Wednesday, August 12, 2020
147 व्यक्तींना
औषधोपचारानंतर सुट्टी
99 बाधितांची भर तर तीन जणाचा मृत्यू
नांदेड (जिमाका) दि. 12 :- 12 ऑगस्ट रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या
अहवालानुसार जिल्ह्यात 147 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना
रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 99
व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 62 तर ॲटिजेन किट्स
तपासणीद्वारे 37 बाधित आले.
आजच्या एकुण 610 अहवालापैकी 491 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 3 हजार 617 एवढी झाली असून यातील 2 हजार 56 बाधिताना
औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 414 बाधितांवर रुग्णालयात
औषधोपचार सुरु असून त्यातील 169 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.
10 ऑगस्ट रोजी देगलूर नाका नांदेड
येथील 75 वर्षाचा एक पुरुष खाजगी रुग्णालयात, 12 ऑगस्ट रोजी किनवट तालुक्यातील लोणी
येथील 60 वर्षाची एक महिला, लाईन गल्ली देगलूर येथील 50
वर्षाची एक महिला यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
विष्णूपुरी येथे उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात
कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 129 एवढी झाली आहे.
आज बरे झालेल्या
बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथील 2, नायगाव कोविड
केअर सेंटर येथील 9, देगलूर कोविड
केअर सेंटर 11, खाजगी रुग्णालय 8, बिलोली
कोविड केअर सेंटर 4, भोकर कोविड केअर सेंटर 1, हदगाव कोविड केअर सेंटर 10, मुखेड काविड केअर सेंटर
17, पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथे 69,शासकीय आयुर्वेदिक महाकोविड केअर सेंटर 14, किनवट
कोविड केअर सेंटर 1, औरंगाबाद येथील संदर्भित 1 अशा एकूण 147 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी
देण्यात आली आहे.
आजच्या बाधितांमध्ये
आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 18, लोहा तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 8, बिलोली तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 1, दिल्ली 1, नांदेड
ग्रामीण 4, मुखेड तालुक्यात 18, उमरी
तालुक्यात 1, हदगाव तालुक्यात 5, धर्माबाद
तालुक्यात 3, यवतमाळ 1 असे एकुण 62 बाधित आढळले.
तर अँटिजेन
तपासणीद्वारे मुखेड 6,
भोकर तालुक्यात 3, मुदखेड तालुक्यात 11,
धर्माबाद तालुक्यात 4, नांदेड ग्रामीण 3,
देगलूर तालुक्यात 8, उमरी तालुक्यात 2 एकूण 37
बाधित आढळले.
जिल्ह्यात 1 हजार 414
बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 179, पंजाब भवन कोविड केअर सेंटर
येथे 483, जिल्हा रुग्णालय कोविड
हॉस्पिटल नांदेड येथे 40, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 54, बिलोली कोविड केअर सेंटर येथे
31, मुखेड कोविड केअर सेंटर येथे
122, देगलूर कोविड केअर सेंटर येथे
105, लोहा कोविड केअर सेंटर येथे 13, हदगाव कोविड केअर सेंटर 44, भोकर कोविड केअर सेंटर 17, कंधार कोविड केअर सेंटर येथे
14, धर्माबाद कोविड केअर सेंटर
येथे 30, किनवट कोविड केअर सेंटर येथे
37, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 31, मुदखेड कोविड
केअर सेटर 21, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, माहूर कोविड केअर सेंटर येथे 17, आयुर्वेदिक
शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 23, बारड कोविड
केअर सेंटर 4, उमरी कोविड केअर सेंटर 5, खाजगी रुग्णालयात 137 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित
4, निजामाबाद येथे 1, हैदराबाद येथे 1 बाधित
संदर्भित झाले आहेत.
जिल्ह्याची कोरोना
संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
सर्वेक्षण- 1 लाख 50 हजार 123,
घेतलेले स्वॅब- 24 हजार 867,
निगेटिव्ह स्वॅब- 19 हजार 13,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या-
99,
एकुण पॉझिटिव्ह बाधित
व्यक्ती- 3 हजार 617,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत
संख्या- 8,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली
संख्या- 2,
एकूण मृत्यू संख्या- 129,
एकूण रुग्णालयातून सुट्टी
दिलेली संख्या- 2 हजार 56,
रुग्णालयात उपचार घेत असलेले
बाधित व्यक्ती- 1 हजार 414,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी
संख्या- 741,
आज रोजी गंभीर प्रकृती असलेले
बाधित- 169.
प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी
पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता
अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे
करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000
सार्वजनिक गणेश मंडळांना
परवानगीसाठी ही कागदपत्रे आवश्यक
नांदेड (जिमाका)दि. 12 :- सार्वजनिक
गणेशोत्सव थोड्याच दिवसांवर येवून ठेपला असून हा उत्सव कोविड-19 च्या
पार्श्वभुमिवर अधिकाधिक सुरक्षित व नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीने साजरा व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी आवाहन केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव
मंडळांना शासनाची रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. यासाठी खालील कागदपत्रांची
पूर्तता संबंधित गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाला उपलब्ध करुन देणे
आवश्यक आहे.
गणेश
मंडळांना ही परवानगी ऑनलाईन पद्धती देण्यात येणार आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज
स्विकारले जाणार नाहीत. ऑनलाईन नोंदणीसाठी https:charity.
परवान्यासाठी
मंडळातील सर्व सभासदांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल आयडी, दुरध्वनी नंबर, जागा मालकाची
संमती, पोलीस स्टेशनचे
नाहरकत पत्र, गणेश
मंडळ स्थापनेबाबत ठराव, मागील
वर्षीचा जमा खर्चाचा अधिकृत लेखा परिक्षकार्मात हिशोब ही कागदपत्रे सादर करावी
लागतील. सर्वांनी
याची नोंद घेवून सहाकार्य करावे, असे आवाहन धर्मादाय उपआयुक्त किशोर
मसने यांनी केले आहे.
गणेश
चतुर्थीसाठी गणेश मंडळांना वर्गणी गोळा करण्याचा परवाना येथील सार्वजनिक न्यास
नोंदणी कार्यालयाच्यावतीने दिनांक 13 ते 21 ऑगस्ट 2020 या कालावधीत शनिवार व रविवार व
शासकीय सुट्टया वगळून कार्यालयीन वेळेत देण्यात येणार आहे.
किनवट येथील
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीसाठी
कंत्राटी पदभरती प्रक्रिया
रद्द
नांदेड (जिमाका) दि.12:-आदिवासी विकास विभागाचा शासन निर्णयान्वये नांदेड जिल्ह्यातील किनवट
येथे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय सुरु करण्यासाठी मंजूरी
प्रदान केलेली होती. या समितीसाठी आवश्यक मनुष्यबळ कंत्राटी तत्वावर
पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली होती. यात अधिकारी / कर्मचारी यांची एकूण 22
पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यासंदर्भात जाहिरात
प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार विधी अधिकारी, विधी
समन्वयक, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी व संशोधन सहायक या पदांसाठी
येणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती झाल्या होत्या. तसेच लिपीक टंकलेखक, माहिती
तंत्रज्ञान तथा संगणक सहायक, लघुटंकलेखक, शिपाई व
सफाईगार या पदांसाठी येणाऱ्या उमेदवारांचे अर्ज स्विकारण्यात आले होते.
राज्यातील
कोविड-19 च्या संसर्गजन्य रोगामुळे वित्तीय उपाययोजनेच्या अनुषंगाने शासनाने चालु
वित्तीय वर्षात सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग
वगळता कोणत्याही विभागाने प्रकारची नवीन पदभरती करु नये, याबाबत
सुचित केलेले आहे.
राज्यातील
कोरोना आजार प्रादुर्भाव स्थिती पाहता अनुसूचित जमाती प्रमाणपत्र
तपासणी समिती, किनवट ता. किनवट जि. नांदेड येथील कंत्राटी
पदभरती रद्द करण्याचा निर्णय निवड समितीने घेतला असल्याने भरती प्रक्रिया रद्द
करित असल्याचे औरंगाबाद अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, यांनी
कळविले आहे.
0000
दिव्यांगांसाठी
कार्य करणाऱ्या व्यक्ती, सेवासंस्थांना
राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि.12:- जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती, स्वंयसेवी संस्थांना देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी केंद्र
शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाने सन 2020 च्या अर्ज मागविले आहेत. हे अर्ज
दिनांक 9 सप्टेंबर, 2020 च्या आत जिल्हा समाज कल्याण अधिकारी,
जिल्हा परिषद येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण
अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.
केंद्र
शासनाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कार योजनेचा तपशिल व त्यासाठी करावयाच्या अर्जाचा
नमुना केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाच्या www.disabilityaffairs.gov.in या
संकेतस्थळावर उपलब्घ आहे.
आयुक्त
दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
यांनी त्यांच्या पत्रान्वये या पुरस्कारासाठी पात्र असलेले व्यक्ती व स्वंयसेवी
संस्थांकडून अर्ज मागविण्याबाबत सुचित केले आहे.
जिल्ह्यातील
सर्व दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या व सदर पुरस्कारासाठी पात्र असलेल्या व्यक्ती व
स्वंयसेवी संस्था यांनी आपले परिपूर्ण असलेले अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड या कार्यालयात 22 ऑगस्ट,
2020 रोजी कार्यालयीन वेळेत सादर करावेत, या
तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.
0000
वृत्त क्र. 1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...