जिल्ह्यातील 16 शासकीय व 5 खाजगी आयटीआयमध्ये प्रवेशाची कार्यवाही सुरु
नांदेड (जिमाका) दि.11:-
जिल्ह्यातील सर्व 16 शासकीय व 5 खाजगी आयटीआयमध्ये ऑगस्ट 2020 च्या
प्रवेशसत्राच्या ऑनलाईन प्रवेशाची नोंदणी दि. 1 ऑगस्ट 2020 पासून सुरु करण्यात
आलेली आहे. यात जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 70 टक्के आणि इतर जिल्ह्यातील
उमेदवारांसाठी 30 टक्के असा बदल झालेला आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवारास सर्व
आयटीआयतील कोणत्याही व्यवसायास पसंतीक्रम देता येणार आहे.
जिल्ह्यातील प्रवेश उमेदवारांसाठी 70 टक्के व इतर जिल्ह्यातील
उमेदवारांसाठी 30 टक्के असा बदल झालेला आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवारास सर्व
आयटीआयतील कोणत्याही व्यवसायास पसंतीक्रम देता येणार आहे. नांदेड
या संस्थेत प्रवेशसत्र ऑगस्टच्या सत्रात सर्वसाधारण संवर्गासाठी 20 व्यवसायामध्ये
548 जागा, महिलांसाठी 2
व्यवसायामध्ये सर्वसाधारण 64 जागा व अल्पसंख्याक संवर्गातील उमेदवारांसाठी 5
व्यवसायामध्ये 112 जागा उपलब्ध आहेत.
अल्पसंख्यांक संवर्गातील मुस्लीम, नवबौध्द,
शिख, पारशी व जैन इत्यादी उमेदवारांना
कळविण्यात येते की, आयटीआय नांदेड येथे ऑगस्ट 2020 च्या
प्रवेश सत्रासाठी अल्पसंख्यांक संवर्गातील उमेदवारांकरिता आरेखक स्थापत्य (D,man,
Civil )-24 , जोडारी (फिटर)-20, मेसन(Mason)-24,
ट्रॅक्टर मेकॅनिक (Mechanic Tractor)-20 , टूल ॲन्ड डायमेकर (Tool
and Die Maker) अशा प्रकारे पाच व्यवसायामध्ये 112 जागा उपलब्ध
आहेत. सदरील प्रवेश प्रक्रिया ही विविध फेऱ्यामध्ये पार पडणार आहे. प्रवेश प्रक्रिया
ऑनलाईन पध्दतीने होत असून या प्रवेशाकरिता इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन प्रवेश
नोंदणी व माहितीसाठी http://admission.dvet.gov.in या
संकेतस्थळावर भेट द्यावी.
No comments:
Post a Comment