Thursday, August 4, 2022

 घरोघरी तिरंगासाठी स्वाभिमानाने पुढे या

-  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून प्रत्येक विभाग प्रमुखांनी अधिकाधिक लोकांशी संपर्क साधून त्यांचा सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

 

घरोघरी तिरंगा अभियानाच्या यशस्वीतेसाठी आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापक बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी व सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील कोणत्याही गरिबाला तिरंगा मिळाला नाही म्हणून त्याच्या आनंदावर विरजन पडता कामा नये. दारिद्रय रेषेखालील कुटूंबांनाही तिरंगा लावता यावा यासाठी उद्योजकांनी सामाजिक उत्तदायित्वाच्या माध्यमातून तिरंगा देण्यासाठी पुढे सरसावे, असेही आवाहनही त्यांनी केले. या मोहिमेच्या प्रसारासाठी प्रत्येक तहसिल कार्यालय आणि पंचायत समिती यांना शासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रत्येक तहसिलदार व पंचायत समिती यांनी विविध उपक्रम हाती घेऊन या उपक्रमाची अधिकाधिक प्रसिद्धी करावी, अशा सूचनाही त्यांनी सर्व तहसिलदारांना दिल्या.  

 

जिल्हा परिषदेतर्फे विशेष ग्रामसभा बोलविण्याबाबत निर्णय झाला आहे. प्रातिनिधीक गावांमध्ये हा ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या असून घरोघरी तिरंगा ग्रामीण भागातील अधिकाधिक घरांवर लावण्याबाबतचे नियोजन केले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली. नांदेड महानगरातील लोकांचा अधिक सहभाग घेण्याच्या उद्देशाने मनपा तर्फे येत्या 10 ऑगस्ट रोजी भव्य मोटार सायकल रॅली आयोजित करण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी दिली. याचबरोबर विविध उपक्रम मनपा तर्फे राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.   

0000






 नांदेड जिल्ह्यात 11 व्यक्ती कोरोना बाधित

तर 31 बाधितांना बरे झाल्याने सुट्टी

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 189 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 7, कंधार 1  तर ॲटीजन तपासणीद्वारे किनवट 3 असे एकूण 11 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 226 एवढी झाली असून यातील 1 लाख 472 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 62 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 6  व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 25 असे एकूण 31  रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 40, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 19, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2 असे एकुण 62 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 13 हजार 672
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 93 हजार 55
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 226
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 472
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.33 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 00
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-62
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00
0000

 अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी  

प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :-  अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. सन 2022-23 या वर्षासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी नवीन व नुतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज   www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर 30 सप्टेंबर 2022 पर्यत भरावेतअसे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यामिक)  नांदेड यांनी केले आहे. 

 

मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार धार्मिक अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना २३ जुलै २००८ च्या शासन निर्णयानुसार सन 2008-09 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. ही शिष्यवृत्ती योजना मुस्लीम, ख्रिश्चन,शीख, पारसी,बौद्ध व जैन या धार्मिक अल्पसंख्याक इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व शासकीय/ निमशासकीय/ अनुदानित/ विनाअनुदानित / स्वयं अर्थसहाय्यीत सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

 

अल्पसंख्याक समाजातील गुणवंत मुलींसाठी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना 3 मे 2003 पासून सुरु केलेली आहे. ही योजना अल्पसंख्याक समाजातील इयत्ता 9 वी ते बारावी पर्यंतच्या मुलींसाठी आहे. इयत्ता 9 वी व  दहावीच्या मुलींना वार्षिक रुपये 5 हजार व 11 वी व 12 वी च्या मुलींना वार्षिक 6 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेचा प्रत्येक वर्षी नवीन अर्ज भरावा लागेल. याबाबत काही तांत्रिक अडचण असल्यास शेख रुस्तुम, शिक्षण विभाग (माध्यमिक)जिल्हा परिषद नांदेड मो.न. ९६८९३५७२१२८२०८१८४६७३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

अर्ज भरण्याची प्रक्रिया 20 जुलै 2022 पासून सुरु झालेली आहे. प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती व बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजचे  नवीन विद्यार्थी (फ्रेश स्टुडंट)    नुतनीकरण  विद्यार्थी (रीनिवल स्टुडंट) यांचे ऑनलाईन  अर्ज भरावयाची अंतिम मुदत  30 सप्टेंबर 2022 पर्यंत  आहे. सन 2021-22 यावर्षी ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचे  अर्ज  रीनिवल स्टुडंट म्हणून भरावयाचे आहेत. रीनिवल विद्यार्थ्यांची यादी शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध आहे. तसेच नवीन, इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांचे  अर्ज फ्रेश स्टुडंट म्हणून भरावयाचे आहेत. शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे. याबाबत सर्व मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असेही आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यामिक)  यांनी केले आहे. 

0000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी    17.90  मि.मी. पाऊस

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात गुरुवार 4 ऑगस्ट रोजी सकाळी 8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी  17.90 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 772.70 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
 
जिल्ह्यात गुरुवार 4 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 56 (770.90), बिलोली-10 (740.10), मुखेड- 16.40 (699.60), कंधार-21.90 (716.50), लोहा-22 (708.20), हदगाव-13.40(725.10), भोकर-10.70(885.20), देगलूर-11.10(658.70), किनवट-1.90(866.20), मुदखेड- 35.40(929.60), हिमायतनगर-2.80(1029.40), माहूर- 6.90 (691.20), धर्माबाद- 11.70 (892.30), उमरी- 18(937.40), अर्धापूर- 31.50(717.10), नायगाव-5.50 (689.30) मिलीमीटर आहे.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...