आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जून रोजी नांदेडात राज्यस्तरीय योग शिबीर
नांदेड, दि.18:- आंतरराष्ट्रीय
योग दिनानिमित्त दि. 21 जून, 2019 रोजी राज्यस्तरीय योग शिबीराचे महाराष्ट्र
शासनातर्फे पतंजली योग पिठाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त
नांदेड येथील शिवरत्न जिवाजी महाले चौक (मामा चौक), असर्जन, नांदेड येथे सकाळी
5-00 ते 7-30 यावेळेत आयोजन करण्यात आले आहे. शिबीरानिमित्त शासकीय विश्रामगृह ,
नांदेड येथील मिनी सह्याद्री येथे बैठक
खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीस
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, हरिद्वार येथील
पतंजली योगपिठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्या, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हा परिषद
सदस्य बबन बारसे, निवासी उपजिल्हाधिकारी
अनुराधा ढालकारी, उपविभागीय अधिकारी महेश वडदकर, तहसीलदार किरण अंबेकर, लेखाधिकारी
निळकंठ पाचंगे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, मिलींद देशमुख, श्रीराम लाखे,
मनपाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, आदिंची यावेळी उपस्थिती होती.
आंतरराष्ट्रीय
योग दिनानिमित्त योग शिबीरात योग साधक, सामान्य नागरिक, शाळा, महाविद्यालयाचे
विद्यार्थी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील अधिकारी , कर्मचारी
यांना या योगशिबीराचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
खा. प्रताप पाटील
चिखलीकर यांनी योग शिबीराच्या अनुषंगाने नियंत्रण कक्ष, प्रशिक्षण समिती, मिडिया
कक्ष, वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था, स्टेज व्यवस्था, वाहनाची पार्किंग
व्यवस्था, जनजागृती व जनजागरण समितीची माहिती, स्वच्छता निरीक्षणाबाबतची
माहिती,मैदान व्यवस्था, वैद्यकीय सेवा, बैठक व्यवस्था आदि विविध विषयांचा आढावा
घेवून उपयुक्त सुचना केल्या.
0000