Friday, March 10, 2017

सामाजिक न्याय मंत्री
राजकुमार बडोले यांचा सुधारीत दौरा
नांदेड दि. 10 :- राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 11 मार्च 2017 रोजी मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. नांदेड रेल्वे स्थानकावर आगमन व शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण करतील. सकाळी 9 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 10.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेडकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वा. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे आगमन व सामाजिक न्याय विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या संत रविदास पुरस्कार, पद्मश्री  कर्मवीर  दादासाहेब गायकवाड पुरस्कार आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 1.45 वा. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथून मोटारीने हॉटेल पुजा गार्डन लातूर फाटा नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2 वा. हॉटेल पुजा गार्डन लातूर फाटा नांदेड येथे आगमन व सामाजिक न्याय विभागांतर्गत पुरस्कार प्राप्त मान्यवरांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनास उपस्थिती. दुपारी 2.30 वा. हॉटेल पुजा गार्डन लातूर फाटा नांदेड येथून मोटारीने पालम जिल्हा परभणीकडे प्रयाण. सायं. 7.30 वा. पालम येथून मोटारीने ए. के. संभाजी मंगल कार्यालय पावडेवाडी नाका येथे आगमन आणि जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांचे चिरंजीव शशांक आणि चि. सौ. कां. श्वेता यांच्या शुभविवाह निमित्त आयोजित स्वागत समारंभास उपस्थिती. रात्री 8 वा. ए. के. संभाजी मंगल कार्यालय पावडेवाडी नाका रोड नांदेड येथून मोटारीने अहमदपूर मार्गे लातूरकडे प्रयाण करतील.  

000000
  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात
सी. टी. स्कॅनची सुविधा कार्यान्वित
नांदेड, दि. 10 :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील सी. टी. स्कॅनची सुविधा शुक्रवार 10 मार्च 2017 पासून कार्यान्वित झाली आहे. याचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. काननबाला येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नामधारी, क्ष किरण शास्त्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अमित पंचमहालकर, सहयोगी प्राध्यापक तथा उपवैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रदिप बोडके यांनी केले.

0000000
  आदिवासी सुशिक्षीत बेरोजगारांकडून
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्रासाठी प्रवेश अर्ज मागविले
नांदेड, दि. 10 :-  आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता  माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या प्रशिक्षण केंद्रात शनिवार 1 एप्रिल 2017 पासून सुरु होणाऱ्या 93 व्या प्रशिक्षण सत्रात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छूक उमेदवारांकडून सोमवार 27 मार्च 2017 या मुदतीत अर्ज मागविण्यात येत आहे.
प्रवेशाच्या अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार अनुसूचित जमाती पैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवाराचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. उमेदवार कमीत कमी शालांत परिक्षा उत्तीर्ण असावेत. उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारानी किनवट येथे स्वत: राहण्याची व जेवण्याची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महिने 15 दिवस असून शालांत परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना तसेच पदविधारकांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. वयोमर्यादा उमेदवाराचे वय 31 मार्च 2017 रोजी 18 वर्ष पुर्ण असावे व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.  प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन संबंधीत प्रशिक्षणार्थीचे बँक खात्यामध्ये दरमहा जमा करण्यात येणार असल्यामुळे प्रशिक्षणार्थीचे बँकेमध्ये चालू खाते आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशाप्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा या प्रशिक्षण सत्र अर्ध्यातून सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही.
प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यासाठी द्याव्या लागणाऱ्या विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करुन घेण्यात येते. तसेच आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनाची माहिती देऊन मार्गदर्शन केले जाते. पात्र इच्छूक उमेदवारांनी आपल्या स्वाक्षरीत कोऱ्या कागदावर सोमवार 27 मार्च 2017 पर्यंत शैक्षणिक पात्रतेच्या व जातीच्या प्रमाणापत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी किनवट जि. नांदेड यांनी केले आहे.

000000
जिल्हाधिकारी कार्यालयात
मंगळवारी पेन्शन अदालत
नांदेड दि. 10 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 14 मार्च 2017 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अडचणी निवारण्यासाठी मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

0000000
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 10  :- जिल्ह्यात बुधवार 22 मार्च 2017  रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आगामी काळातील परीक्षा, सण, उत्सव, मिरवणुका आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम, विविध प्रकारची संभाव्य आंदोलनांची शक्यता यांच्‍या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात गुरुवार 9 मार्च 2017 ते बुधवार 22 मार्च 2017 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

000000
यशवंतराव चव्हाण जन्मदिनानिमित्त
12 मार्च रोजी समता दिन
नांदेड दि. 10 :-  भारताचे उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवगंत यशवंतराव चव्हाण यांच्या जन्म दिनानिमित्त 12 मार्च हा दिवस "समता दिन" म्हणून साजरा करण्यात यावा, असे आवाहन शासन परिपत्रकान्वये जिल्हा प्रशासनाने केले आहे
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही रविवार 12 मार्च 2017 रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवगंत यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस अभिवादन करण्यात येईल व त्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे

*******
सामाजिक न्याय मंत्री
राजकुमार बडोले यांचा दौरा
नांदेड दि. 10 :- राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 11 मार्च 2017 रोजी मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. नांदेड रेल्वे स्थानकावर आगमन व शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण करतील. सकाळी 9 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 10.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेडकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वा. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे आगमन व सामाजिक न्याय विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या संत रविदास पुरस्कार, पद्मश्री  कर्मवीर  दादासाहेब गायकवाड पुरस्कार आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 1.45 वा. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथून मोटारीने हॉटेल पुजा गार्डन लातूर फाटा नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2 वा. हॉटेल पुजा गार्डन लातूर फाटा नांदेड येथे आगमन व सामाजिक न्याय विभागांतर्गत पुरस्कार प्राप्त मान्यवरांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनास उपस्थिती. दुपारी 2.30 वा. हॉटेल पुजा गार्डन लातूर फाटा नांदेड येथून मोटारीने पालम जिल्हा परभणीकडे प्रयाण करतील.  

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...