Friday, June 16, 2017

जमीन महसूल अधिनियम
1966 मध्ये सुधारणा 

                औरंगाबाद, दि. 16:-  महाराष्ट्र शासनाने नुकतेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 42  ब मध्ये सुधारणा केली असून, त्यानुसार ज्या ठिकाणी अंतीम विकास आराखडा प्रसिध्द झाला असेल त्या ठिकाणी विविध  प्रयोजनासाठी नमूद केलेल्या जमीनींचा त्या प्रयोजनासाठी वापर करण्यासाठी बिगर शेतीची परवानगी घेण्याची आवश्यकता असणार नाही. अशा जमीनी संबंधात तहसीलदार यांच्याकडे रुपांतरीत कर, अकृषीक आकार व जमीन वर्ग-2 ची असल्यास निर्धारीत केलेला नजराणा भरणा केल्यास अशी जमीन आपोआप त्या विकास आराखड्यातील मंजूर प्रयोजनासाठी अकृषीक झाली आहे, असे समजण्यात येणार आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी दिली.
                      या अधिनियमातील कलम 42 () मध्ये झालेल्या दुरुस्तीनुसार ज्या ठिकाणी प्रादेशीक विकास योजना मंजूर असेल किंवा प्रारुप आराखडा प्रसिध्द केला असेल अशा ठिकाणीसुध्दा अशा आराखड्यातील मंजूर प्रयोजनासाठी  वरील प्रमाणे रक्कमेचा भरणा केल्यास अशी जमीन आपोआप अकृषीक झाली असे समजण्यात येईल व त्याच प्रयोजनाबाबत जमीनीचे अभिलेख्यात बदल करण्यात येईल, त्यामुळे या पुढे अशा विकास योजनेत किंवा प्रादेशिक विकास योजनेस समाविष्ट असलेल्या जमिनींमुळे अकृषीक परवानगीची आवश्यकता असणार नाही.
                      अशा मंजूर विकास योजनेमध्ये / अथवा प्रादेशिक विकास योजनेमध्ये ज्या धारकांच्या जमिनी असतील त्यांना संबंधित तहसीदारांमार्फत लवकरच नोटीसा पाठविण्यात येतील. तसेच जमीनधारकांनी स्वत: संपर्क साधून अर्ज केल्यास अशी प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करुन त्यांना  जमिनी अकृषीक झाल्याबद्दल सनद प्रदान करण्यात येईल.    या सुधारीत तरतुदीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. संबंधित नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ही डॉ. भापकर यांनी केले आहे.

                                                            -*-*-*-*-*
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी
21 जुनला निबंध, वक्तृत्व स्पर्धा
नांदेड दि. 16 - जिल्हास्तरीय सामाजिक विकास शक्ती प्रदत्त समितीमार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त बुधवार 21 जुन 2017 रोजी सकाळी 11 वा. जवाहरलाल नेहरु समाज कार्य महाविद्यालय सिडको नवीन नांदेड येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या निबंध स्पर्धेचा विषय "राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक दृष्टीकोन" असून निबंध 1500 शब्दात लिहिणे आवश्यक आहे. या स्पर्धेतून प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषीक व प्रमाणपत्र देण्यात येईल. ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घ्यावयाचा आहे त्यांनी बुधवार 21 जुन 2017 रोजी सकाळी 11 वा. जवाहरलाल नेहरु समाज कार्य महाविद्यालय सिडको नवीन नांदेड येथे उपस्थित रहावे.
तसेच बुधवार 21 जून रोजी दुपारी 2 वा. "सामाजिक समतेसाठी शाहु-फुले-आंबेडकर यांची भुमिका" या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वक्तृत्व स्पर्धेत सर्व महाविद्यालयीन मुला-मुलींना भाग घेता येईल. या स्पर्धेतुन प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषीक व प्रमाणपत्र देण्यात येईल.
दोन्ही स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जास्तीतजास्त भाग घ्यावा. स्पर्धेसाठी आपल्या महाविद्यालयाचे ओळखपत्र घेऊन स्वखर्चाने उपस्थित राहवे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.

0000000
मिटकॉनकडून बेरोजगार युवकांसाठी प्रशिक्षण   
नांदेड दि. 16 - मिटकॉन आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत उद्योजकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अनुसुचित जाती व सर्वसाधारण घटकातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी रेडीमेड, गारमेंट, ब्युटी पार्लर, दुग्ध व्यवसाय, मोटार रिवायडींग, घरगुती उपकरण दुरुस्ती, दुचाकी वाहन दुरुस्ती, फॅशन डिझाईनिंग इतर आधारीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणास प्रवेशासाठी किमान सातवी उत्तीर्ण, वय 18 ते 45 वर्षे, जातीचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थ्यांची निवड करताना अपंग महिला, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य, संसदग्राम, आदर्शग्राम, भुमीहीन शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.  
इच्छुक युवक-युवतीनी सर्व कागदपत्रे मिटकॉन कार्यालयात सादर करावे. अधिक माहिती व प्रवेशासाठी जिल्हा समन्वयक मिटकॉन यांना प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन मिटकॉनचे जिल्हा समन्वयक आर. एस. दस्तापुरे यांनी केले आहे.
000000
अंतीम विकास आराखड्यात नमुद प्रयोजनासाठी
बिगर शेतीची परवानगीची आवश्यकता नाही
नांदेड दि. 16 :- महाराष्ट्र शासनाने नुकतेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 42 ब मध्ये सुधारणा केली असून त्यानुसार ज्या ठिकाणी अंतीम विकास आराखडा प्रसिद्ध झाला असेल त्याठिकाणी विविध प्रयोजनासाठी नमूद केलेल्या जमिनींचा त्या प्रयोजनासाठी वापर करण्यासाठी बिगर शेतीची परवानगी घेण्याची आवश्यकता असणार नाही. अशा जमिनी संबंधात तहसीलदार यांचेकडे रूपांतरीत कर, अकृषीत आकार व जमीन वर्ग- 2 ची असल्यास निर्धारीत केलेला नजराणा भरणा केल्यास अशी जमीन आपोआप त्या विकास आराखड्यातील मंजूर प्रयोजनासाठी अकृषीत झाली आहे असे समजण्यात येईल अशा सुधारणा करण्यात आली आहे.
तसेच कलम 42 (क) मध्ये खालील दुरूस्तीनुसार ज्या ठिकाणी प्रादेशीक विकास योजना मंजूर असेल किंवा प्रारूप आरखडा प्रसिद्ध केला असेल अशा ठिकाणी सुद्धा अशा आराखड्यातील मंजूर प्रयोजनासाठी वरील प्रमाणे रक्कमेचा भरणा केल्यास अशी जमीन आपोआप अकृषीक झाली असे समजण्यात येईल व त्याच प्रयोजनाबाबत जमिनीचे अभिलेख्यात बदल करण्यात येईल. त्यामुळे यापुढे अशा विकास योजनेत किंवा प्रादेशीक विकास योजनेत समाविष्ट असलेल्या जमीनींसाठी अकृषीक परवानगीची आवश्यकता असणार नाही.
अशा मंजूर विकास योजनेमध्ये अथवा प्रादेशीक विकास योजनेमध्ये ज्या धारकांच्या जमिनी असतील त्यांना संबंधीत तहसीलदारांमार्फत लवकरच नोटीसा पाठविण्यात येतील. तसेच जमीनधारकांनी स्वतः संपर्क साधून अर्ज केल्यास अशी प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून त्यांना जमिनी अकृषीक झाल्याबद्दलची सनद प्रदान करण्यात येईल.
या सुधारीत तरतूदीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी नागरीकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन औरंगाबाद विभागीय आयुक्त यांनी केले आहे, असे नांदेड जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

000000
उत्पादन शुल्क विभागाची कार्यवाही 
अवैध दारु जप्त , 13 जणांविरुद्ध गुन्हे दाखल
नांदेड दि. 16 - राज्य उत्पादन शुल्क नांदेड शहर विभागाने नुकतेच दोन दिवस विशेष मोहिम राबवून नांदेड शहर, बिलोली व अर्धापूर तालुक्यात गुन्हा अन्वेषनाची माहितीनुसार 13 जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहे. या मोहिमेत देशी दारु 40 लीटर, ताडी (शिंदी) 436 लिटर असा एकूण 20 हजार 435 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या मोहिमेत विभागातील निरीक्षक डी. एन. चिलवंतकर, एस. एस. खंडेराय, पी. ए. मुळे यांच्या पथकातील दुय्यम निरीक्षक बी. एस. घुगे, पी. बी. गोणारकर, व्ही. व्ही. फुलारी, बी. एस. मंडलवार यांनी कार्यवाही पार पाडल्याची माहिती निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड शहर यांनी दिली आहे.
000000


पीक विमा समायोजनेबाबत
स्टेट बँकेचे कर्जदारांना आवाहन
 नांदेड दि. 16पीक विमा समायोजनाबबात राज्यस्तरीय बँकर्स समिती महाराष्ट्र राज्य आणि रिजर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार पिक विम्याचे समायोजन पुढील प्रमाणे करण्याबाबत सुचीत केले आहे.
पीक कर्जाचे पुनर्गठन करुन नवीन पीक कर्ज वाटप केले असेल तर पीक विमा पुनर्गठन केलेल्या कर्ज खात्यात जमा करावा. पीक कर्जाचे पुनर्गठन केले आहे, परंतू नवीन पीक कर्ज वाटप केले नसेल तर पीक विमा बचत खात्यात जमा करावा. किसान क्रेडीट कार्ड योजनेतील पीक कर्जाचा आलेला विमा किसान क्रेडीट कार्ड पीक कर्ज खात्यात जमा करावा. नवीन पीक कर्ज वाटप केले नसेल तर पीक विमा लाभार्थीच्या इतर कर्ज खात्यात जमा करु नये. याबाबत कर्जदारांनी नोंद घ्यावी , असे आवाहन भारतीय स्टेट बँक क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयाचे क्षेत्रीय व्यवस्थापक नांदेड यांनी केले आहे.
000000


जप्त केलेल्या रेतीसाठ्याचा 
तहसिल कार्यालयात आज लिलाव
 नांदेड दि. 16नांदेड तालुक्यात जप्त केलेल्या रेतीसाठ्याचा लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली शनिवार 17 जून 2017 रोजी दुपारी 12 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे घेण्यात येणार आहे. अटी शर्तीबाबत माहिती नांदेड तहसिल कार्यालयातील गौण खनिज शाखेत कार्यालयीन वेळेत पहावयास मिळेल, असे  तहसिलदार नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000
जिल्ह्यात गत 24 तासात
 सरासरी 28.81 मि.मी. पाऊस
          नांदेड, दि. 16 - जिल्ह्यात शुक्रवार 16 जुन 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 28.81 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात एकूण 461.03  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 103.96 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 10.88 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 16 जुन रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 70.13 (137.01), मुदखेड- 35.67 (127.00), अर्धापूर- 44.00 (117.33) , भोकर- 15.00  (121.75) , उमरी- 26.67 (58.00), कंधार-37.17 (119.17), लोहा-20.67 (106.00), किनवट- 23.29 (113.72), माहूर- 36.50 (115.50), हदगाव- 10.43 (151.61), हिमायतनगर- 6.00 (63.82), देगलूर- 38.00  (67.67), बिलोली- 25.00 (85.40), धर्माबाद- 33.33 (101.67), नायगाव- 19.60  (81.06), मुखेड- 19.57 (96.57) आज  अखेर  पावसाची सरासरी 103.96 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 1663.28) मिलीमीटर आहे.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...