Saturday, July 6, 2019



नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत
पालकमंत्री रामदास कदम यांनी खर्च झालेल्या निधीचा घेतला आढावा  


            नांदेड, दि. 6 :- नांदेड जिल्ह्यातील विविध जिल्हा नियोजन समितीच्या मागील दि. 16 जानेवारी, 2019 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तातील मुद्याबाबत संबधित अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीचे एकत्रीत अनुपालन अहवाल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली.
            जिल्हा नियोजन समितीची बैठक नांदेड येथील नियोजन भवनाच्या सभागृहात झाली. यावेळी खासदार प्रताप पाटील-चिखलीकर, खासदार हेमंत पाटील,  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार, आ. अमिताताई चव्हाण,आ. अमर राजूरकर, आ. राम पाटील रातोळीकर, आ. वसंतराव चव्हाण,                आ. सुभाष साबणे, आ. डि. पी. सावंत, आ. डॉ. तुषार राठोड, आ. नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधिक्षक संजय जाधव, मनपा आयुक्त लहुराज माळी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी अभिनव गोयल आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना) सन 2018-19 माहे मार्च, 2019 अखेर झालेल्या खर्चास मान्यता देण्यात आली. जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या विकास योजना जसे (कृषी, पशुसंवर्धन वने, सहकार, ग्रामविकास, शिक्षण, क्रिडा, व्यवसाय शिक्षण, आरोग्य, पाणीपूरठा व स्वच्छता, नगर विकास, मागासवर्गीयाचे कल्याण लघुपाटबंधारे, जलयूक्त शिवार, विद्युत विकास, ग्रामीण लघुउद्योग, रस्ते विकास, पर्यटन, तिर्थक्षेत्र इत्यादी विकास क्षेतातील योजना) राबविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सर्वसाधारण योजना, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना अशा तीन प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध होतो.
या बैठकीस सन 2018-19 मध्ये या तीन योजनेसाठी एकूण रू.473.02 कोटी तरतूद मंजूर होती आणि रू.472.72 कोटी प्राप्त झाले होते आणि माहे मार्च 2019 अखेर रू.471.47 कोटी म्हणजे 99.74 टक्के विवध विकास योजनावर खर्च झालेला आहे. त्‍यापैकी जिल्‍हा पशुसंवर्धन उपआयुक्‍त, नांदेड यांनी रु.2.96 लक्ष एवढा निधी खर्च न केल्यामुळे शासनास समर्पित झालेला आहे.
            जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती, उपयोजना, आदिवासी उपयोजना) सन 2019-20 माहे जून, 2019 अखेरचा खर्च व करावयाच्या खर्चाचे नियोजन याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
            तसेच गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी 20 कोटी रुपयांचा निधी राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री रामदास कदम यांनी यावेळी सांगितले. तसेच शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 14 जुलै रोजी शासनस्तरावर 14 जुलै, 2019 रोजी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
सन 2019-20 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सर्वसाधारण योजना, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना या तीन योजनेसाठी एकूण रू.480.12 कोटी तरतूद मंजूर आहेत आणि आतापर्यंत 33 टक्के म्हणजे रू.161.19 कोटी प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेल्या तरतूदीपैकी यंत्रणेच्या मागणीप्रमाणे रू.4.02 कोटीचे वितरण करण्यात आलेले असुन रु.0.14 कोटी खर्च करण्‍यात आलेला आहे.
            या बैठकीस सर्व समिती सदस्य, तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. कोलगणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वागत केले.
0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...