Tuesday, August 11, 2020

 

लैगिंक छळापासून अधिनियमानुसार

प्रत्येक आस्थापनेत तक्रार समिती आवश्यक

नांदेड (जिमाका) दि.11:- ज्या आस्थापनेवर दहा किंवा त्यापेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी असतमील अशा सर्व आस्थापनेमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या महिलांचे लैगिंक छळापासून संरक्षण ( प्रतिबंध मनाई व निवारा) अधिनियम 2013 नुसार तक्रार समिती स्थापन करणे अनिवार्य आहे.

हा अधिनियम शासकीय, निमशासकीय खाजगी कार्यालये, संघटना, शासन अनुदानित संस्था, महामंडळे, आस्थापना, संस्था, शाखा ज्यांची शासनाने स्थापना केली असेल किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असेल किंवा पुर्णतः किंवा अंशत: प्रत्यक्ष निधी शासनामार्फत दिला जातो अशा कार्यालयासह पुढील आस्थापनेसाठीही हा अधिनियम लागू आहे.

खाजगी क्षेत्र, संघटना, इंटरप्रायजेस, अशासकीय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक पुरवठा, वितरण व विक्री यासह वाणिज्य, व्यावसायि, शैक्षणिक, करमण, औद्योगिक इत्यादी सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठादार रुग्णालय, सुश्रुषालये, क्रिडा संस्था, प्रेक्षागृहे इ. ठिकाणी अंतर्गत कामाच्या ठिकाणी समिती गठीत करण्यात यावी. यापुर्वी समिती गठीत केलेली असेल, तरी समिती पुनर्गठीत करण्‍यात येऊन, त्‍याबाबतचाअहवाल, जिल्हा-अधिकारी (District-Officer) जिल्‍हाधिकारी कार्यालय,  नांदेड जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नांदेड यांचे -मेल आयडी iccdwcdned@gmail.com वर पाठविण्‍यात यावा, असे आवाहन जिल्हा - अधिकारी जिल्हास्तर यांनी केले आहे.

0000

                     जिल्ह्यातील 16 शासकीय व 5 खाजगी आयटीआयमध्ये प्रवेशाची कार्यवाही सुरु

नांदेड (जिमाका) दि.11:- जिल्ह्यातील सर्व 16 शासकीय व 5 खाजगी आयटीआयमध्ये ऑगस्ट 2020 च्या प्रवेशसत्राच्या ऑनलाईन प्रवेशाची नोंदणी दि. 1 ऑगस्ट 2020 पासून सुरु करण्यात आलेली आहे. यात जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 70 टक्के आणि इतर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 30 टक्के असा बदल झालेला आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवारास सर्व आयटीआयतील कोणत्याही व्यवसायास पसंतीक्रम देता येणार आहे.

जिल्ह्यातील प्रवेश उमेदवारांसाठी 70 टक्के व इतर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 30 टक्के असा बदल झालेला आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवारास सर्व आयटीआयतील कोणत्याही व्यवसायास पसंतीक्रम देता येणार आहे.  नांदेड या संस्थेत प्रवेशसत्र ऑगस्टच्या सत्रात सर्वसाधारण संवर्गासाठी 20 व्यवसायामध्ये 548 जागा, महिलांसाठी 2 व्यवसायामध्ये सर्वसाधारण 64 जागा व अल्पसंख्याक संवर्गातील उमेदवारांसाठी 5 व्यवसायामध्ये 112 जागा उपलब्ध आहेत.

अल्पसंख्यांक संवर्गातील मुस्लीम, नवबौध्द, शिख, पारशी व जैन इत्यादी उमेदवारांना कळविण्यात येते की, आयटीआय नांदेड येथे ऑगस्ट 2020 च्या प्रवेश सत्रासाठी अल्पसंख्यांक संवर्गातील उमेदवारांकरिता आरेखक स्थापत्य (D,man, Civil )-24 , जोडारी (फिटर)-20, मेसन(Mason)-24, ट्रॅक्टर मेकॅनिक (Mechanic Tractor)-20 , टूल ॲन्ड डायमेकर (Tool and Die Maker) अशा प्रकारे पाच व्यवसायामध्ये 112 जागा उपलब्ध आहेत. सदरील प्रवेश प्रक्रिया ही विविध फेऱ्यामध्ये पार पडणार आहे. प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होत असून या प्रवेशाकरिता इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन प्रवेश नोंदणी व माहितीसाठी http://admission.dvet.gov.in  या संकेतस्थळावर भेट द्यावी.

00000

 

नांदेड जिल्ह्यात आस्थापना व दुकाने

सकाळी 9 ते सांयकाळी 7 पर्यंत चालू ठेवण्यास मुभा  

नांदेड (जिमाका) दि.11:- जिल्ह्यात नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रासाठी विविध अटी व शर्तीच्या अधिन राहून आस्थापना व दुकाने सकाळी 7-00 ते सांयकाळी 5-00 पर्यंत यापुर्वीच्या आदेशानुसार चालू  ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. यापुर्वीचे जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे आदेश दिनांक 19 जुलै, 2020 मधील अटी व शर्ती जशास तसे लागू करुन संपूर्ण जिल्ह्यात आज दिनांक 11 ऑगस्ट, 2020 पासून पुढील आदेशापर्यंत सर्व आस्थापना, दुकानांच्या वेळा सकाळी 9-00 ते सायकांळी 7-00 पर्यंत चालू ठेवण्यास मुभा देण्यात येत आहे.

0000

 

130 व्यक्तींना कोरोनातून बरे झाल्याने सुट्टी

 162 बाधितांची भर तर  गत पाच दिवसात सहा जणाचा मृत्यू 

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :-  मंगळवार 11  ऑगस्ट रोजी सायं. 6  वाजेपर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यात 130 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 162 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 44 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 118 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 516 अहवालापैकी  1 हजार 322 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 3 हजार 518 एवढी झाली असून यातील 1 हजार 909 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 1 हजार 465 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 115 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.   

 

6  ऑगस्ट रोजी  उमरी तालुक्यातील काबलगुडा येथील 50 वर्षाचा एक पुरुष, 9 ऑगस्ट रोजी करडखेड ता. देगलूर येथील 70 वर्षाची एक महिला , 10 ऑगस्ट रोजी दिपनगर तरोडा नाका येथील 76 वर्षाचा एक पुरुष, खुसरोनगर नांदेड येथील 70 वर्षाचा एक पुरुष व 11 ऑगस्ट  रोजी हिमायतनगर येथील 65 वर्षाचा एक पुरुष यांचा शासकीय  वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर किल्ला रोड येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 126 एवढी झाली आहे.     

 

आज बरे झालेल्या 130 कोरोना बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथील 3, नायगाव कोविड केअर सेंटर येथील  8, देगलूर कोविड केअर सेंटर 21, कंधार कोविड केअर सेंटर 6, बिलोली कोविड केअर सेंटर 2, अर्धापुर कोविड केअर सेंटर 4, हदगाव कोविड केअर सेंटर 1, मुखेड कोविड केअर सेंटर 2,  पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथे 50, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 24, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 2, किनवट कोविड केअर सेंटर 7 असे एकूण 130 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  

 

आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये नांदेड मनपाक्षेत्र 6, लोहा तालुक्यात 3, मुदखेड  तालुक्यात 1, भोकर तालुक्यात 5, कंधार तालुक्यात 1, माहूर तालुक्यात 2, हिंगोली 2, नांदेड ग्रामीण 2, देगलूर तालुक्यात 6, हिमायतनगर तालुक्यात 1, हदगाव तालुक्यात 1, धर्माबाद तालुक्यात 13, यवतमाळ जिल्ह्यात 1  असे एकुण 44 बाधित आढळले.

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 46, भोकर 1, मुदखेड तालुक्यात 5, धर्माबाद तालुक्यात 5, बिलोली तालुक्यात 10, नांदेड ग्रामीण 5, देगलूर 36,  नायगाव 5, किनवट 5 असे एकूण 118 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 1 हजार 465 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 218, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 535, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 37, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 53, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 31, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 113, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 110, लोहा कोविड केअर सेंटर येथे 3, हदगाव कोविड केअर सेंटर 49, भोकर कोविड केअर सेंटर 18,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 13, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 23, किनवट कोविड केअर सेंटर येथे 35, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 30, मुदखेड कोविड केअर सेटर 10, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 18, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 35, बारड कोविड केअर सेंटर 4, खाजगी रुग्णालयात 122 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 5, निजामाबाद येथे 1, हैदराबाद येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत. 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

 

सर्वेक्षण- 1 लाख 50 हजार 61,

घेतलेले स्वॅब- 22 हजार 850,

निगेटिव्ह स्वॅब- 17 हजार 552,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 162,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 3 हजार 518,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 25,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 25,

मृत्यू संख्या- 126,

रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 हजार 909,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 465,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 297, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 115.

 

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...