Tuesday, June 18, 2019

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी 10 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन



नांदेड दि. 18 :- अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्र, गुणपत्रक व पुढील वर्गात प्रवेश घेतल्याच्या पुराव्यासह बुधवार 10 जुलै 2019 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळामार्फत इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदवीव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी आदी आभ्यासक्रमामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचे वितरण केले जाते. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्याने गुणवत्ता 60 टक्केच्यावर गुणाने उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील विद्यार्थी, विद्यार्थींनींना महामंडळाकडून ज्येष्ठता व गुणक्रमानुसार उपलब्ध निधीच्या अधीन राहून अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.
पात्र विद्यार्थी-विद्यार्थींनीना विहित नमुन्यातील अर्ज बुधवार 10 जुलै 2019 पर्यंत भरणा करुन आवश्यक ते कागदपत्र, गुणपत्रक टीसी, झेरॉक्स, जातीचा दाखला, आधार कार्ड, राशन कार्ड उत्पन्नाचे प्रमाणपत्र, एक फोटो व पुढील वर्गात प्रवेश घेतल्याबाबत पुराव्यासह हस्तलिखीत अर्ज स्विकारण्यात येत आहेत. अर्ज जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, हिंगोली रोड, नांदेड याठिकाणी देण्यात यावीत. बुधवार 10 जुलै नंतर अर्ज स्विकारल्या जाणार नाहीत, असेही आवाहन महामंडळाने केले आहे.
000000


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...