Wednesday, April 24, 2024

वृत्‍त क्र. 384 

देगलूर तहसील कार्यालयासमोरील वाहतूक वळण रस्यात बदल

 

नांदेड दि. 24 एप्रिल- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 25 एप्रिल 2024 रोजी तहसिल कार्यालय देगलूर येथून मतपेटी वाटप होणार आहेत. यावेळी तहसिल कार्यालयासमोरील रस्यावरील वाहतुकीमुळे अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेयासाठी या मार्गावरुन जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आले आहे. सदर वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करावाअशी अधिसूचना जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केली आहे.   

 

मोटार वाहन  कायदा 1988  चे कलम 115 मधील  तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत  यांनी संबधीत विभागाने  पुढील  उपाययेाजना करुन  25 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तसेच  26 एप्रिल 2024 रोजी दुपारी 16 ते 24 वाजेपर्यंत वर नमुद  केलेल्या पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळविण्यास  मान्यता देण्यात आली आहे.

 

तहसिल कार्यालय देगलूर समोरील रस्ता हा प्रतिबंध केला आहे. यासाठी पर्यायी मार्ग (जाणे-येणे करिता) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-डॉ.भुमे हॉस्पीटल-बापुनगर-भक्ता्पुर रोड-शहिद भगतसिंग चौक असा राहील. तर देगलूर ते उदगीर रस्ता प्रतिबंध केला असून या रस्यासाठी पर्यायी मार्ग शहिद भगतसिंग चौक-भक्तापुर रोड- बापुनगर-डॉ.भुमे हॉस्पीटल-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा राहील.

 

उपविभागीय पोलीस अधिकारी देगलूर यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक ती उपाययोजना करावी. ही अधिसुचना सहा.निवडणुक निर्णय अधिकारी देगलूर यांचे कार्यालयामार्फत स्थानिक वर्तमानपत्रात  प्रसिद्ध करावी. सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी देगलूर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ता वाहतूक प्रतिबंध व पर्यायी रस्यासाठी आवश्यक असलेले बोर्डचिन्ह  लावणे इत्यादी बाबतची कार्यवाही करावीअसेही अधिसूचनेत स्‍पष्‍ट केले आहे.

००००

चित्रफीत - प्रचार तोफा थंडावल्यानंतर जिल्ह्यातील समस्त मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करताना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 


 वृत्‍त क्र. 383

प्रशासनाची तयारी... उदया सकाळी पोलिंग पाटर्या रवाना होणार काही छायाचित्रे....


 











वृत्‍त क्र. 382

 डंख छोटा धोका मोठा

हिवताप नियंत्रण ही प्रत्येकाची जबाबदारी

 

नांदेड दि. 24 एप्रिल : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत हिवताप या आजाराचा प्रादुर्भाव डासापासुन होतो. जागतिक स्तरावर गेल्या काही दशकात हिवतापावर मात करण्यासाठी जे काही सर्व स्तरावर प्रयत्न केले गेले त्याची आठवण म्हणून जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. हिवतापावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग व इतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य महत्वाचे आहे. सर्वांनी एकाच वेळी एक दिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवतापाचा पराभव होईल. यादृष्टीने जागतीक आरोग्य संघटनेने 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून घोषीत केला आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हयात सर्व आरोग्य संस्थेत 25 एप्रिल 2024 रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे या वर्षाचे घोषवाक्य Accelerating the Fight Against Malaria for a more Eqitable World मराठी भाषांतर मलेरिया विरुध्‍द जगाच्‍या संरक्षणासाठी, गतीमान करु हा लढा मलेरियाला हारविण्‍यासाठी असुन भविष्यात या आजाराचा उद्रेक होवु नये म्हणून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टिने पुढील माहिती देण्यात येत आहे.

 

मागील तीन वर्षात नांदेड जिल्हयातील हिवताप आजाराची परिस्थिती खालीलप्रमाणे आहे. सन 2021 मध्ये 2,75,221 सन 2022 मध्ये 4,41,904 सन 2023 मध्ये 5,17, 519 तर मार्च 2024 अखेर 1,21,899 याप्रमाणे घेतलेले व तपासलेले रक्त नमुने आहेत. तर हिवताप आजारात मागील तीन वर्षात मृत्यू निरंक आहेत.  

 

हिवताप

हिवताप हा आजार "प्लाझमोडीअम" या परोपजीव जंतुमुळे होतो. या आजाराचा प्रसार अॅनाफिलस डासाच्या मादी मार्फत होतो. जगात सर्वसाधारणपणे ३० ते ५० कोटी लोकांना या रोगाची लागण होते. महाराष्ट्रात हिवतापाच्या जंतुचे फॅल्सीफेरम व व्हॉयव्हॅक्स हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळुन येतात.

 

डासांची उत्पत्ती

स्वच्छ साठवुन राहिलेल्या पाण्यात होते. उदा. भात शेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नाले, नदी, पाण्याच्या टाक्या, कालवे इ. मध्ये होते.

 

हिवतापाचा प्रसार

हिवताप प्रसारक अॅनाफिलस डासाची मादी हिवताप रुग्णास चावल्यावर रक्ताबरोबर हिवतापाचे जंतु डासाच्या पोटात जातात. तेथे वाढ होवुन डासाच्या चाव्यानंतर लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरिरात सोडले जातात. पुढे निरोगी मनुष्याच्या शरिरात ते जंतु यकृतमध्ये जातात व तेथे त्यांची वाढ होवुन १० ते १२ दिवसांनी मनुष्याला थंडी वाजुन ताप येते.

 

हिवतापाची लक्षणे

थंडी वाजुन ताप येणेताप हा सततचा असु शकतो किंवा एक दिवस आड येवु शकतोताप नंतर घाम येवुन अंग गार पडणे, डोके दुखणे व बऱ्याच वेळा उलट्या होतात.

 

रोग निदान

प्रयोगशाळेत रक्तनमुना तपासणी :- हिवतापाचे खात्रीशीर निदान हे रुग्णाचा रक्त नमुना तपासुन करता येतो. अशा रक्त नमुन्यात हिवतापाचे जंतु आढळतात.

 

तात्काळ निदान पध्दती :- आर. डी. के. ( Rapid Dignostic Kit) द्वारे स्पॉटवर रक्तनमुना घेऊन पी.एफ./पी.व्ही. हिवतापाचे त्वरीत निदान करता येते.

 

औषधोपचार

औषधोपचार कोणताही ताप हा हिवताप असु शकतो. प्रत्येक ताप रुग्णाने आपला रक्त नमुना नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासुन घ्यावे. हिवताप दुषित रक्तनमुना आढळुन आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने दिल्या जाणाऱ्या क्लोरोक्वीन व प्रायमाक्वीन गोळयाचा औषधोपचार घ्यावा. ही औषधी उपाशी पोटी घेवु नये. गरोदर स्त्रीयांनी प्रायमाक्वीन औषधी घेवु नये व ० ते १ वर्षाच्या बालकांना प्रायमाक्वीन औषधी देवु नये.

 

हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना

 

आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका.


घरातील पाण्याचे सर्व साठे दर शनिवारी किंवा आपल्या सोयीनुसार आठवडयातून एक वार निश्चित करुन रिकामे करावेत. या साठयातील आतील बाजू व तळ घासुन पुसुन कोरडया करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकनाने झाकून ठेवावेत.


अंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी.

 

झोपतांना पुर्ण अंगभर कपडे घालावे, पांघरूण घेवून झोपावे.

 

संध्याकाळी ६ ते ८ दरम्यान दारे खिडक्या बंद कराव्यात, खिडक्यांना जाळया बसवाव्यात, झोपताना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा.

 

आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास आपले घर संपूर्ण फवारुण घ्यावे. फवारलेले घर किमान २ ते २.५ महिने सारवू (रंगरंगोटी) नये.

 

घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी, इ. ची वेळीच विल्हेवाट लावा, संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा, दर आठवड्याला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे.

 

वरील सर्व रोगाची तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे.

 

वरिल दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासुन दुर ठेवील. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वानी हातभार लावावाअसे आवाहन आरोग्य खात्याकडुन करण्यात आले आहे.

 

00000  

 

वृत्‍त क्र. 381 

प्रचार संपला; 26 एप्रिलला सकाळी 7 पासून मतदान 

48 तासांच्या शांतता कालावधीला सुरुवात 

प्रशासनाची तयारी पूर्ण ; 25 एप्रिलला सकाळीच पोलिंग पार्ट्या रवाना होणार 

जिल्हयामध्ये कलम 144 लागू; सर्वत्र चोख बंदोबस्त 

शुक्रवार फक्त मतदानासाठी राखीव ठेवा ; प्रशासनाचे आवाहन 

नांदेड दि. 24 : 16- नांदेड लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या 48 तासाला बुधवारी सायंकाळी 6 वाजतापासून सुरुवात झाली आहे. या काळात कोणत्याही राजकीय पक्षाला प्रचार करता येणार नाही. जिल्हा प्रशासनाने आयोगाच्या सूचनेनुसार निवडणुकीची पूर्ण तयारी केली असून उद्या सकाळी सात वाजता पासून पोलिंग पार्ट्या रवाना होणार आहे. सोळा नांदेड लोकसभा मतदारसंघातील 2062 मतदान केंद्रावर 18 लक्ष 51 हजार मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत. 

नांदेड लोकसभा मतदारसंघात २३ उमेदवार रिंगणामध्ये आहेत. २६ एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत मतदान होणार आहे. २३ उमेदवारांच्या खर्चाची अंतिम तपासणी आज खर्च निरीक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. तर मतदान कर्मचारी अधिकारी यांचे शेवटचे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण ठिकठिकाणीच्या सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले. जिल्हा प्रशासनाने आज सर्व यंत्रणांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी निवडणूक प्रक्रिया तसेच कायदा व सुव्यवस्था या संदर्भात विभाग प्रमुखांची व भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दाक्षिण, नायगाव, देगलूर, मुखेड, यांच्यासह हिंगोली मतदारसंघात येणाऱ्या किनवट व हादगाव येथील सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्याकडून आढावा घेतला. 

एकूण १८ लक्ष ५१ हजार मतदार

नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये भोकर (२९४४०९), नांदेड उत्तर (३४६८८६), नांदेड दक्षिण (३०८७९०), नायगाव (३०१२९९), देगलूर (३०३९४३), मुखेड (२९६५१६) असे एकूण १८ लक्ष ५१ हजार ८४३ मतदार यावेळी मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. यामध्ये ९ लक्ष ५५ हजार ८४ पुरुष तर ८ लक्ष ९६ हजार ६१७  महिला तर १४२ तृतीय पंथीचा समावेश आहे. 

२९ संवेदनशील केंद्र

जिल्ह्यामध्ये 16 नांदेड मतदार संघात 29 संवेदनशील मतदान केंद्र आहेत.५ शाडो मतदान केंद्र आहे. 16 ठिकाणी महिला व्यवस्थापनातील मतदान केंद्र आहेत. दिव्यांगांसाठी विशेष अशा सहा मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. १०० टक्के तरुण अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती असणारे 16 केंद्र आहेत. इको फ्रेंडली मतदान केंद्राची संख्या ०६ आहे, नांदेड दक्षिणमध्ये शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड, या ठिकाणी महिला मतदार केंद्र उभारण्यात आले आहेत. गुजराती उच्च माध्यमिक शाळा वजीराबाद येथे दिव्यांग मतदान केंद्र, उत्तर नांदेड मध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले आहे तर शंकरराव चव्हाण इंग्लिश स्कूल या ठिकाणी महिला मतदान केंद्र केंद्रीय विद्यालय दक्षिण मध्य रेल्वे या ठिकाणी युवा मतदान केंद्र तर ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी दिव्यांग मतदान केंद्र उभारण्यात आले आहे.

 १० हजार ६३७ कर्मचारी कार्यरत

नांदेड जिल्ह्यामध्ये निवडणुकीसाठी १० हजार ६३७ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये केंद्राध्यक्ष २७६६, इतर मतदान अधिकारी ७९२१,क्षेत्रीय अधिकारी २४२, याशिवाय मायक्रो ऑब्जर्वर ३९, होम वोटींग करीता ५०, अशा अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहे. आज कर्मचाऱ्यांचे शेवटचे प्रशिक्षण पार पडले असून उद्या कर्मचाऱ्यांना आपापले केंद्र समजणार आहे. उद्या सकाळी हे सर्व कर्मचारी रवाना होणार आहेत. जिल्ह्यात पुरेशा मतदान यंत्राची उपलब्धता आहे. 

144 कलम लागू

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 प्रमाणे लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाच्या समाप्तीसाठी निश्चित केलेल्या वेळेच्या 48 तासा अगोदरच्या कालावधीमध्ये सार्वजनिक सभा आयोजित करता येणार नाही. ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. बेकायदेशीरिता जमा होता येणार नाही. पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित जमा होता येणार नाही. किंवा एकत्रित फिरता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

बुथ व्यवस्थापन महत्वाचे

यासोबतच राजकीय पक्षांनी निवडणूक बूथ कुठे उभारावे, बुथवर कशी व्यवस्था असावी, त्या ठिकाणचे बॅनर बैठक व्यवस्था व गर्दीचे व्यवस्थापन या संदर्भातील निर्बंध जारी करण्यात आले आहे. मतदान केंद्राजवळ शस्त्र बाळगणे किंवा शस्त्र प्रदर्शन करणे प्रतिबंधित आहे.

कडेकोट बंदोबस्त   

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी देखील 48 तास आधी सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्धारित केलेल्या कर्तव्यात कोणताही कसूर करता कामा नये असे स्पष्ट ताकीद सर्व अधिकाऱ्यांना दिली आहे. रात्रीची गस्त वाढवण्यात आली असून फिरत्या पथकांवर अधिक जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहरातील हॉटेल, लॉज, निवारा ठिकाणांची असून तपासणी करण्यात येत असून या काळामध्ये रोकड मौल्यवान वस्तू, भेटवस्तू  ,मद्य अमली पदार्थ यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे . केंद्रीय राखीव दलाच्या पोलीस पथकांसह ठीक ठिकाणी पोलीस पथके बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे निवडणूक केंद्रावरही कडे कोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 

राजकीय नेत्यांच्या उपस्थितीवर निर्बंध

प्रचाराचा कालावधी संपल्यामुळे 48 तासापूर्वी मतदार संघाबाहेरील राजकीय नेते कार्यकर्ते यांनी मतदारसंघ सोडावा,असे आवाहन करण्यात आले आहे. प्रचार कालावधी संपल्यामुळे राज्यकीय कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते मिरवणुकीतील कार्यकर्ते मोहिमेचे कार्यकर्ते यांची उपस्थिती प्रतिबंधित करण्यात आली आहे.

 मोबाईल वापरावर बंदी

मतदारांसाठी महत्त्वपूर्ण सूचनेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक आणि अधिकृत निवडणूक पोलिस अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिघात, मतदान केंद्रात शेजारील परिसरात आणि मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी करण्यात आली आहे. मतदार, निवडणूक कर्मचारी तसेच माध्यम प्रतिनिधींनी देखील याची नोंद घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 सार्वजनिक सुटी ; बाजार बंद

26 एप्रिल रोजी मतदान होत असून या दिवशी मतदानासाठी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ज्या अत्यावश्यक व खाजगी आस्थापना दुकाने, रेस्टॉरंट सुरु असतील त्या ठिकाणाच्या सर्व व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना दोन तासाची सुट्टी द्यावी, असे आदेश कामगार आयुक्त मार्फत जारी करण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार 26 एप्रिल शुक्रवार रोजी बंद ठेवण्यात आले आहे. ज्या ठिकाणी आठवडी बाजार होते त्या ठिकाणीचे बाजार दुसरे दिवशी घेण्यात येणार आहे. 

मतदान केंद्रावर प्रतीक्षालय

नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदान करावे असे आवाहन करताना जिल्हा प्रशासनाने यावेळी लाईनमध्ये नागरिकांना उभे राहावे लागू नये, यासाठी प्रत्येक केंद्रावर प्रतीक्षालय उभारले आहे. याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती सावलीची व्यवस्था, रांगेविरहित मतदान व्हीलचेअरची व्यवस्था, हिरकणी कक्ष व पाळणा घर, आवश्यकता भासल्यास ॲम्बुलन्सची व्यवस्था केली जाणार आहे.

 48 तास मद्य विक्री बंद

 कायदा सुव्यवस्थेसाठी बुधवारच्या सायंकाळी सहा वाजता पासून मतदान पूर्ण होईपर्यंत 48 तास मद्य विक्री बंद करण्यात आली आहे. 

पोलचीट (मतचिठ्ठी) मिळवा !

नांदेड जिल्ह्यात Poll Chit  मिळाली नसल्यास कृपया खालील क्रमाकावर +91 75885 69875 या नंबरवर Pchit असा व्हाटस ॲप मेसेज करावा, अधिकृत माहिती मिळवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000







 वृत्‍त क्र. 380

नांदेड दक्षिण प्रशासन मतदान प्रक्रियेस सज्ज

सर्वांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे – जिल्‍हाधिकारी

· सर्व मतदान केंद्रावर पिण्‍याच्‍या पाण्‍यासह प्रतिक्षालयाची व्‍यवस्‍था

नांदेड दि. 24 एप्रिल - लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवासाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली आहे. 16-नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झाले असून या विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान अधिकारीकर्मचारी यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करावेअसे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण 312 मतदान केंद्र असून एकूण मतदार 3 लाख 8 हजार 790 आहेत. यामध्ये 1 लाख 58 हजार 618 पुरुष मतदार तर 1 लाख 50 हजार 169 स्त्री मतदार व पि.डब्ल्यू. डी.मतदार 2 हजार 436 आहेत. 34 झोनच्या माध्यमातून या संपूर्ण केंद्राची विभागणी करण्यात आली असून त्या-त्या केंद्रात नऊ अथवा दहा केंद्राचे वितरण करण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रावर पिण्याच्या पाण्याचीशक्यतोवर कुलरची व प्रतिक्षालयासह दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर व रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहेअसे जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

 

आज 24 एप्रिल रोजी शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे अंतिम प्रशिक्षण घेण्यात आले. या अंतिम प्रशिक्षणास 1 हजार 460 पैकी 1 हजार 428 मतदान अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. सहाय्यक निवडणूक अधिकारी विकास माने यांनी अतिशय समर्पक पध्दतीने हे प्रशिक्षण दिले. दि. 25 एप्रिल रोजी सकाळी 8 वा. आप-आपल्या साहित्य टेबलवरुन सर्व मतदान केंद्र साहित्य हस्तगत करुन इव्हिएम मशीन व व्हिव्हिपॅट काटेकोरपणे व सावधानतेने घेवून त्याची पूर्ण जोडणी व कार्य पध्दती पूर्ण करुन पाहण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले. आपल्या मार्गासाठी नेमून देण्यात आलेल्या वाहनातूनच केंद्रावर आपल्या टिमसह रवाना होण्याची महत्त्वाची सूचनाही यावेळी देण्यात आली. यावेळी प्रशिक्षण मंचावर जनरल निरीक्षक शशांक मिश्रातहसीलदार उमाजी बोथीकरनायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू,  कारभारी दिवेकरमकरंद भालेरावसंघरत्न सोनसळे आदींची उपस्थिती होती.

 

यावेळी प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीसाठी एकूण बारा मतदान यंत्र व व्हिव्हिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. मास्टर ट्रेनर म्हणून मोहन कलंबरकरसचिन राकाबालाजी चुनुपवारमनोज उदबुकेगणेश भारतीविवेकानंद मुधोळकरयादव आलुरकर व सुभाष गोडबोले यांनी कार्य केले. प्रशिक्षकांनी प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळून जोडणी कशी केली जातेकोणकोणत्या समस्या येवू शकतात आणि त्यावर उपाय कोणतायाचे परिपूर्ण प्रशिक्षण घेतले. याच प्रशिक्षणात सर्वांनी इडीसीपि.बी.च्या मदतीने आपल्या मताची नोंद करण्याची सूचना नितेशकुमार बोलेलू यांनी केली. या प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन प्रशिक्षण सदस्य संजय भालके यांनी केले. तर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी राजकुमार कोटुरवारराजेश कुलकर्णीएस.व्हि.भालकेसाधना देशपांडेविजयकुमार चोथवेप्रतिभा मारतळेकरअंकुश नल्लापल्लेरवी दोन्तेवार यांनी परिश्रम घेतले.

00000








महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...