Monday, July 29, 2024

 वृत्त 644

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम दोन दिवस

नांदेड, दि. २९ जुलै : "प्रधानमंत्री पीक विमा योजना" खरीप हंगाम-२०२४ मध्ये शेतकऱ्यांना ऑनलाइन विमा अर्ज भरण्यास शेवटचे दोन दिवस उरले असून या योजनेत ज्यांनी विमा काढला नसेल त्या शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

या योजनेत सहभागी होण्याकरिता केवळ १ रुपया भरुन PMFBY पोर्टल http://pmfby.gov.in वर स्वत: शेतकऱ्यांना तसेच बँक विमा कंपनीचे नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इन्शुरन्स ॲप व सामुहिक सेवा केंद्रांमार्फंत  योजनेत सहभाग नोंदविता येणार आहे.

या योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२४ करिता ऑनलाइन स्वरूपात विमा अर्ज भरण्याची सुविधा १६ जून २०२४ पासून सुरू झाली असून सहभागाची अंतिम मुदत १५ जुलै २०२४ अशी निश्चित करण्यात आली होती. योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने खरीप हंगाम ऑनलाईन विमा भरण्यास ३१ जुलै २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. जिल्ह्यातील जनतेने पुढील दोन दिवसात विमा भरण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
00000

 वृत्त 643

अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

शाळा व विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड दि. 29 जुलै :-  केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून अनु. जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पध्दतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये सैनिकी शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, 9 वी 10 वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, इ. 5 वी ते 7 वी आणि इ. 8 वी ते 10 वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती,महर्षि विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क योजना इ. योजना राबविण्यात येत आहेत.

सदरील योजनांमध्ये लातूर विभागातील, लातूर जिल्ह्यातील एकूण शाळा २८२० त्यापैकी लॉगीन केलेल्या शाळांची संख्या २४७८ तर  शिल्लक शाळांची ३४२, धाराशिव जिल्ह्यातील १८६४ पैकी २36 तर शिल्लक शाळांची संख्या 1628, नांदेड जिल्ह्यातील ३८२७ पैकी 3379 तर शिल्लक शाळांची संख्या 448 व हिंगोली जिल्ह्यातील १३९४ शाळांपैकी 945तर शिल्लक शाळांची संख्या 449 आहे. लातूर विभागात एकूण 9905 शाळा आहेत. त्यापैकी 7038 शाळांची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे  शाळेच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन लॉगीन झालेले आहे. उर्वरित 2867 त शाळेंच्या मुख्याध्यापकांनी तात्काळ आपल्या शाळेचे लॉगीन करून ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत व पात्र विद्यार्थी योजनेपासून वंचीत राहणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा  तसेच या योजनेसंदर्भात काही अडचन असल्यास संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण, अधिकारी यांचे कार्यायाशी संपर्क साधावा असे अवाहन  लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले आहे.
0000


 विशेष वृत्त 642 

 विशेष वृत्त 641

 



#मुख्यमंत्रीयुवाकार्यप्रशिक्षणयोजना #नांदेड पहिले कार्यादेश प्रातिनिधीक स्वरूपात प्राप्त करणाऱ्या देगलूरच्या सुप्रसाद दामेकर व पाथरड रेल्वेच्या अंजली आवतिरकने प्रशासनाचे आभार मानले. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडून कौतुक.

#नांदेड #मुख्यमंत्रीयुवाकार्यप्रशिक्षणयोजना अंतर्गत आज माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत योजनेचा प्रातिनिधीक शुभारंभ. दोन तरुणांना नियुक्ती पत्र बहाल.



  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...