यांच्या हस्ते या अभियानाचा प्रारंभ झाला आहे.

या अभियानांतर्गत दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, सहकार न्यायालय व ग्राहकमंच मध्ये दाखल असलेली जास्तीत जास्त प्रकरणे मध्यस्थीसाठी पाठविण्यात यावी. हे अभियान 30 सप्टेंबर 2025 पर्यत चालणार असून, आठवडयातील सात दिवस प्रशिक्षित मध्यस्थ प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तरी जास्तीत जास्त पक्षकारानी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद जी. देशपांडे यांनी केले आहे.

0000

 चला घडवूया विकसित महाराष्ट्र !

विकसित महाराष्ट्राची रुपरेषा ठरविण्यात आपला सहभाग द्या!

'विकसित महाराष्ट्र २०४७ : महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंट'साठी १७ जुलै, २०२५ पर्यंत होणाऱ्या नागरिक सर्वेक्षणात सहभाग नोंदवा..

  राज्य शासनाच्या  ‘ उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार   २०२४ ’ साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ    मुंबई ,  दि. 4  :  माहिती...