Wednesday, April 24, 2024

 वृत्‍त क्र. 380

नांदेड दक्षिण प्रशासन मतदान प्रक्रियेस सज्ज

सर्वांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे – जिल्‍हाधिकारी

· सर्व मतदान केंद्रावर पिण्‍याच्‍या पाण्‍यासह प्रतिक्षालयाची व्‍यवस्‍था

नांदेड दि. 24 एप्रिल - लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवासाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली आहे. 16-नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झाले असून या विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान अधिकारीकर्मचारी यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करावेअसे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण 312 मतदान केंद्र असून एकूण मतदार 3 लाख 8 हजार 790 आहेत. यामध्ये 1 लाख 58 हजार 618 पुरुष मतदार तर 1 लाख 50 हजार 169 स्त्री मतदार व पि.डब्ल्यू. डी.मतदार 2 हजार 436 आहेत. 34 झोनच्या माध्यमातून या संपूर्ण केंद्राची विभागणी करण्यात आली असून त्या-त्या केंद्रात नऊ अथवा दहा केंद्राचे वितरण करण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रावर पिण्याच्या पाण्याचीशक्यतोवर कुलरची व प्रतिक्षालयासह दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर व रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहेअसे जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

 

आज 24 एप्रिल रोजी शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे अंतिम प्रशिक्षण घेण्यात आले. या अंतिम प्रशिक्षणास 1 हजार 460 पैकी 1 हजार 428 मतदान अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. सहाय्यक निवडणूक अधिकारी विकास माने यांनी अतिशय समर्पक पध्दतीने हे प्रशिक्षण दिले. दि. 25 एप्रिल रोजी सकाळी 8 वा. आप-आपल्या साहित्य टेबलवरुन सर्व मतदान केंद्र साहित्य हस्तगत करुन इव्हिएम मशीन व व्हिव्हिपॅट काटेकोरपणे व सावधानतेने घेवून त्याची पूर्ण जोडणी व कार्य पध्दती पूर्ण करुन पाहण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले. आपल्या मार्गासाठी नेमून देण्यात आलेल्या वाहनातूनच केंद्रावर आपल्या टिमसह रवाना होण्याची महत्त्वाची सूचनाही यावेळी देण्यात आली. यावेळी प्रशिक्षण मंचावर जनरल निरीक्षक शशांक मिश्रातहसीलदार उमाजी बोथीकरनायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू,  कारभारी दिवेकरमकरंद भालेरावसंघरत्न सोनसळे आदींची उपस्थिती होती.

 

यावेळी प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीसाठी एकूण बारा मतदान यंत्र व व्हिव्हिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. मास्टर ट्रेनर म्हणून मोहन कलंबरकरसचिन राकाबालाजी चुनुपवारमनोज उदबुकेगणेश भारतीविवेकानंद मुधोळकरयादव आलुरकर व सुभाष गोडबोले यांनी कार्य केले. प्रशिक्षकांनी प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळून जोडणी कशी केली जातेकोणकोणत्या समस्या येवू शकतात आणि त्यावर उपाय कोणतायाचे परिपूर्ण प्रशिक्षण घेतले. याच प्रशिक्षणात सर्वांनी इडीसीपि.बी.च्या मदतीने आपल्या मताची नोंद करण्याची सूचना नितेशकुमार बोलेलू यांनी केली. या प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन प्रशिक्षण सदस्य संजय भालके यांनी केले. तर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी राजकुमार कोटुरवारराजेश कुलकर्णीएस.व्हि.भालकेसाधना देशपांडेविजयकुमार चोथवेप्रतिभा मारतळेकरअंकुश नल्लापल्लेरवी दोन्तेवार यांनी परिश्रम घेतले.

00000








No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...