Monday, March 16, 2020


जिल्हा परिषद अनुकंपा धारकांची
प्रतिक्षा यादी प्रसिद्ध ;
आक्षेप पुराव्यासह सादर करण्याचे आवाहन
नांदेड दि. 16 :-  अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच 379 अनुकंपा धारकांची प्रतिक्षा यादी जिल्हा परिषद नांदेडच्या www.zpnanded.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध  केली आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या व नांदेड जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयातील आवाराच्या भिंतीवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पूर्ण / अपुर्ण प्रतिक्षा यादी 31 डिसेंबर 2019 अखेरपर्यंत प्राप्त प्रस्तावाप्रमाणे घोषित करण्यात आली आहे. घोषित केलेल्या यादीतील ज्या उमेदवाराचे प्रस्ताव अपूर्ण आहेत अशा अनुकंपा धारकांनी कागदपत्रांची पुर्तता केली नाही. अथवा जेष्ठतेबाबत काही आक्षेप असल्यास संबंधीत अनुकंपा धारकांनी सोमवार 23 मार्च 2020 पूर्वी त्यांचे म्हणणे लेखी पुरवानिशी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागास सादर करावी. त्यानंतर आलेल्या आक्षेपाचा विचार करण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.
00000


कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्थगित
नांदेड दि. 16 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्माक उपाय योजनेचा एक भाग म्हदणुन बुधवार 18 मार्च, 2020 रोजी नांदेड जिल्ह्या तील एकुण 1 हजार 309 ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत स्थमगित करण्याणत आला आहे. या सरपंच पदाचे आरक्षण सोडतीचा दिनांक यथावकाश कळविण्या त येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
शासन आदेशान्व्ये नांदेड जिल्हयातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण बुधवार 18 मार्च 2020 रोजी सकाळी 110 वा. सर्व संबंधित तालुका मुख्यादलयी आयोजित करण्यात करण्यापबाबत आदेशित करण्या त आले होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्माक उपायोजनेचा एक भाग म्हचणुन नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याणबाबत शासनाकडून निर्देश देण्या त आले आहेत.
बुधवार 18 मार्च, 2020 रोजी नांदेड जिल्ह्यातील एकुण 1 हजार 309 ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम त्या-त्या तालुक्याच्या मुख्यालयी होणार होती. त्याठिकाणी तालुक्यातील सर्व सरपंच, तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य असे त्या तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतीच्या 10 पट नागरीक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आला आहे, असेही जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000


कोरोना आजाराचा प्रादुर्भाव :
राज्य माहिती आयोगाकडील
द्वितीय अपील सुनावणी कार्यक्रम रद्द
नांदेड दि. 16 :- मा. राज्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद द्वितीय अपील सुनावणी दि 17, 18 19 मार्च 2020 रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आयोजित कार्यक्रम सद्यस्थितीस कोरोना आजाराचा प्रादुर्भाव व महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात दिलेले सूचनांचे अनुषंगाने द्वितीय अपील सुनावणी कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
सदर सुनावणीसाठी पुढील तारीख सर्व संबधितांना आयोगातर्फे यथावकाश कळविण्यात येईल, याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी, मा. राज्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद यांनी निर्देश दिले आहेत. असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...