Monday, October 18, 2021

 तात्पुरता फटाका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्यास मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 18 :- सन 2021 मध्‍ये दिपावली उत्‍सव 4 ते 6 नोव्‍हेंबर 2021 या कालावधीत साजरा होणार आहे. त्‍याअनुषंगाने तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्‍याच्‍या कालावधीस शनिवार 30 ऑक्‍टोंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्‍यात आली आहे. 

नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरता फटाका परवाना सेतू समिती जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्‍यामार्फत व जिल्‍हयातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रातील तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विस्‍फोटक अधिनिमय 2008 नुसार 24 सप्टेंबर ते 11 ऑक्‍टोंबर 2021 या कालावधीत विक्री व स्विकारण्याची मुदत देण्यात आली होती. परंतू तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्‍याच्‍या कालावधीची मुदतवाढ आता 30 ऑक्‍टोंबर 2021 पर्यंत देण्‍यात आली आहे. याव्‍यतीरिक्‍त 26 सप्टेंबर 2021 रोजी दिलेल्या जाहीर प्रगटनातील अटी व शर्ती कायम राहतील, याची संबधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 नांदेड जिल्ह्यात 5 व्यक्ती कोरोना बाधित तर 3 कोरोना बाधित झाला बरा  

नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 684 अहवालापैकी 5 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे 2 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 362 एवढी झाली असून यातील 87 हजार 685 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 25 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, देगलूर 1, किनवट 1 असे एकुण 5 बाधित आढळले. आज जिल्ह्यातील मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 3 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. आज 25  कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 20, किनवट कोविड रुग्णालयात 1 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 46 हजार 103

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 42 हजार 543

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 362

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 685

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-25

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...