कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्थगित
नांदेड दि. 16 :- कोरोना विषाणूचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्माक उपाय योजनेचा एक भाग म्हदणुन बुधवार 18
मार्च, 2020 रोजी नांदेड जिल्ह्या तील एकुण 1
हजार 309 ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण
सोडतीचा कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत स्थमगित करण्याणत आला आहे. या सरपंच पदाचे
आरक्षण सोडतीचा दिनांक यथावकाश कळविण्या त येईल, असे
जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
शासन आदेशान्व्ये नांदेड जिल्हयातील ग्रामपंचायत सरपंच
पदाचे आरक्षण बुधवार 18 मार्च 2020 रोजी
सकाळी 110 वा. सर्व संबंधित तालुका मुख्यादलयी आयोजित करण्यात
करण्यापबाबत आदेशित करण्या त आले होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
प्रतिबंधात्माक उपायोजनेचा एक भाग म्हचणुन नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी
टाळण्याणबाबत शासनाकडून निर्देश देण्या त आले आहेत.
बुधवार 18 मार्च, 2020 रोजी
नांदेड जिल्ह्यातील एकुण 1 हजार 309 ग्रामपंचायतीच्या
सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम त्या-त्या तालुक्याच्या मुख्यालयी होणार होती.
त्याठिकाणी तालुक्यातील सर्व सरपंच, तालुक्यातील
ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य असे त्या तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतीच्या 10 पट नागरीक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम
पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आला आहे, असेही
जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment