Saturday, August 8, 2020

 वृत्त क्र. 741           

ताळेबंदी (लॉकडाऊन) कालावधीत जिल्‍हयातील

सायबर कॅफे शनिवार, रविवार चालू ठेवण्यास मुभा 

नांदेड (जिमाका) दि. 8  :- इयत्‍ता दहावी व बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यार्थ्‍यांना पुढील शिक्षणासाठी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे प्रवेश प्रक्रियेतील आपली माहिती देणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना आपल्या गुणवत्तेनुसार पुढील आवडीच्या क्षेत्रात प्रवेश निश्चित करता यावेत यासाठी त्यांना सायबर, इंटनरनेट कॅफेवर येऊन ऑनलाईन अर्ज केल्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. विद्यार्थ्‍यांची गैरसोय होऊ नये यासाठी सायबर कॅफे चालू असणे गरजेचे असल्‍याने जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्‍हयातील सर्व सायबर कॅफे यांना शनिवारी व रविवारी सुद्धा सकाळी 7 ते सायं 5 वाजेपर्यंत अटी व शर्तीच्‍या अधीन राहून चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.    

जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे संदर्भ क्र. 1 अन्‍वये नमूद आदेशान्‍वये नियमावलीसह दिनांक 31 जुलै 2020 पर्यंत नांदेड जिल्‍हयात नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रासाठी विविध अटी व शर्तीच्‍या अधिन राहून आस्‍थापना व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यत चालू ठेवण्‍यास मुभा देण्‍यात आली होती.

 मा.मुख्‍य सचिव, महाराष्‍ट्र शासन यांचे आदेश दिनांक 29 जुलै 2020 नुसार राज्‍यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बध सुकर करण्‍यासह नियम व अटीच्‍या अधिन ताळेबंदीचा कालावधी दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढवून मार्गदर्शक सूचना, निर्देश निर्गमित केले आहे. त्‍यानुसार या कार्यालयाचे संदर्भात नमूद आदेश दिनांक 30 जुलै 2020 अन्‍वये  संदर्भात नमूद या कार्यालयाचे आदेश दिनांक 19 जुलै 2020 मधील अटी व शर्ती जशास तसे लागू करून संपूर्ण नांदेड जिल्‍हयात दिनांक 31 जुलै 2020 नंतर ताळेबंदीचा कालावधी पुढील आदेशापर्यंत वाढविण्‍यात आला आहे.

 इयत्‍ता दहावी व बारावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्‍यांना पुढील शिक्षणासाठी ऑनलाईन प्रक्रीयेव्‍दारे प्रवेश घेण्‍यासाठी प्रवेश प्रक्रीया सुरु झालेली आहे. तथापि जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे संदर्भीय आदेशान्‍वये नांदेड जिल्‍हयात सोमवार ते शुक्रवार विहीत वेळेत दिलेल्‍या अटी व शर्ती नुसारच दुकाने व खाजगी आस्‍थापना सुरु ठेवण्‍यास मुभा आहे. परंतू विद्यार्थ्‍यांची गैरसोय होऊ नये यासाठी सायबर कॅफे चालू असणे गरजेचे असल्‍याने नांदेड जिल्‍हयातील सर्व सायबर कॅफे यांना शनिवार व रविवारी सुध्‍दा चालू ठेवण्‍यासाठी परवानगी देणे आवश्‍यक होते, असेही आदेशात नमूद केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1129 लोकसभेसाठी 67.81 तर विधानसभेसाठी 69.45 टक्के मतदान  विधानसभेसाठी भोकर येथे सर्वाधिक 76.33 तर नांदेड उत्तरमध्ये 60.6 सर्वात...