Wednesday, April 24, 2024

वृत्‍त क्र. 384 

देगलूर तहसील कार्यालयासमोरील वाहतूक वळण रस्यात बदल

 

नांदेड दि. 24 एप्रिल- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 25 एप्रिल 2024 रोजी तहसिल कार्यालय देगलूर येथून मतपेटी वाटप होणार आहेत. यावेळी तहसिल कार्यालयासमोरील रस्यावरील वाहतुकीमुळे अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेयासाठी या मार्गावरुन जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आले आहे. सदर वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करावाअशी अधिसूचना जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केली आहे.   

 

मोटार वाहन  कायदा 1988  चे कलम 115 मधील  तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत  यांनी संबधीत विभागाने  पुढील  उपाययेाजना करुन  25 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तसेच  26 एप्रिल 2024 रोजी दुपारी 16 ते 24 वाजेपर्यंत वर नमुद  केलेल्या पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळविण्यास  मान्यता देण्यात आली आहे.

 

तहसिल कार्यालय देगलूर समोरील रस्ता हा प्रतिबंध केला आहे. यासाठी पर्यायी मार्ग (जाणे-येणे करिता) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-डॉ.भुमे हॉस्पीटल-बापुनगर-भक्ता्पुर रोड-शहिद भगतसिंग चौक असा राहील. तर देगलूर ते उदगीर रस्ता प्रतिबंध केला असून या रस्यासाठी पर्यायी मार्ग शहिद भगतसिंग चौक-भक्तापुर रोड- बापुनगर-डॉ.भुमे हॉस्पीटल-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा राहील.

 

उपविभागीय पोलीस अधिकारी देगलूर यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक ती उपाययोजना करावी. ही अधिसुचना सहा.निवडणुक निर्णय अधिकारी देगलूर यांचे कार्यालयामार्फत स्थानिक वर्तमानपत्रात  प्रसिद्ध करावी. सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी देगलूर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ता वाहतूक प्रतिबंध व पर्यायी रस्यासाठी आवश्यक असलेले बोर्डचिन्ह  लावणे इत्यादी बाबतची कार्यवाही करावीअसेही अधिसूचनेत स्‍पष्‍ट केले आहे.

००००

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...