Sunday, December 13, 2020

 

नांदेड जिल्ह्यातील सर्व आरओ विक्रेत्यांना

केंद्र सरकारच्या जलसंसाधन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र अनिवार्य

नांदेड (जिमाका) दि. 13 :- विजयसिंह दुब्बल आणि इतर विरुद्ध महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व इतर या प्रकरणात राष्ट्रीय हरित लवाद नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार केंद्रीय भूजल प्राधिकरण यांची परवानगी / प्रमाणपत्र / नाहरकत प्रमाणपत्र जर घेतले नसेल तर शुद्ध (आरओ वाटर) कॅन विक्री करणाऱ्या पाणी विक्री युनिटधारकाविरुद्ध कारवाई करुन युनिट सिल करण्याचे निर्देश दिले होते. तथापि यात भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय, जलसंसाधन विभाग, नदी विकास आणि गंगा पुनर्रजीवन, केंद्रीय भूजल प्राधिकरण यांनी दि. 26 ऑक्टोंबर 2020 रोजी जाहीर सूचनेद्वारे नमूद केल्याप्रमाणे ज्यांचे युनिट मायक्रो आणि स्मॉल इंटरप्राईजेस (एमएसईएस) मध्ये 10 हजार लिटरपेक्षा कमी पाणी जमिनीतून उपसा करतात त्यांना नाहरकत प्रमाणपत्राची गरज नसल्याचे प्रतिपादित केले होते. अशा युनिटने केंद्रीय भूजल प्राधिकरण नागपूर यांच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. 

सदर निर्देश लक्षात घेता नांदेड जिल्ह्यातील सर्व पाण्याचे जार / कॅन विक्री युनिटधारकांनी निर्देशीत केल्याप्रमाणे भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय व अनुषंगिक विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र किंवा त्यांच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेले प्रमाणपत्र सर्व संबंधित प्राधिकरणास सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा‍ जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर व नांदेड मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी केले आहे.   

00000

 

16 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

23 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी  

नांदेड (जिमाका) दि. 13 :-  रविवार 13 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 16 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 5 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 11 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 23 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या 581 अहवालापैकी 565 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 845 एवढी झाली असून यातील 19 हजार 774 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 315 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 16 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. शनिवार 12 डिसेंबर रोजी चौफाळा नांदेड येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 560 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 10, खाजगी रुग्णालय 7, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 4, हदगाव कोविड रुग्णालय 1 असे एकूण 23 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.86 टक्के आहे.  

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 3, हिंगोली 2 असे एकुण 5 बाधित आढळले तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 6, कंधार तालुक्यात 1, नायगाव 1, हदगाव 1, मुदखेड 1, नागपूर 1 असे एकुण 11 बाधित आढळले.  

जिल्ह्यात 315 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 33, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 14, मुखेड कोविड रुग्णालय 6, देगलूर कोविड रुग्णालय 5, हदगाव कोविड रुग्णालय 5, किनवट कोविड रुग्णालय 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 165, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 32, हैदरबाद येथे संदर्भित 1, खाजगी रुग्णालय 26 आहेत.  

रविवार 13 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 168, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 70 एवढी आहे.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 63 हजार 668

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 38 हजार 827

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 845

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 774

एकुण मृत्यू संख्या-560

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.86 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-435

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-315

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-16. 

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...