Saturday, August 8, 2020

 वृत्त क्र. 744   

92 व्यक्तींना आज कोरोनातून बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी

जिल्ह्यात 114 बाधितांची भर तर दोघांचा मृत्यू 

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :-  जिल्ह्यात आज  8 ऑगस्ट रोजी सायं. 5  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 92  कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 114 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 456 अहवालापैकी  293 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 3 हजार 156 एवढी झाली असून यातील 1 हजार 415 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 1 हजार 608 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 85 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.  

 

शुक्रवार 7 ऑगस्ट रोजी सिडको नांदेड येथील 72 वर्षाची एक महिला, अर्धापूर तालुक्यातील कासरखेड येथील 72 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 116 एवढी झाली आहे.  

  

आज बरे झालेल्या 92 कोरोना बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथील 13, नायगाव कोविड केअर सेंटर येथील  15, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल 4, देगलूर कोविड केअर सेंटर 10, खाजगी रुग्णायातील 11, बिलोली कोविड सेंटर 4, गोकुंदा कोविड केअर सेंटर 5, धर्माबाद कोविड केअर सेंटर 10, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 20 असे एकूण 92 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  

 आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये नांदेड मनपाक्षेत्र 28, अर्धापूर तालुक्यात 2, बिलोली तालुक्यात 1, भोकर तालुक्यात 4, कंधार तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 1, हिंगोली 1, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 2, देगलूर तालुक्यात 14, हदगाव तालुक्यात 8, किनवट तालुक्यात 1, मुखेड तालुक्यात 22, उमरी तालुक्यात 1, परभणी 3, लातूर 1 असे एकूण 92 बाधित आढळले.

 अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 2, अर्धापूर तालुक्यात 4, बिलोली तालुक्यात 3, धर्माबाद तालुक्यात 1, देगलूर तालुक्यात 3, किनवट तालुक्यात 2, नायगाव तालुक्यात 4, माहूर तालुक्यात 3 असे एकूण 22 बाधित आढळले.

 जिल्ह्यात 1 हजार 608 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 161, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 626, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 53, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 83, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 38, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 131, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 95, लोहा कोविड केअर सेंटर येथे 13, हदगाव कोविड केअर सेंटर 64, भोकर कोविड केअर सेंटर 8, उमरी कोविड केअर सेंटर 14, कंधार कोविड केअर सेंटर येथे 17, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 21, किनवट कोविड केअर सेंटर येथे 31, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 20, मुदखेड कोविड केअर सेटर 17, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 20,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 18, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 28, बारड कोविड केअर सेंटर 5, खाजगी रुग्णालयात 137, औरंगाबाद येथे संदर्भित 5, निजामाबाद येथे 1 बाधित, हैदराबाद येथे 1 तर मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत. 

 जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

 सर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 861,

घेतलेले स्वॅब- 20 हजार 754,

निगेटिव्ह स्वॅब- 15 हजार 847,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 114,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 3 हजार 156,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 17,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 27,

मृत्यू संख्या- 116,

रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 हजार 415,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 608,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 326, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 85

 प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

जेंव्हा कोविड केअर सेंटरमध्ये

माणसाने माणसाशी माणसासम... प्रार्थना निनादते !

 


नांदेड (जिमाका) दि. 8 :- नांदेड आणि लातूर जिल्ह्याच्या काठावर असलेला मुखेड तालुक्यातील शंभर बेडचे कोविड केअर सेंटर. रोज नित्य-नियमाप्रमाणे सकाळी इथे उपचार घेणारे बाधित उठतात. सकाळच्या प्रातक्रिया आटोपून ही मंडळी एका वेगळ्या गोष्टीसाठी अतुरतेने वाट पाहत असतात. मुखेड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. आनंद पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली डॉ. संतोष टांकसाळे व त्यांची टिम कार्यरत असलेल्या या सेंटरचे समुपदेशक शौकतअली मदार बेग बरोबर 9 वाजता या सर्वांमध्ये दाखल होतात. सुरुवातीचा एक तास योगा आणि प्रार्थनेच्या रुपात तो सुरु करतो. दिर्घ श्वासाच्या काही क्रिया तो घेतो. एरवी योगाच्या साध्या छोट्या क्रियेपासून जे बहुसंख्य लोक दूर असतात त्यांच्यासाठी थोडे बहुत कुतुहल जागे होते. जे थोडे बहुत शिकलेले आहेत ते लोकं काही प्रश्न उपस्थित करतात. अशांना समजवत व्यायामाचा हा तास पूर्ण होतो. यात सारे बाधित ज्याची वाट पाहत असतात ती प्रार्थना जवळ येते. या बाधितात आठव्या वर्गात शिकत असलेली कु. संजीवनी काशिनाथ बोडके ही  मुलगी प्रार्थनेला सुरुवात करते. नकळत सगळ्यांचे हात जोडले जातात, डोळ मिटतात आणि शब्द सुरु होतात हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे..!

प्रार्थना संपल्यावर समुपदेशात प्रश्न-उत्तराच्या माध्यमातून वेगळा तास सुरु होतो. असंख्य खूप साधेसाधे प्रश्न इथे दाखल झालेले बाधित बेगला विचारत राहतात. माझं काही दूखत नसतांना मला इथे कशाला आणलं आहे..., घरी गेल्यानंतर मला असेच राहवे लागेल का..., मला भावासोबत जवळ राहून बोलता येईल का..., पुन्हा लोकात मला मिसळता येईल का...असे कितीतरी प्रश्न या सर्व प्रश्नांचे निरसन करुन बाधितांच्या चेहऱ्यांवर हसू आणण्यासाठी समुपदेशक बेग पुढच्या तयारी लागतो. त्याला तिथल्या व्यवस्थापनाबाबत जेंव्हा आपण विचारतो तेंव्हा तो सांगून जातो साहेब या आजाराला ग्रामीण भागात वेळेवर अषोधोपचार सुरु करण्यासमवेत समुपदेशनच खूप लाख मोलाचे आहे. मागील पाच महिन्यांपासून बेग हा दररोज नित्यनियमाने या कोविड बाधितांच्या वार्डात जाऊन समुपदेशनाचे काम करीत आहेत. याबाबत काळजी घ्यायची कशी हा प्रश्न त्याला जेंव्हा आपण विचारतो तेंव्हा तो सांगतो हाताला सतत सॅनिटाइज करणे, पाच फुट अंतर ठेवून बोलणे, सतत मास्क लाऊन राहणे एवढी काळजी मी जबाबदारीने घेतो. त्यांच्या शंकांचे समाधान ही माझ्यासाठी मोठी ऊर्जा आहे. पॉझिटिव्ह सोच ठेवली की सारे काही सोपे होते. हे सांगायलाही तो विसरत नाही. 

 देगलूर विभागात असलेल्या ग्रामीण भागात अजूनही लोक कोविड-19 ला गंभीरतेने घेत नाही. खेड्यांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. इथले बहुसंख्य लोक मास्क खिशात ठेवतील पण वापरणार नाहीत. या लोकांनी आता स्वत:हूनच वर्तनात बदल आणून योग्यती सुरक्षा घेतली पाहिजे अशी अपेक्षा इथले उपविभागीय दंडाधिकारी शक्ती कदम यांनी सांगितले. ग्रामीण भागाच्या तुलनेत शासनाला जे काही शक्य होत आहे त्यापरिने आम्ही वैद्यकिय सेवा सुविधा इथे उपलब्ध केल्या आहेत. वेळप्रसंग पडल्यास आव्हानात्मक स्थितीतही आम्ही पूर्ण क्षमतेने कार्य करु, असा विश्वास त्यांनी दिला. मुखेडमध्ये सद्यस्थितीत 100 बेडचे कोरोना केअर सेंटर, ऑक्सीजनची सुविधा असलेले 40 बेड, आयसीयूमध्ये 10 बेड उपलब्ध आहेत. शिवाय आयटीआयची इमारत आम्ही ताब्यात घेतली असून यात 500 बेडची क्षमता आम्ही तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले.  

******


 वृत्त क्र. 741           

ताळेबंदी (लॉकडाऊन) कालावधीत जिल्‍हयातील

सायबर कॅफे शनिवार, रविवार चालू ठेवण्यास मुभा 

नांदेड (जिमाका) दि. 8  :- इयत्‍ता दहावी व बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यार्थ्‍यांना पुढील शिक्षणासाठी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे प्रवेश प्रक्रियेतील आपली माहिती देणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना आपल्या गुणवत्तेनुसार पुढील आवडीच्या क्षेत्रात प्रवेश निश्चित करता यावेत यासाठी त्यांना सायबर, इंटनरनेट कॅफेवर येऊन ऑनलाईन अर्ज केल्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. विद्यार्थ्‍यांची गैरसोय होऊ नये यासाठी सायबर कॅफे चालू असणे गरजेचे असल्‍याने जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्‍हयातील सर्व सायबर कॅफे यांना शनिवारी व रविवारी सुद्धा सकाळी 7 ते सायं 5 वाजेपर्यंत अटी व शर्तीच्‍या अधीन राहून चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.    

जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे संदर्भ क्र. 1 अन्‍वये नमूद आदेशान्‍वये नियमावलीसह दिनांक 31 जुलै 2020 पर्यंत नांदेड जिल्‍हयात नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रासाठी विविध अटी व शर्तीच्‍या अधिन राहून आस्‍थापना व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यत चालू ठेवण्‍यास मुभा देण्‍यात आली होती.

 मा.मुख्‍य सचिव, महाराष्‍ट्र शासन यांचे आदेश दिनांक 29 जुलै 2020 नुसार राज्‍यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बध सुकर करण्‍यासह नियम व अटीच्‍या अधिन ताळेबंदीचा कालावधी दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढवून मार्गदर्शक सूचना, निर्देश निर्गमित केले आहे. त्‍यानुसार या कार्यालयाचे संदर्भात नमूद आदेश दिनांक 30 जुलै 2020 अन्‍वये  संदर्भात नमूद या कार्यालयाचे आदेश दिनांक 19 जुलै 2020 मधील अटी व शर्ती जशास तसे लागू करून संपूर्ण नांदेड जिल्‍हयात दिनांक 31 जुलै 2020 नंतर ताळेबंदीचा कालावधी पुढील आदेशापर्यंत वाढविण्‍यात आला आहे.

 इयत्‍ता दहावी व बारावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्‍यांना पुढील शिक्षणासाठी ऑनलाईन प्रक्रीयेव्‍दारे प्रवेश घेण्‍यासाठी प्रवेश प्रक्रीया सुरु झालेली आहे. तथापि जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे संदर्भीय आदेशान्‍वये नांदेड जिल्‍हयात सोमवार ते शुक्रवार विहीत वेळेत दिलेल्‍या अटी व शर्ती नुसारच दुकाने व खाजगी आस्‍थापना सुरु ठेवण्‍यास मुभा आहे. परंतू विद्यार्थ्‍यांची गैरसोय होऊ नये यासाठी सायबर कॅफे चालू असणे गरजेचे असल्‍याने नांदेड जिल्‍हयातील सर्व सायबर कॅफे यांना शनिवार व रविवारी सुध्‍दा चालू ठेवण्‍यासाठी परवानगी देणे आवश्‍यक होते, असेही आदेशात नमूद केले आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...