Monday, September 16, 2019

 राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाईध्वजसंहितेचे पालन व्हावे

 नांदेड दि. 16 :राष्ट्रीय कार्यक्रममहत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करतानाभारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसहशाळामहाविद्यालयसंस्थासंघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रममहत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्यानेकार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानातरस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच  कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती  करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर  समित्या स्थापन करण्यात आल्या आहेतकार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेलेमाती लागलेले राष्ट्रध्वज मैदानातरस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेलेमाती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्थाइतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त  व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालयेअर्धशासकीय कार्यालयेस्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावीअसेही गृह विभागाने म्हटले आहे.
                                                                    00000
वृत्त क्र. 656
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास,
मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग मंत्री अर्जुन खोतकर हस्ते ध्वजवंदन

नांदेड, दि. 16 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिननिमित्त मंगळवार, 17 सप्टेंबर, 2019 रोजी माता गुजरीजी विसावा उद्यान, नांदेड येथे राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते सकाळी 8.30 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. या समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 71 वा वर्धापन दिनोत्सवानिमित्त मंगळवार, दिनांक 17 सप्टेंबर, 2019 रोजी सकाळी 08.30 वाजता माता गुजरीजी विसावा उद्यान, नांदेड येथील हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम आणि त्याच ठिकाणी सकाळी 9-00 वाजता राष्ट्रध्वज वंदन समारंभ होणार आहे. 
या समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावेसुरक्षिततेच्या दृष्टिने सोबत बॅग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालयसंस्थाआदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.00 पूर्वी किंवा 9.30 वाजेनंतर आयोजित करावेतअसे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 71 वा वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असे आवाहनही  राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय समितीने केले आहे.
000000
वृत्त क्र. 657
पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा दौरा

    नांदेड, दि. 16 :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग मंत्री श्री. अर्जुन खोतकर हे दिनांक 16 व 17 सप्टेंबर, 2019 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.
सोमवार, दिनांक 16 सप्टेंबर, 2019 रोजी दुपारी 4-00 वाजता दर्शना बंगला जालना येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. रात्री 8-00 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव.
मंगळवार, दिनांक 17 सप्टेंबर, 2019 रोजी सकाळी 8-30 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने माता गुजरीजी विसावा उद्यान , नांदेडकडे प्रयाण. 9-00 वाजता राज्यमंत्री महोदयांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार नांदेड येथून जालनाकडे प्रयाण करतील.
0000
वृत्त क्र. 658
धार्मिक अल्पसंख्यांक खाजगी शाळा,
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकरण योजनेतील
 प्रस्तावातील त्रुटीची पूर्तता करण्याचे आवाहन   

नांदेडदि. 16 :-  धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना आणि डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकरण योजनेंतर्गत संबंधीत शाळा आणि मदरसा यांनी निर्देशीत केलेल्या त्रुटींची पूर्तता जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शनिवार 21 सप्टेंबर 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावीत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव उच्चस्तरीय निवड समिती नांदेड यांनी केले आहे.
सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी नांदेड जिल्हृयातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना आणि डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकरण योजना या दोन योजनेंतर्गत अनुक्रमे अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या शाळा व मदरशांकडून विहित मुदतीत अनुदान मागणीचे प्रस्ताव मागविण्याबाबत राज्य अल्पसंख्यांक विकास विभागाच्या परिपत्रकानुसार नांदेड जिल्ह्यातील सात शाळा व तेवीस मदरसांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहेत.
या प्रस्तावाची शासन निर्णयातील निकषांनुसार तपासणी केली असता परिपूर्ण प्रस्ताव आढळून आले नाही. अनुदान मागणीसाठी शासनास सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावात आवश्यक असणऱ्या दस्ताऐजांबाबत काही त्रुटी आढळून आलेल्या आहेत. याविषयी संबंधित शाळा व मदरसांना निर्देशीत त्रुटींची पूर्तता करण्यासाठी शनिवार 21 सप्टेंबर 2019 पर्यंत निश्चित कालावधी देण्यात आला आहे. जेणेकरुन त्रुटींची पूर्तता करुन शासनास प्रस्ताव उच्चस्तरीय निवड समितीच्या शिफारसीने सादर करता येतील.
संबंधीत शाळा आणि मदरसा यांनी निर्देशीत केलेल्या त्रुटींची पूर्तता जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या कार्यालयात शनिवार 21 सप्टेंबर 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावीत. या योजनेंतर्गत विहित मुदतीत प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता कार्यालयास प्राप्त न झाल्यास अनुदान मागणीचे प्रस्ताव त्रुटी पूर्ततेअभावी शासनास सादर करता येणार नाहीत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव उच्चस्तरीय निवड समिती नांदेड यांनी केले आहे.
0000
वृत्त क्र. 659
जिल्हास्तर शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा (ग्रामिण क्षेत्र मुली) संपन्न

नांदेड दि. 16 :-आयुक्त क्रीडा  युवक सेवा संचालनालय अंतर्गत  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड  जिल्हा क्रीडा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा सन 2019-20 (14, 17, 19 वर्षे मुली) (ग्रामिण क्षेत्र) चे उद्घाटन नुकतेच 14 सप्टेंबर,2019 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल स्टेडीयम परीसरनांदेड येथे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी नांदेड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव  जिल्हा गुणवंत संघटक क्रीडा पुरस्कार प्राप्त अजगर अली पटेल, क्रीडा अधिकारी गुरुदिपसिंघ संधु, किशोर पाठक, प्रवीण कोंडेकर, लेखा लिपीक आनंदा सुरेकर, संजय चव्हाण, तालुका क्रीडा संयोजक जीवन पवार-नायगाव, प्रकाश खोकले- भोकर, श्री.पवळे उमरी, देशमुख शरद क्रीडा शिक्षक आदी उपस्थित होते.
            या स्पर्धेकरीता नांदेड जिल्हयातील (14, 17, 19 वर्षे मुली) चे एकुण 312 खेळाडु  संघ व्यवस्थापकानी उपस्थिती नोंदविली. ही स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांच्या मार्गदर्शनाखाली होत असुन स्पर्धा प्रमुख म्हणुन गुरुदिपसिंघ संधु, क्रीडा अधिकारी हे आहे. या स्पर्धेकरीता पंच प्रमुख म्हणुन अजगरअली पटेल हे असुन यांच्या सोबत सय्यद सफदर पटेल, जीवन पवार, पी.एस.चव्हाण, शेख सोहेल,सय्यद अशफाक, सिध्दांत कांबळे,राठोड सखाराम,.केंद्रे बी.एल., श्रीकांत देशमुख,फड महारुद्रक आदीनी काम केले. या स्पर्धेतील विजयी संघ पुढील प्रमाणे आहेत.
चौदा वर्षे मुली- प्रथम-  जिल्हा परिषद हायस्कुल, विष्णूपूरी ता.जि.नांदेड. द्वितीय श्री संत दासगणु महाराज मा.व उ.मा.विद्यालय, शिरुर ता.उमरी जि.नांदेड. 17 वर्षे मुली- प्रथम-  शांतीनिकेतन विद्यालय,अंबुलगा ता.मुखेड जि.नांदेड    द्वितीय- राजर्षी शाहु विद्यालय, भोकर ता.भोकर जि.नांदेड. 19 वर्षे मुली- प्रथम-  श्री शंकरराव चव्हाण मा.व उ.मा.विद्यालय,आष्टा ता.माहूर जि.नांदेड. द्वितीय- कै.मुंजाजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय, मालेगांव ता.अर्धापूर जि.नांदेड. या स्पर्धेतील विजयी संघ हा गुरुवार 19 सप्टेंबर,2019 रोजी लातुर येथे संपन्न होणा-या विभागीयस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतील  नांदेड जिल्हयाचा प्रतिनिधीत्व करतील, असे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी कळविले आहे.
00000
वृत्त क्र. 660
मधकेंद्र मधमाशा पालन योजना
मधकेंद्र योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

     नांदेड दि. 16 :- महाराष्ट्र राज्य खादी  ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना (मधमाशा पालन) संपुर्ण राज्यात कार्यान्वीत करण्यात आली आहे. यासाठी पात्र व्यक्ती किंवा संस्थाकडून जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नादेड यांनी अर्ज मागविले आहेत.
या मधकेंद्र योजनेमध्ये मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान  50 टक्के स्वगुंतवणुक राहील. शासकीय हमी भावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा तसेच मधमाशा संरक्षक  संवर्धनाची जनजागृती योजनेतील वैयक्तीक मधपाळ प्रमुख घटक असुन अर्जदार साक्षर असावा. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच अर्जदाराचे वय 18 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
केंद्रचालक प्रगतशील मधपाळ व्यक्ती असावी  तसेच अर्जदार किमान 10 वी पास असावा वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे. व्यक्तीच्या किंवा व्यक्तीच्या कुट्रुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतली शेतजमीन असावी. लाभार्थीकडे मधमाशा पालन, प्रजनन,  मधउत्पादनाबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता  सुविधा असावी.
            केंद्रचालक संस्था ही नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1000 चौरस फुट सुयोग्य ईमारत असावी.  संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन  मधउत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेली सेवा असावी असे बंधन घालण्यात आले आहे.
            या योजनेसाठी लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध उद्योग सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहुन देणे अनिवार्य राहील. तसेच मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहणार आहे.  या योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी  ग्रामोदयोग मंडळ नादेड, उद्योग भवन, औद्योगिक वसाहत, शिवाजी नगर, नांदेड पिन कोड. 431 602  मोबाईल क्र. 9921563053  दुरध्वनी क्र. 02462-240674  वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
00000
वृत्त क्र. 661
सयुंक्त कुष्ठरोग शोध अभियान, सक्रीय क्षयरोग शोध मोहीम व
असंसर्गजन्य प्रतिबंध जागरूकता अभियान 2019-2020

नांदेड, दि. 16 :- सहसंचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग व क्षयरोग) पुणे व आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक,रा.आ.अ. मुंबई यांच्या प्राप्त सूचनेनुसार  आज दि. 13 सप्टेंबर, 2019 ते दि. 28 सप्टेंबर 2020 या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर कुष्टरोग शोध मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे संबंधित कालावधीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, नागरी दवाखाने, त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालय यांच्या माध्यमातून रुग्णालय स्तर व गृहभेटीच्या माध्यमातून  कुष्ठरोग, क्षयरोग व असंसर्गजन्यरोग प्रतिबंध जागरूकता अभियान राबविण्यात येणार आहे.
कुष्ठरोगांची लक्षणे :- त्वचेवर फिकट/ लालसर चट्टा, त्याठिकाणी घाम न याने, जाड बधीर टेलकट/ चकाकणारी त्वचा, त्वचेवर घाठी असणे, कानाच्या पाळी जाड होणे, भुवयाचे केस विरळ होणे, डोळे, पूर्ण बंद करता न येणे , तळहातावर व ताल्बयावर मुंग्या येणे, बधीरपणा अथवा जखमा असणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणे, त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे हात व पायामध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातून वस्तू गळून पडणे,
क्षयरोगांची लक्षणे :- दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला , दोन आठवड्यापेक्षा जास्त ताप ,  वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त येणे, मानेवरील गाठ .
 संसर्गजन्य आजारांची लक्षणे:- व्यकीचे वजन वाजवीपेक्षा जास्त असणे, आपण दारू अथवा तंबाखूचे नियंमित  सेवन करणे , कुटुंबातील व्यक्तींना मधुमेह किंवा उच्चरक्तदाब आजार असणे,
गर्भाशय कर्करोग :- अंगावरून पांढऱ्या रंगाचा स्त्राव व दुर्गंधी, मासिक पाळी व्यतरिक्त योनी मधून रक्तस्त्राव, मासिक पाळीचे चक्र बंद झाल्यानानंतर रक्तस्त्राव, शारीरिक संबंधानंतर रक्तस्त्राव होणे. इत्यादी .
गर्भाशय कर्करोग :- दोन आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी तोंड येणे, तोंडामध्ये लालसर किंवा पांढरा चट्टा  असणे, तोंडामध्ये गाठ किंवा जखम किंवा तोंड उधद्ताना त्रास होणे. इत्यादी प्रकारची लक्षणे असणारी व्यक्तीने दि. 13 सप्टेंबर 2019 ते दि. 28 सप्टेंबर 2020 या कालावधीमध्ये सुरु असलेल्या सयुंक्त कुष्ठरोग शोध अभियान, कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर व जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे. 
00000
वृत्त क्र. 662

ग्राहकांच्‍या हक्‍कांचे संरक्षण व संवर्धनाचे कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्‍थांकडून
 सहाय्यक अनुदान वितरीत करण्‍यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
    नांदेड, दि. 16 :- महाराष्‍ट्र ग्राहक संरक्षण व मार्गदर्शन निधी नियम, 1992 मधील परिच्‍छेद 7 नुसार राज्‍य शासनाकडुन महाराष्‍ट्रात ग्राहक चळवळ व ग्राहक जनजागृती क्षेत्रात काम करणा-या तसेच इतर क्षेत्रात काम करणा-या, परंतु ग्राहक चळवळ, ग्राहक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करुन ग्राहकांच्‍या हक्‍कांचे संरक्षण व  संवर्धनाचे कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्‍थांकडून सहाय्यक अनुदान वितरीत करण्‍यासाठी अर्ज मागविण्‍यात येत आहे. संबंधित संस्‍थांकडुन पुढील प्रमाणे कार्यक्रम आयोजित करणे अपेक्षित आहे.
साईन बोर्ड, भित्‍ती चित्र, होर्डिंग इ.चा ग्राहक जनजागृतीबाबत स्‍थानिक भाषांमध्‍ये संदेश देण्‍यासाठी गाव मंडई तसेच कृषी/भाजी बाजार अशा प्रमुख ठिकाणी वापर करणे. ग्राहक जनजागृतीबाबत संदेश देण्‍यासाठी नुक्‍कड नाटक, पथनाटय, पपेट शोज, रागिणी नौटंकी, पांडवानी, विलु पट्टु, मॅरॉथॉन शर्यती इ. चे आयोजन करणे. राज्‍य शासनाने सूचित केलेल्‍या एखादया विषयावर शाळांमध्‍ये प्रदर्शन/भेसळ प्रतिबंधक शिबिरे आयोजित करणे इ. स्‍थानिक कार्यक्रमांमध्‍ये ग्राहक जनजागृतीसंबंधित सामग्रीचे प्रदर्शन व प्रसार हॅण्‍डबील्‍स/पॅम्‍फ्लेटृसचे प्रकाशन करुन ग्रामिण भागात तसेच शाळेतील विदयार्थ्‍यांमध्‍ये त्‍याचे वाटप करणे.
पीडीएस आऊटलेट न्ड व्हिकल (PDS Outlet &Vehicles) चा सहभाग. यासंदर्भात या विभागाच्‍या दिनांक 26 जुलै, 2017 च्‍या शासन निर्णयानुसार, ग्राहक जनजागृती क्षेत्रात काम करणा-या ग्राहक संस्‍थांव्‍यतिरिकत इतर क्षेत्रात काम करणा-या परंतु ग्राहक चळवळीचे ही कार्य करणा-या नोंदणीकृत सस्‍थांना शासनाकडुन अनुदान वितरीत करण्‍याबाबतच्‍या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्‍यात आल्‍या असून, सोबत अर्जाचा नमुनाही देण्‍यात आला आहे. सदर शासन निर्णय महाराष्‍ट्र शासनाच्‍या www.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे.
अर्ज करणाऱ्या इच्‍छुक संस्‍थांनी, विहीत नमुन्‍यातील त्‍यांचा अर्ज व प्रस्‍ताव जिल्‍हाधिकारी कार्यालय, (जिल्‍हयाचे नाव व पत्‍ता ) कडे, दि. 30 सप्‍टेंबर, 2019 पर्यंत  कार्यालयीन वेळेत किंवा त्‍यापुर्वी प्राप्‍त होतील या बेताने सादर करावा. विहीत मुदतीनंतर प्राप्‍त झालेल्‍या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्‍यावी. तसेच यामध्‍ये बदल करण्‍याचे सर्व अधिकार अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे कडे  राखून ठेवण्‍यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000
वृत्त क्र. 663
शासकीय सुट्टीच्या दिवशी संगणकीय तांत्रिक अडचणीमुळे
योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व ड्रायव्हींग लायसन्ससंबंधी ऑनलाईन अपॉईमेंट जारी
    नांदेड, दि. 16 :- नांदेड जिल्हयातील सर्व वाहन चालक / मालक यांना कळविण्यात येते कीदि.17 सप्टेंबर, 2019 रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शासकीय सुट्टीच्या दिवशी संगणकीय तांत्रिक अडचणीमुळे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व ड्रायव्हींग लायसन्ससंबंधी ऑनलाईन अपॉईमेंट जारी झालेल्या आहेत.
तरी दि.17 सप्टेंबर,2019 रोजी ज्या वाहन धारकांनी अपॉईंटमेंट घेतलेले आहे त्यांची गैरसोय टाळण्यासाठी दि.18 ते 25 सप्टेंबर 2019 (सुट्टी वगळून) या कालावधीत त्यांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण संबंधी अर्ज स्विकारण्यात येतीलअसे उप प्रादेशिक परिवहन अधिकारीनांदेड कळवितात.
0000 

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...