Monday, October 18, 2021

 तात्पुरता फटाका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्यास मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 18 :- सन 2021 मध्‍ये दिपावली उत्‍सव 4 ते 6 नोव्‍हेंबर 2021 या कालावधीत साजरा होणार आहे. त्‍याअनुषंगाने तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्‍याच्‍या कालावधीस शनिवार 30 ऑक्‍टोंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्‍यात आली आहे. 

नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरता फटाका परवाना सेतू समिती जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्‍यामार्फत व जिल्‍हयातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रातील तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विस्‍फोटक अधिनिमय 2008 नुसार 24 सप्टेंबर ते 11 ऑक्‍टोंबर 2021 या कालावधीत विक्री व स्विकारण्याची मुदत देण्यात आली होती. परंतू तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्‍याच्‍या कालावधीची मुदतवाढ आता 30 ऑक्‍टोंबर 2021 पर्यंत देण्‍यात आली आहे. याव्‍यतीरिक्‍त 26 सप्टेंबर 2021 रोजी दिलेल्या जाहीर प्रगटनातील अटी व शर्ती कायम राहतील, याची संबधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...