Sunday, January 12, 2025

11.1.2025

 वृत्त क्रमांक 40

लेखा कोषागारे कल्याण समितीच्या विभागीय क्रीडा स्पर्धाचे थाटात उदघाटन

आठ जिल्ह्यातील 500 अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग

नांदेड दि. 11 जानेवारी :- दैनंदिन कामासोबत प्रत्येकांनी एक तरी खेळ आपल्या आयुष्यात जोपासावा हीच दिर्घायुषाची गुरुकिल्ली आहे. तसेच खेळाडुंनी खेळभावनेने खेळून आपआपसातील संवाद वाढवावा, असे आवाहननांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले. आज वित्त व लेखा विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धाचे सायन्स कॉलेज क्रीडा संकुलात त्यांच्या हस्ते उदघाटन झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व खेळाडूंचे विशेष कौतूक केले.

यावेळी सिनीयर स्टेट वेटलिफ्टींग चॅपियनशिप सुवर्णपदक विजेते परमज्योतसिंग सिद्धु संचालक किरणकुमार धोत्रे, कोषागार कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी आदीची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सहसंचालक स्थानिक निधी लेखा छत्रपती संभाजीनगर श्रीमती दिपाराणी देवतराज यांनी क्रीडा स्पर्धेचा आनंद, खेळभावना व शिस्तीचे पालन करत खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. या क्रीडा स्पर्धासाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्याचे लेखा व कोषागारे , स्थानिक निधी लेखा कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यावेळी इतर जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

वित्त व लेखा विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धाना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भेट देऊन खेळाडू अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविले व स्वत: ही खेळाचा आस्वाद घेतला.  या स्पर्धामध्ये छत्रपती संभाजी नगर विभागातील एकूण 8 जिल्ह्याचे एकूण 500 अधिकारी कर्मचाऱ्यांनी विविध क्रीडा प्रकारात भाग घेतला आहे. या क्रीडा स्पर्धा आज व उद्या दोन दिवस चालणार असून उद्या कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ  सायन्स कॉलेज येथे होणार आहे.

0000

































































No comments:

Post a Comment

12.1.2025

 संचालनालय लेखा व कोषागारे कल्याण समिती विभागीय क्रीडा स्पर्धा २०२५ सायन्स कॉलेज च्या संकुलात संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या विजेत्या खेळाडू ...