Tuesday, September 14, 2021

 नांदेड जिल्ह्यात 5 व्यक्ती कोरोना बाधित तर 3 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 571 अहवालापैकी 5 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 5 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 287 एवढी झाली असून यातील 87 हजार 603 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 33 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 651 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 5 असे एकुण 5 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील एका कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 3 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 33 कोरोना बाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 14, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 6, खाजगी रुग्णालय 4 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 21 हजार 592

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 18 हजार 389

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 287

एकुण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 603

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 651

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.2 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-11

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-33

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4

00000

 

 समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी 

20 सप्टेंबर रोजी महिला लोकशाही दिन

जिल्हाधिकारी कार्यालयात स्विकारले जातील अर्ज 

नांदेड, (जिमाका) दि. 14:- समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 20 सप्टेंबर 2021 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 20 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी प्रि मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा 

नांदेड (जिमाका) दि 14 :- अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ता धाकर विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. सन 2021-22 साठी केंद्र शासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचे आहे. 

यावर्षी ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे अशा विद्यार्थ्यांनी रिनिवल स्टुडंट म्हणून अर्ज करावा तसेच नवीन विद्यार्थ्यांनी फ्रेश स्टुडंट म्हणून अर्ज करावा. तसेच इयत्ता 1 ली 10 वीच्या सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी अनुदानित, विना अनुदानित कायम विना अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यीत मान्यताप्राप्त शाळांकडून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी लागू राहील.अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी 50 टक्के पेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण झालेला असावा.इयत्ता 1 लीच्या विद्यार्थ्यांना गुणांची अट लागू राहणार नाही.पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे.पालकांचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले असावे.शिष्यवृत्ती साठी अर्ज करणा विद्यार्थ्यांना 15 नोव्हेंबर 2021 पर्यत ऑनलाईन अर्ज करता येईल.ऑनलाईन अर्ज करताना काही तांत्रिक अडचण आल्यास शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांच्याशी संपर्क साधावा.

00000


 मध केंद्र योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा 

नांदेड (जिमाका) दि 14 :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित झाली आहे. 

लाभार्थी व्यक्तीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे तसेच त्यांच्याकडे स्वंताच्या मालकीची शेती असावी. तो 10 वी उत्तीर्ण असावा तसेच त्यांच्याकडे किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे 1 एकर शेती जमीन किंवा भांडे तत्वावर घेतलेली शेती जमीन, लाभार्थ्यांकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता किंवा सुविधा असावी तसेच 10 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे. 

निवड झालेल्या लाभार्थ्यांनी मध व्यवसाय सुरु करण्यापूर्वी मंडळास बंधपत्र लिहुन देणे अनिवार्य असून मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील. अधिक माहितीसाठी खादी व ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय उद्योग भवन औद्योगिक वसाहत शिवाजी नगर नांदेड येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

 मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन येत्या शुक्रवारी 

नांदेड (जिमाका) दि 14 :- येत्या 17 सप्टेंबर रोजी 73 वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन संपूर्ण मराठवाडा विभागात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सकाळी 8.30 वाजता माता गुजरीजी विसावा उद्यान येथे हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अपर्ण करण्यात येईल तसेच सकाळी 9 वाजता पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होईल. राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये असे निर्देश देण्यात आले आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...