संचालनालय लेखा व कोषागारे कल्याण समिती विभागीय क्रीडा स्पर्धा २०२५ सायन्स कॉलेज च्या संकुलात संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या विजेत्या खेळाडू व संघाना आज मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळेसचे छायाचित्र. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सेवानिवृत्त सहसंचालक उत्तम सोनकांबळे, सेवानिवृत्त सहसंचालक पी आर कदम, लेखाधिकारी जनार्धन पकवाने, उपसंचालक शेखर कुलकर्णी, श्री म्हाडे, श्रीमती महाले, जिल्हा कोषागार अधिकारी अलंकृता बगाटे, बापू दासरी आदीची उपस्थिती होती.
Sunday, January 12, 2025
12.1.2025
वृत्त क्रमांक 41
जात प्रमाणपत्र निर्गतीसाठी नांदेड जिल्ह्यात विशेष कृती कार्यक्रम
एसडीओ कार्यालयात दर शनिवारी शिबीराचे आयोजन
नांदेड दि.१२ जानेवारी : नांदेड जिल्ह्यामध्ये जात प्रमाणपत्र निर्गतीसाठी त्यासंबंधी प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यासाठी विशेष शिबीर राबविण्यात येत आहे. गेल्या दोन शनिवारपासून उपविभागीय कार्यालयामध्ये प्रलंबित व नव्या एकूण १२०० प्रकरणाचा निपटारा करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांमध्ये सर्व प्रलंबित कार्य पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले आहे.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनात या संदर्भातील नियोजन करण्यात आले आहे. या कार्यालयामार्फत प्रलंबित सर्व जात पडताळणी प्रकरण निकाली काढण्याबाबत विशेष मोहीम राबविली जात आहे.
इज ऑफ लिविंग वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी, विविध सेवांचे सुसूत्रीकरण व सरळीकरण करण्याचे आणि समस्यांवर सोयीस्कर उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश दिले आहे.त्यानुसार या कार्यालयाने काम करणे सुरू केले आहे.
उपविभागीय कार्यालय नांदेड कार्यालयाने प्रलंबित जात प्रमाणपत्र निकाली काढण्यासाठी मागील शनिवारी व काल दि.१२ जानेवारीला दोन वेळा विशेष शिबीर घेऊन मागील शनिवारी ४०० व आज शनिवार रोजी ८०० असे एकूण १२०० जात प्रमाणपत्र निकाली काढले आहे.
0000
11.1.2025
वृत्त क्रमांक 40
लेखा कोषागारे कल्याण समितीच्या विभागीय क्रीडा स्पर्धाचे थाटात उदघाटन
आठ जिल्ह्यातील 500 अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग
नांदेड दि. 11 जानेवारी :- दैनंदिन कामासोबत प्रत्येकांनी एक तरी खेळ आपल्या आयुष्यात जोपासावा हीच दिर्घायुषाची गुरुकिल्ली आहे. तसेच खेळाडुंनी खेळभावनेने खेळून आपआपसातील संवाद वाढवावा, असे आवाहननांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले. आज वित्त व लेखा विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धाचे सायन्स कॉलेज क्रीडा संकुलात त्यांच्या हस्ते उदघाटन झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व खेळाडूंचे विशेष कौतूक केले.
यावेळी सिनीयर स्टेट वेटलिफ्टींग चॅपियनशिप सुवर्णपदक विजेते परमज्योतसिंग सिद्धु संचालक किरणकुमार धोत्रे, कोषागार कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी आदीची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सहसंचालक स्थानिक निधी लेखा छत्रपती संभाजीनगर श्रीमती दिपाराणी देवतराज यांनी क्रीडा स्पर्धेचा आनंद, खेळभावना व शिस्तीचे पालन करत खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. या क्रीडा स्पर्धासाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्याचे लेखा व कोषागारे , स्थानिक निधी लेखा कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यावेळी इतर जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
वित्त व लेखा विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धाना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भेट देऊन खेळाडू अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविले व स्वत: ही खेळाचा आस्वाद घेतला. या स्पर्धामध्ये छत्रपती संभाजी नगर विभागातील एकूण 8 जिल्ह्याचे एकूण 500 अधिकारी कर्मचाऱ्यांनी विविध क्रीडा प्रकारात भाग घेतला आहे. या क्रीडा स्पर्धा आज व उद्या दोन दिवस चालणार असून उद्या कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ सायन्स कॉलेज येथे होणार आहे.
0000
12.1.2025
संचालनालय लेखा व कोषागारे कल्याण समिती विभागीय क्रीडा स्पर्धा २०२५ सायन्स कॉलेज च्या संकुलात संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या विजेत्या खेळाडू ...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...